*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 03/01/2017 वार - मंगळवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
*महिला मुक्ती दिन*
*बालिका दिन*
⌛१९५२ : भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
💥 जन्म
⌛१९३१ : सावित्रीबाई फुले, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
⌛१९३१ : यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.
💥 मृत्यू
⌛२००१ : सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी.
⌛२००२ : सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ संसदेच्या आगामी अधिवेशनाची तारीख ठरवण्यासाठी संसदीय व्यवहारांच्या कॅबिनेट समितीची आज सकाळी बैठक
2⃣ डोनाल्ड ट्रंप यांच्या शपथग्रहण सोहळ्यात बॉलिवूड कलाकार दाखवणारा नृत्याविष्कार
3⃣ टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय बाजारपेठ काबीज करण्याच्या दृष्टीनं बंगळुरू येथे आयफोन उत्पादन सुरू करण्याची अॅपलने केली घोषणा
4⃣ आयसीआयसीआय बँकेने व्याजदरात केली 0.70 टक्क्यांनी कपात
5⃣ चार वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असल्याचे पाहून संतप्त झालेल्या धनेगाव ता. देवणी जि. लातूर येथील नागरिकांनी सोमवारी चार तास शाळा बंद केली आणि त्यांनी व्हरांड्यातच भरविली शाळा
6⃣ बीसीसीआयच्या अध्यक्ष पदावरुन अनुराग ठाकूर यांना हटविले, सर्वोच्च न्यायालयाचा दणका
7⃣ उस्मानाबादमध्ये ३ जानेवारी दरम्यान २७वी राष्ट्रीय फेडरेशन चषक पुरुष- महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
दूरदृष्टीने विचार करा, आपली शक्तिस्थाने ओळखा आणि त्याच्या भक्कम पायावर आपली इमारत उभी करा.... तुम्हाला यश नक्की मिळेल !
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*दूरदृष्टी*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 ज्ञानेश्वर विजागत
👤 संदीप जाधव वसूरकर
👤 प्रशांत बोड्डेवाड, येवती
👤 विठ्ठल सुवर्णकार, धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" खोड "
छोट्या छोट्या गोष्टीवरून
काहींची काडीमोड असते
काडीमोड करण्याची
काहींना मुळात खोड असते
चांगली आसो वा वाईट
खोड काही सुटत नसते
मेल्या शिवाय कायमची
कटकट मिटत नसते
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🍁 🍁 ॥ विचार धन ॥ 🍁 🍁
अखंड काम करणारी माणसं थकत नाहीत, याचे कारण त्यांचे कामावर प्रेम असते. ओव्हरटाईम करताना फक्त पैसा मनात नसतो, तर त्यात आपण अडचणीत कंपनीच्या उपयोगी येतो, हा ही भाव असतो. जिथे फक्त पैशांचा विचार होतो तिथे आयुष्यभर राबले, तरी पाठीवर शाबासकीची थाप मिळत नाही. उलट 'जन्माला आला...' या म्हणीप्रमाणे अवस्था होते. ज्यांना हे समजत नाही ती माणसे फक्त थकत जातात.
उत्साहाने भरलेला नवा दिवस त्यांच्या वाट्याला येत नाही. काम ढकलायचे एवढीच धारणा असते. स्वेच्छानिवृत्त, निवृत्त, आणि निवृत्तीनंतर काम करणारे या तीनही भागांमध्ये जे लोक येतात त्यांच्याशी कर्मावरची निष्ठा या विषयावर जर आपण बोललो, तर तिघांचीही उत्तरं भिन्न भिन्न असतात. एखादी भाजी करताना खूप कष्ट पडत असतील आणि नोकरीवरून आल्यावर एखाद्या गृहिणीने ती केली, तर ती नाही म्हणणार नाही; पण भाजीला चव मात्र नसेल. याचा अर्थ ज्या कृतीत मन नसते ती ढेपाळते, चुकते आणि मग थकवा देते. याकरीता दिवसभरात कमी काम झाले, तरी चालेल; पण ते मन:पुर्वक आणि निष्ठेने व्हावे. मग व्यक्तीचा आणि व्यक्तीच्या कामाचा विकास शक्य होतो.
🍁🍁 ॥ रामकृष्णहरी ॥ 🍁🍁
--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई
📱 9167937040
========***********=========
*आजची लिंक*
*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले*
यांच्या जयंती निमित्त
http://nasayeotikar.blogspot.com/2016/12/savitribai-phule.html
*🙏🏻 कोटी कोटी प्रणाम 🙏🏻*
========***********=======
*आजची बोधकथा*
*स्वातंत्र्य-पारतंत्र्य*
अमेरिकेत एकेकाळी गुलामगिरीची प्रचलित होती. निग्रो लोकांची शेळ्या मेंढ्यांप्रमाणे खरेदीविक्री होत असे. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा मोडून काढण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे या प्रथेचा अंत झाला व निग्रो लोकांची गुलामीतून सुटका झाली. मुक्त झाल्यानंतर निग्रो लोकांनी रोजगाराचा शोध सुरु केला. एक वृद्ध, अशक्त वृद्ध निग्रो माणूस कामाच्या शोधात भटकत होता. पण त्याला काम काही मिळाले नाही. फिरून फिरून तो थकला व एके जागी बसला. तेथे त्याची भेट एका मालक जातीच्या ओळखीच्या माणसाबरोबर झाली. वृद्ध निग्रोची ती अवस्था पाहून तो माणूस म्हणाला,''तुझे हे होणारे हाल मला पाहवत नाहीत. तू कशाने इतका त्रस्त झाला आहे'' वृद्ध म्हणाला,''मला काम मिळत नाही'' तो माणूस म्हणाला,''काही दिवसांपूर्वी तर तुझी अवस्था चांगली होती.'' निग्रो म्हणाला,'' त्यावेळी मला बराच आराम होता. माझा मालक खूप दयाळू माणूस होता. मला तो फारसे काम लावत नसे. माझ्यावर अत्याचार करत नसे. कठीण कामे करण्यास लावित नसे.'' सहानुभूती दाखवून तो माणूस म्हणाला,'' अरे मित्रा मग तर ते गुलामीचे दिवसच चांगले म्हणायला हवे की, ही मुक्ती काही तुला मानवली नाहीये असेच दिसून येतेय. ती तुझ्या कोणत्याच कामी येत नाहीये.'' हे ऐकताच बसलेला तो निग्रो माणूस ताडकन उठून उभा राहिला व उंच स्वरात ओरडून बोलला,''मालक, गुलामगिरी स्वीकारण्यापेक्षा हे मुक्त जीवन हजारपट चांगले आहे. कारण आमच्या जीवनावर केवळ आमचाच अधिकार आहे; ते सावरण्यासाठी आम्ही स्वतंत्र आहोत. मालकाकडून पिंज-यात मिळणा-या पेरूच्या फोडी खाण्यापेक्षा उंच आकाशात उपाशीपोटी भरारी घेणे पोपटाला खूप आवडते हे लक्षात आहे ना.''
तात्पर्य :- मनुष्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्वातंत्र्य ही पहिली अट आहे, पारतंत्र्य पतनाचे तर मुक्ती प्रगतीचे द्वार आहे.
वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment