फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 04 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 04/12/2016 वार - रविवार 
========***********=========
                 *📆 . . दिनविशेष . . 📆*
                      . *नौदल दिन*
⌛१९२४ : गेटवे ऑफ इंडिया या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन.
💥 जन्म :-
⌛१९१९ : इंद्रकुमार गुजराल, भारताचे पंतप्रधान
💥 मृत्यू :-
⌛१९८१ : ज. द. गोंधळेकर, मराठी चित्रकार. 

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣  1 एप्रिल 2017 पासून जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे लक्ष्य आहे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे प्रतिपादन
2⃣ पश्चिम इंडोनेशियामध्ये बातम बेटाजवळच्या समुद्रावरुन उड्डाण करत असलेल्या एका विमानाचा संपर्क तुटला असून, विमानात 16 प्रवासी आहेत.
3⃣ १० वर्षांत मध्य प्रदेशचा कायापलट झाला असून, हे राज्य विकास आणि शेतीसाठी ओळखले जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
4⃣ रेल्वेच्या प्रकल्पाचा फायदा कोकणला व्हावा या करिता आपण कोकणात खेड लोटेत रेल्वेचा प्रकल्प सुरू कण्याचा निर्णय घेतला आहे, प्रदूषण विरहित प्रकल्पाला या पुढे प्रोत्साहन दिले जाईल केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू
5⃣ नोटाबंदी निर्णयानंतर शिर्डीमध्ये साईबाबाच्या दानपेटीत साडेनऊ कोटी रुपयांचे दान झाले जमा, दानात हजार रूपयांच्या 12468 हजार नोटा तर 500 रूपयांच्या 31184 नोटांचा समावेश
6⃣ भारताची बॅडमिंटन तारका आणि अव्वल मानांकित सायना नेहवाल हिला मकाऊ ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत शुक्रवारी आपल्यापेक्षा २१६ रँकिंगने पिछाडीवर असणाऱ्या चीनच्या झांग यिमान हिच्याकडून १२-२१, १७-२१ असा सनसनाटी पराभवाचा सामना करावा लागला.
7⃣ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या इतिहासात यंदा प्रथमच होणार डोप टेस्ट, आॅलिम्पिकच्या तोंडावर महाराष्ट्राचा मल्ल नरसिंग यादव डोपिंगमध्ये अडकल्याचे प्रकरण घडल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्वपूर्ण मानला जात आहे.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*ग्रंथ आणि भाकरी यापैकी मी प्रथम ग्रंथ पसंद करेन आणि नंतर भाकरी.*
*-डाॅ. बाबासाहेब आंबेडकर.*

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *ग्रंथ*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤कु.निशिगंधा व्यंकटेश काटकर, नांदेड
👤उमाकांत शिंदे नांदेड
👤बालाजी चुनपवार, येवती

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

    "लखपती "

श्रीमंताचे पैसे आता
गरीबाच्या खात्यात आहेत
बरेच काही पैसे पुन्हा
आसपासच्या नात्यात आहेत

नातलग ही पहा कसे
झाले तात्पुरते लखपती
लखपती असून माञ
कसे काहीच नाही हाती

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌅   विचारवेध.....✍🏻
*********************
प्रत्येकाला वाटते की, आपण हाती घेतलेले
काम चांगले आणि उत्कृष्ट झाले पाहिजे.असे वाटायलाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही जे काही काम हातामध्ये घेतले आहे.त्या कामामध्ये घड्याळीच्या काट्याप्रमाणे काम संपेपर्यंत सारख्याच गतीने ठेवा.काम करत असताना मनाची तितकीच एकाग्रता असावी. काम करत असताना मध्येच काहीतरी व्यत्यय आला तर त्याला हातावेगळे करणार नाही असे ठरवा.काहीही असो. काम संपल्यानंतरच त्याचा विचार करू असा निश्चय करा. ते काम संपल्यानंतरच दुसरे काम हाती घ्या. इतर गोष्टीचा आपल्या कामात काही बदल करायचा झाला तर त्याचे नियोजन काम करण्याआधीच करा.तरच आपले काम चांगले आणि उत्कृष्ट होईल आणि त्याचा आनंद निश्चितच तुमच्या मनाला अधिक देईल.

       - व्यंकटेश काटकर, नांदेड
         9421839590

🎯🌺🎯🌺🎯🌺🎯🌺
========***********=========
*आजची लिंक*
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त*

*साहित्य दरबार वैचारिक लेखमाला* 
आयोजित निबंध स्पर्धा

*विषय :- चला विषमता नष्ट करू या*

http://sahitydaarpan.blogspot.com/2016/12/sahity-darbar-04-12.html

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वरील लिंक उघडून पहावे.
========***********=======
*आजची बोधकथा*

*स्वकष्टाची प्रचिती मौलिक*
====================
*एक श्रमिक होता. तो पर्वतावर दगड फोडत होता. फोडता फोडता त्याच्या मनात विचार आला. श्रम कमी आणि दाम भरपूर असा काही जीवनाचा मार्ग सापडला तर! डोंगरावर एक देवाची मूर्ती होती तिची तो रोज त्यासाठी पूजा, प्रार्थना करू लागला.त्याचा काही फायदा झाला नाही, या देवापेक्षाही श्रेष्ठ देवतांची पूजा करावी,असे त्याला वाटू लागले. आकाशात त्याने सूर्य पहिला. सूर्याची तो उपासना करू लागला. एके दिवशी त्याच्या लक्षात आले की, सूर्याला ढग झाकून टाकू शकतात,मग ढगाची आराधना करू लागला.त्यानंतर त्याच्या पाहण्यात असे आले की ढग पर्वताने अडवले जातात आणि पाऊस पडतो, पाऊस श्रेष्ठ असे त्याला वाटू लागले.परंतु पाऊस पडल्यानंतरही पर्वतावरचे दगड जसेच्या तसे असतात*.
    *ते  फोडण्याची शक्ती त्याच्यात नाही .ती शक्ती माझ्यात आहे. तेव्हा श्रमिकच सर्वात श्रेष्ठ! मला स्वतःलाच पुरुषार्थ जागवून महान बनले पाहिजे,याची त्याला जाणीव झाली*.
      *आत्मबल, आत्मश्रद्धा व् आत्मजागृती यांच्यामुळे पुरुषार्थाची प्रेरणा  लाभते.  पुरुषार्थ प्राप्त झालेला मनुष्य दुःखाला, संकटाला घाबरत नाही. सुखासाठी अधीर उतावळा बनत नाही*.

*तात्पर्यः श्रमाचे,प्रयत्नाचे जीवन जगणे ही मनुष्य जीवनाची सार्थकता आहे*.
〰〰〰〰〰〰〰〰〰
*📝 शब्दांकन/संकलन*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in

🐪🐴🐆🐊🐬🐍🐌🐁🐕🦃
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments