फ्रेश मॉर्निंग बुलेटीन दिनांक 07 डिसेंबर 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 07/12/2016 वार - बुधवार 
========***********=========
                 *📆 . . दिनविशेष . . 📆*
राष्ट्रीय ध्वज दिन

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ पश्चिम बंगालमध्ये कॅपिटल एक्स्प्रेसचे दोन डबे रुळावरून घसरले, 12 प्रवासी जखमी
2⃣ मरिआना बीचवर शासकीय इतमामात जयललिता यांच्या पार्थिवाचे दफन, जयललितांच्या निकटवर्तीय शशिकला यांनी त्यांच्या पार्थिवावर केले अंतिम विधी
3⃣  शंभर रूपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येणार, जुन्या नोटाही व्यवहारात कायम राहणार-आर.बी.आय.
4⃣ जस्टीस जगदीश सिंग केहर बनणार भारताचे नवे मुख्य न्यायाधीश, टी.एस.ठाकूर यांची जागा घेणार.
5⃣ बेदरकार आणि बेजबाबदारपणे ड्रायव्हिंग करणा-यांना कडक शिक्षा देण्यासाठी कडक कायदा करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला आदेश.
6⃣ अकोल्यात होणार डिजिटल लायब्ररी, ११० कोटीचा मिळाला निधी
7⃣ वानखेडेची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देणार ? सचिनच्या निवृत्तीनंतर वानखेडेवर रंगणार पहिलाच कसोटी सामना
उस्मानाबादचे माजी आमदार भास्करराव शिवरामपंत चालुक्य यांचे बुधवार दि. 7 रोजी मध्यरात्री एक वाजता खासगी रुग्णालयात वयाच्या 90व्या वर्षी निधन; चालुक्य यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी तीन वाजता दाबका येथे होणार अंत्यविधी
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
विचार थकले की विकार भडकतात.

*संकलक :- बालाजी चौधरी, लातूर*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *निवृत्ती*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
धनंजय शंकर पाटील, कवी तथा लेखक सोलापूर

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

    " माणूस "

गरजेपुरता माणूस
लाचार असतो
गरजेपुरता नम्रतेचा
विचार असतो

गरज सरताच
बदलतो विचार
समजू नका म्हणतो
मला तुम्ही लाचार

शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🎯 वि चा र वे ध.......✍🏻
--------------------------

जी चांगल्या विचाराची माणसे समाजासाठी चांगल्या विचारांची पेरणी करुन चांगल्या  विचारांचे पिक वाढवण्यास मदत करतात किंवा चांगले विचार देऊन जातात. त्या विचारावरच चांगला समाज घडतो. तो जरी या जगात हयात नसला तरी  त्यांनी समाजाला दिलेल्या चांगल्या विचारातून अमरच असतात. त्यांच्या आदर्श विचाराला कधीही समाज विसरत नाहीत.

- व्यंकटेश काटकर,नांदेड
  संवाद..9421839590.

🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸
========***********=========
*आजची लिंक*
http://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar

वरील लिंक वर नासा येवतीकर यांचे साहित्य वाचण्यास मिळेल.
========***********=======
*आजची बोधकथा*
         अस्‍सल नकलाकार

एका गावात एका नकलाकाराचे 
दररोज कुठे ना कुठे कार्यक्रम होत 
असत. त्‍याचे उंची कपडे, गोड व खुसखुशीत बोलणे व त्‍याने केलेल्‍या विविध नकलांमुळे तो प्रसिद्ध होता. त्‍याच्‍या या आवाज काढण्‍याच्‍या कलेमुळे तो लोकांचा आवडता बनला होता. एका कार्यक्रमामध्‍ये त्‍याने एकदा मांजराच्‍या पिलाचा आवाज काढला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 
लोक वाहवा करू लागले त्‍याच 
वेळी एक घोंगडी घेतलेला एक खेडूत शेतकरी उठून उभा राहिला व 
म्‍हणाला,'' या कलाकाराने काढलेल्‍या आवाजापेक्षा मांजराच्‍या पिलाचा 
आवाज हा वेगळा असतो. या कलाकारासारखा आवाज मांजर कधीच काढत नाही. मी अस्‍सल मांजराच्‍या पिलाचा आवाज काढू शकतो.'' लोक म्‍हणाले,''ठीक आहे, तू आवाज काढून दाखव.'' असे म्‍हणताच घोंगडीवाल्‍याने आपल्‍या डोक्‍यावरून पूर्ण घोंगडी 
पांघरली व आतून मांजराच्‍या पिलाचा आवाज काढला. आवाज ऐकून 
लोक ओरडू लागले,''छे, छे, नाही, नाही, नकलाकाराने काढलेला आवाजच योग्‍य होता. तुला आवाज काढताच येत नाही. 
तू चुकीचा आवाज काढतो आहे.'' हे ऐकताच घोंगडीवाला 
म्‍हणाला,'' मित्रांनो मी तो आवाज मुळी काढलेलाच नाही.'' असे म्‍हणून त्‍याने घोंगडी अंगावरून काढून फेकली व लोक आश्‍चर्यचकित झाले कारण त्‍याने एका हातात मांजरीचे पिलू धरले होते.
तो पुढे म्‍हणाला,''मला माहित होते की तुम्‍ही लोक मी काढलेल्‍या आवाजाला नकार देणार म्‍हणून मी आवाज न 
काढता या मांजरीच्‍या पिलाला दोन 
चिमटे काढले व त्‍या पिलाने आवाज काढला. तुम्‍ही मला का नाकारले याचे कारण मी या नकलाकारासारखा सजूनढजून न येता, खुसखुशीत न 
बोलता, बडेजाव न मिरवता साध्‍या
वेशात माझे सादरीकरण केले.'' 
लोकांना आता शेतक-याचे बोलणे 
लक्षात आले.

तात्‍पर्य : चुकीच्‍या गोष्‍टीही अत्‍यंत आकर्षकपणे मांडल्‍या की सहजपणे 
प्रसिद्ध होतात. यातून लोकांची 
दिशाभूल होते. समाजानेही भपक्‍यापेक्षा सत्‍याची कास धरणे गरजेचे आहे.     
*सौजन्य :-* zpguruji.com
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments