फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 02 जानेवारी 2017



*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*

📱 9423625769


1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 

🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am

----------------------------------------------------

http://fmbuleteen.blogspot.com

----------------------------------------------------

📅 दि. 02/01/2017 वार - सोमवार 

========***********=========

        *📆 . . दिनविशेष . . 📆*

*धुम्रपान विरोधी दिन*


⌛१७५७ : ब्रिटीश ईस्ट ईंडीया कंपनीने कोलकाता काबीज केले.

⌛१८८५ : पुणे येथे फर्ग्युसन कॉलेज सुरु.

💥 जन्म 

⌛१९१० : श्रीरंगम श्रीनिवासराव, तेलुगू कवी.

⌛१९४२ : डेनिस हॅस्टर्ट, अमेरिकन राजकारणी.

⌛१९५९ : किर्ती आझाद, भारतीय क्रिकेट खेळाडू.

⌛१९६० : रमण लांबा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

💥 मृत्यू 

⌛१९४४ : महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, मराठी समाजसुधारक, धर्मसुधारक.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*

                 9403595764

========***********=========

*आजच्या ठळक बातम्या*

1⃣  महागाई नियंत्रणात ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

2⃣ अखिलेश यादव बनले समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष

3⃣  पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.29 रुपये, तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 0.97 पैशांची वाढ,

4⃣  एसबीआयची कर्जे होणार स्वस्त, एसबीआयनं लँडिंग रेट 0.9 टक्क्यांनी केले स्वस्त, दुस-या बँकांचे रेटही कमी होण्याची चिन्हे

5⃣ जन धन खात्यामधून गेल्या पंधरा दिवसांत ३,२८५ कोटी रुपये काढण्यात आले.

6⃣ तामिळनाडूमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी

7⃣ भारताचा टेनिसपटू सोमदेव देववर्मनची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती


*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*

📱 9960358300

========***********=========

*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

बुद्धिमत्तेचे खरे प्रतिक म्हणजे तिचे ज्ञान नाही तर तिची कल्पना शक्ति आहे.


*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*

                mob. 8007084419

========***********=========

*आजचा मराठी शब्द*

             *प्रतिक*


*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*

                  8668453639

========***********=========

*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 संदीप ढाकणे

👤 साईनाथ इबितवार


*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*

                  9423625769

[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]

========***********=========

*आजची @@ गुगली @@*


" दुजाभाव "


आपल्यात अन् परक्यात 

दुजाभाव असतो 

सारखे प्रेम असल्याचा 

उगी आव असतो


किती नाही म्हणा, आपला 

तो आपला वाटतो 

सरतेशेवटी उगीच 

प्रेमाचा उमाळा दाटतो


   शरद ठाकर 

सेलू जि परभणी 

8275336675

========***********=========

*आजची लिंक*

वृषाली वानखडे, अमरावती यांचा कल्पतरु सम तो स्पर्धेतील लेख 


" नासा नावात जादू '


वाचा प्रतिलिपि वर :


http://marathi.pratilipi.com/vrushali-vankhade/nasa-navaat-jaadu


अमर्याद रचना वाचा, लिहा, आणि मित्रांसोबत शेयर करा

========***********=======

*आजची बोधकथा*


            *पश्‍चाताप*

मेहमूद नावाचा एक इराणी व्‍यापारी होता. एकदा त्‍याने मोठी पार्टी दिली. मध्‍यरात्रीपर्यंत खानपान चालू होते. या गर्दीत एक चोर हवेलीत येऊन लपला. मेहमूदने त्‍याला पाहिले होते. परंतु तो त्‍याला काहीच बोलला नाही. जेव्‍हा सगळे पाहुणे गेले तेव्‍हा त्‍याने नोकरास दोन व्‍यक्तिंचे जेवण लावण्‍याचे आदेश दिले. त्‍यानंतर लपून बसलेल्‍या चोराजवळ तो गेला. चोर घाबरला, मेहमूदने त्‍याला प्रेमाने जेवू घातले. त्‍यानंतर चोरी करण्‍याचा उद्देश विचारला. तेव्‍हा चोर म्‍हणाला, माझे नाव रमीझ आहे, मी श्रीमंत होतो पण दारूमुळे मी या अवस्‍थेत आलो आहे. मेहमूदने त्‍याला काही धन दिले आणि काही व्‍यवसाय चालू करण्‍याविषयी सुचविले. चोराने त्‍याचे म्‍हणणे ऐकले. दरम्‍यान काही वर्षे या गोष्‍टीला लोटली. एकदा तो मेहमूदकडे आला, मेहमूदने त्‍याला ओळखले नाही. चोर स्‍वत:च म्‍हणाला,तुम्‍ही चोरी सोडण्‍याविषयी सांगितल्‍यानंतर मी तुम्‍ही दिलेल्‍या पैशातून व्‍यापार सुरु केला. आज माझ्याकडे लाखोंची संपत्ती आहे. फक्त एक मेहरबानी करा. मी ज्‍यांच्‍याकडे चोरी त्‍यांचे पैसे परत करण्‍याची मला इच्‍छा आहे. त्‍यांचे पैसे परत केल्‍याने माझ्या मनावरील ओझे कमी होईल. मेहमूदने त्‍याला कोतवालाकडे नेले. कोतवाल त्‍याचे बोलणे ऐकून प्रभावित झाला. ज्‍यांच्‍याकडे त्‍याने चोरी केली होते त्‍यांची नुकसानभरपाई म्‍हणून दुपटीने पैसे दिले. लोकांनीही त्‍याला मोठ्या मनाने माफी दिली.


तात्‍पर्य :- केलेल्‍या वाईट कृत्‍यांचा पश्‍चाताप होणे ही मनुष्‍य असण्‍याची खूण होय.


वर्तमानपत्रातून संग्रहित

========***********=======

🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या

फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

========***********========

Comments