फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 01 फेब्रुवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 01/02/2017 वार - बुधवार 
========***********=========
        *📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛ १८८४ : ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीचीपहिली आवृत्ती प्रकाशित. तेव्हापासून ऑक्सफर्डच्या कोशांचे काम अव्याहतपणे चालूच आहे.
💥 जन्म :-
⌛१८८४ : सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, प्राच्यविद्यापंडित, मराठी कोशकार.
💥 मृत्यू :-
⌛२००३ : कल्पना चावला, महिला अंतराळवीर.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करावा, या आणि इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता सकल मराठा समाजाने मराठा क्रांतिमोर्चाच्या बॅनरखाली मंगळवारी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन केले
2⃣  केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आज संसदेत अर्थसंकल्प सादर करणार
3⃣ जम्मू-काश्मीर
मध्ये जोरदार बर्फवृष्टीमुळे लेह विमानतळावर 200 पेक्षा जास्त प्रवासी अडकले
4⃣  संसदेच्या रूम नंबर 50 मध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश.
5⃣ खासदार ई अहमद यांचं निधन, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
6⃣ महाराष्ट्राची ‘सो कुल’ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
7⃣  बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर, दुखापतीतून सावरलेल्या वृद्धिमान साहाचे भारतीय संघात पुनरागमन
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" उत्पतीशिवाय स्थिती नाही, स्थितीशिवाय लय नाही, लयावाचून पुनःउत्पती नाही."
                
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *उत्पत्ती*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 शेख एम. बी. केंद्रप्रमुख
👤 नारायण गायकवाड
👤 शिवानंद सूर्यवंशी
👤 कवी गजानन काळे
👤 अतुल भुसारे
👤 शिवम पडोळे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

     "निर्धार "

प्रत्येकाचा विजयाचा
पक्का निर्धार आहे
विजयी मीच होणार
उच्चार बारबार आहे

ठाम निर्धार असला तरी
एकच जण जिंकेल
बाकीच्या साठी कुठे तरी
एखादी मासी शिंकेल

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
  8275336675
========***********=========
*आजचा*
🔸🔹‼ *विचार धन* ‼🔹🔸

*दोन्ही हात एकत्र आले की 'नमस्कार' होतो. हा नमस्कार म्हणजे एक सोपस्कारही असतो. कधी कधी तो उजवा हात छातीला लावून स्मित करूनही केला जातो. या नमस्कारामागे एक प्रमुख भावना दडलेली असते, ती म्हणजे ज्येष्ठांचा 'आदर आणि स्वागत.' या नमस्कारामध्ये इतरही भाव दडलेले असतात. कधी चरणस्पर्श तर कधी अगदी गुडघ्यापर्यंत स्पर्श करून हे नमस्कार होतात. छोट्यांचे मोठ्यांना नमस्कार व मोठ्यांचे थोरांना नमस्कार यात फरक असतो. त्यात स्त्रीयांचे नमस्कार वेगळे व बालकांचे नमस्कार वेगळे. शरीराची अष्टांगे जमिनीला लावून साष्टांग नमस्कार केले जातात किंवा सुर्य नमस्कार होतात.*

*देवाला केलेल्या नमस्कारात थोडा फरक पडतो. त्यात कृतज्ञतेची भावना येते. दोन्ही हात नम्रतेने जोडले जातात. डोळे अर्धोन्मीलित होतात. मन करूणात्मक याचकाच्या भुमिकेत जाते. हातात ओंजळभर फुले येतात, ओठ पुटपुटू लागतात, कदाचित श्लोक किंवा एखादे स्तोत्र सवयीने ओठांवर येते, एखादी आरती आठवते. कधी नवस बोलले जातात तर कधी ते फेडले जातात. अशा अनेक नमस्कारांची रांग लागते. यात मागण्याच जास्त असतात.*
*"भक्त परमेश्वराकडे असंख्य मागण्यांचा ओघ सुरू ठेवतो, हजारो नमस्कार देवाचरणी ठेवून निघून जातो."*

      🔶 ‼ *रामकृष्णहरी* ‼ 🔶
           🔹🔹🔹🔹🔹🔹
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*वपुर्झा*

आठवणी ह्या मुंग्याच्या वारूळाप्रमाणे असतात. वारूळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग एक अश्या असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसचं आहे.
~ वपु काळे | वपुर्झा
*संकलन - संजय माचेवार, वसमत*
========***********=======
🎯 *वि चा र वे ध.......✍🏻*
---------------------------

सूर्यासारखी तेजस्विता आणि सक्रीयता, चंद्रासारखी शीतलता आणि शांतता, धरतीसारखी संयमता व सहनशिलता हे जसे गुण या तिघांमध्ये आहेत तसेच गुण आपल्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपणही त्यांच्यासारखे आपल्या  जीवनामध्ये यशस्वी स्थान निर्माण करुन इतरांच्या जीवनात आपले अढळ स्थान निर्माण करु शकतो हे निश्चितपणे सांगता येईल.
ह्या गुणांचे अनुकरन करणे म्हणजे आपल्या जीवनासाठी एक ऊर्जाच आहे.ती ऊर्जा आपण आपल्या जीवनात कधीही कमी होऊ देऊ नये.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590.
🌎🌞🌝🌎🌞🌝🌎🌞🌎🌞🌝🌎🌞🌝

*आजची बोधकथा*
        
         📚📚📚📚📚📚
         *सम्राट आणि साधू*
एक सम्राट रात्रीच्‍या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्‍याच्‍या कुटीत पाण्‍याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्‍हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्‍याच्‍याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्‍याला विचारले,’’तुमच्‍याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्‍ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्‍ही इतके का जागता आणि सावधान राहता,’’ साधू म्‍हणाला,’’ राजा, आपण आपल्‍या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्‍यामुळे मी सदैव सावध राहतो.’’ राजा म्‍हणाला,’’ माझ्याकडे असलेल्‍या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्‍ही कचरा समजत आहात’’ साधूने उत्तर दिले,’’ ज्‍याला आपण अमूल्‍य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्‍याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्‍यामुळे मी स्‍वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्‍वराने दिल्‍याप्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्‍पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्‍हणून मी रात्री स्‍वतलाच सांगत असतो नव्‍हे माझ्या आत्‍म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील.’’ साधुचे ते विचार ऐकून राजा त्‍याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्‍थान दिले.
*तात्पर्य*
मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्‍याचा प्रयत्‍न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
            *✍�संकलन ✍�*
              *साई पाटील*,
        श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
📚📚📚📚📚📚📚📚📚 
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********========

Comments