*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 06/12/2016 वार - मंगळवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
💥 १९५६ भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन
💥 १९७६ क्रांतिसिंह नाना पाटील स्मृतिदिन
💥 संत रोहिदास महाराज पुण्यतिथी
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन, मृत्यूशी दिलेली झुंज अयशस्वी
2⃣ AIADMK चे ज्येष्ठ नेते पनीरसेल्वम तामिळनाडूचे पुढचे नवे मुख्यमंत्री
3⃣ टाईम्स मॅगझिन 'पर्सन ऑफ द इअर'च्या ऑनलाइन रिडर्स पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मारली बाजी.
4⃣ बी.एस.भुल्लर यांची नागरी विमान उड्डयन महासंचालकपदी नियुक्ती.
5⃣ शिर्डीच्या साईबाबा संस्थानची वर्षभर मोफत प्रसाद भोजन योजना, 1 ऑक्टोबर 2017 ते 18 ऑक्टोबर 2018 पर्यंत साईबाबांच्या समाधी दर्शनासाठी येणा-या साईभक्तांना मोफत प्रसाद भोजन पुरवण्याचा व्यवस्थापन समितीने घेतला निर्णय.
6⃣ जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मुंबईत बहुजन हक्क संरक्षण करणार विराट मोर्चाचे आयोजन, मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत सर्वपक्षीय दलित नेत्यांची घोषणा
7⃣ 200 रूपयांपर्यंतचा टोल भरण्यासाठी चलनातून बाद असलेल्या जुन्या 500 च्या नोटा 15 डिसेंबरपर्यंत वापरता येतील, वाहतूक मंत्रालयाकडून पुन्हा स्पष्टिकरण.
8⃣ पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेचा गेट पडल्याने इयत्ता दुसरीत शिकणा-या दोन मुलींचा मृत्यू तर दोन जखमी
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
लीन असावे परंतु दीन असु नये
*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*नियुक्त*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 *मुक्ता मोहन प्राजक्ता पाठक*
👤 अशोक हिंगणे
👤 डी. आर. भोसके, येवती
👤 शंकर बोंबले, धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" संघर्ष "
शिका संघटीत व्हा संघर्ष करा
हा संदेश बाबांनी दिला आहे
मतलबी लोकांनी त्याचा अर्थ
पहा किती संकुचित केला आहे
शिकून संघटीत होऊन
चला सर्वांसाठी संघर्ष करू
सर्वांच्या प्रगतीतच प्रगती
हे महावाक्य आपण ध्यानी धरू
*महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनीर्वान दिना निमित्त विनम्र अभिवादन*
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 विचारवेध .........✍🏻
****************************
समाजाला एका चांगल्या प्रवाहाकडे घेऊन जाण्यासाठी धर्मग्रंथ, पुराणग्रंथ, लोककथा, संतविचार, थोरविचारवंत, समाजसुधारक व आदर्श समाजहित जोपासणारे साहित्यिकांचे लेखन हे सदैव मदत आणि सदैव समाजाला मार्गदर्शनच करतात. त्यामुळे समाजाच्या उन्नतीसाठी सर्वात जास्त योगदान या सर्वांचे आहे. हे कधीही विसरून चालणार नाही.नेहमी त्यांच्या सहवासात राहून आपले जीवन समाजाप्रती सकारात्मक ठेऊन आपली व समाजाची प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा.
- व्यंकटेश काटकर, नांदेड
9421839590
🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹
========***********=========
*आजची लिंक*
*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रासंगिक लेख
http://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar/manuski-jagvu
*🙏🏻 🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏🏻*
========***********=======
*आजची बोधकथा*
ख-या मित्राची परीक्षा
एक खूप मोठे जंगल होते.
त्यात सगळे प्राणी मोठ्या आनंदात
राहत होते. तेथे एक लाघवी स्वभावाचा ससा राहत होता. सशाच्या उत्तम स्वभावामुळे त्याला अनेक मित्र होते. त्याला या गोष्टीचा फार अभिमान होता. एकदा रानातून जात असताना सशावर अचानकपणे रानकुत्र्यांनी
हल्ला केला. ससा जोरजोराने धावू लागला पण कुत्र्यांचा वेग जास्त असल्याने सशाचे काही चालेना.
त्याने धावता धावताच वाटेत
भेटलेल्या एका घोड्याला विनंती
केली की घोडेदादा, मला तुमच्या
पाठीवर घ्या, माझे प्राण संकटात
आहेत. घोडा म्हणाला,''ससेभाऊ, तुम्हाला वाचवायला तुमचे अनेक
मित्र येतील. मला का उगीच कुत्र्यांशी दुश्मनी घ्यायला लावताय.'' असे
म्हणून घोड्याने आपला वेग वाढवून
पळ काढला. पुढे पळता पळता मग
सशाने तशीच विनंती एका बैलाला
केली. बैलाने सशाला सांगितले,
'' ससेदादा, अहो मी कितीही जोरात
पळालो तरी या कुत्र्यांच्या वेगाची
बरोबरी करु शकणार नाही. तरी तुम्ही तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राची मदत घ्या.'' पळताना पुढे सशाला एक वासरू गाठ पडले सशाने त्यालाही विनंती केली असता वासरू म्हणाले,''ससेकाका,
मी तर किती लहान आहे अजून तुमची मदत करण्यासाठी. मी जर मोठा असतो तर तुमची नक्कीच मदत केली असती
पण तुम्ही दुस-या कोणाला तरी पहा.''
असे करत करत सशाने जवळपास
भेटणा-या प्रत्येकाला आपला जीव वाचविण्याची विनंती केली पण कोणीच त्याच्या मदतीसाठी पुढे आले नाही. या सर्वाशी बोलण्याच्या कालावधीत रानकुत्रे आणि ससा यांच्यातील
अंतर खूप कमी झाले व त्यांनी सशाला गाठून त्याला फाडून खाल्ले. सशाचा
जीव वाचवायला त्याचा कोणीच मित्र
पुढे आला नाही.
तात्पर्य - जीवनात असे अनेक मित्र बनतील जे केवळ तुमच्या पेशाकडे, पैशाकडे बघून आणि तुमच्या सत्तेचा, प्रतिष्ठेचा वापर करून घेण्यासाठी तुमच्याजवळ येतील पण शहाणपणा
यातच आहे तुम्ही कोणाला मित्र बनविता ते.
संकटकाळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाराच आपला खरा मित्र आहे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
*सौजन्य :-* zpguruji.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment