फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 04 जानेवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 04/01/2017 वार - बुधवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*
*आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन*
⌛१८८५ : केसरी वॄत्तपत्राची सुरुवात
💥 जन्म :-
⌛१९१४ : इंदिरा संत, मराठी कवियत्री.
⌛१९२४ : विद्याधर गोखले नाटककार, खासदार, लेखक संपादक
💥 मृत्यू :-
⌛१९९४ : राहुल देव बर्मन, भारतीय संगीत दिग्दर्शक.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣  ग्रामीण भागामध्ये 40 टक्के नोटांचा पुरवठा व्हावा यासाठी आरबीआयने मार्गदर्शकतत्वे जारी केली आहेत.
2⃣  ओबीसी महामंडळ आर्थिकदृष्ट्या मजबूत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3⃣ ऑनलाइन बुकिंग आणि ऑनलाइन पेमेंट करणा-या एलपीजी ग्राहकांना प्रत्येक सिलिंडरमागे पाच रुपयांची तेल कंपन्यांकडून मिळणार सवलत
4⃣ देशभरातील रेल्वेगाड्यांत 3000 दिव्यांग अनुकूल बोगी लागणार. यात मुंबईच्या लोकलचादेखील समावेश - मुख्य आयुक्त, दिव्यांग कल्याण
5⃣ अभिनेता आमिर खानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्यमेव जयते वॉटर कपचा म्युझिक व्हिडीओ लाँच केला, वॉटर कपच्या माध्यमातून पाणी वापराविषयी करण्यात येणार जनजागृती
6⃣ कर्नाटक क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अशोक आनंद आणि सचिव ब्रिजेश पटेल यांनी दिला राजीनामा. कोषाध्यक्ष दयानंद पाई यांनीही दिला राजीनामा
7⃣ पाकिस्तानविरोधात सिडनीमध्ये खेळल्या जाणा-या मालिकेच्या तिस-या सामन्यातील पहिल्याच दिवशी डेव्हिन वॉर्नरने शतक पुर्ण केलं. महत्वाचं म्हणजे पहिल्या दिवसाचा लंच होण्याआधीच डेव्हिड वॉर्नरने शतक ठोकत भीमपराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हा रेकॉर्ड करणारा तो पहिलाच खेळाडू

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *अनुकूल*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 बालाजी ढिगोळे, प्रा. शिक्षक
👤 चंद्रभीम हौजेकर, पत्रकार, धर्माबाद
👤 माधव सूर्यवंशी
👤 श्रीपती सुरवसे
👤 माधव बोइनवाड, येवती
👤 फरीद शेख
👤 अंकुशराजे जाधव
👤 निलेश आलंदे

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

*" समस्या "*

लहान असो वा मोठा
प्रत्येकाला समस्या असते
असा एक माणूस नाही
ज्याला समस्या नसते

लहाण्याची लहान अन्
मोठ्याची मोठी असते
मोठ्या पुढे लहाण्यांची
समस्याच खोटी असते

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
  8275336675
========***********=========
*आजचा*
🌹🌹॥ *विचार धन* ॥🌹🌹

*आपण रोजच वर्तमानकाळाचे चरित्र वाचतो. बलात्कार, लैंगिक शोषण, विनयभंग, गैरप्रकार हे आता कायदेशीरच ठरतायत की काय अशी स्थिती आहे. नोकरी, पदव्या, पुरस्कारापर्यंत सर्वत्र नको नको ते बघायला मिळतेय. या सा-या खलनायकांना नायक म्हणून,  लायक म्हणून नालायक पाठीराखेच पुढे आणतायत. ज्यातून या सा-यांची हिम्मत दिवसेंदिवस वाढते आहे. एका ज्येष्ठ कवीच्या गोष्टीप्रमाणे 'थ्री एच' (हेड, हॅड, हार्ट) घडवणारी व्यवस्था आता तीन 'प' वर चालतेय. त्यांच्या भाषेत हे तीन 'प' म्हणजे 'पत, पैसा नि परस्त्री' ज्याला रोजच्या भाषेत बाई, बाटली आणि पैशाची पूजा करणारी व्यवस्था म्हटली जाते. गोष्ट सुन्न करणारी आहे पण वास्तव आहे.*
*या सर्व वाटांनी येणारे निर्लज्जतेने म्हणत असले 'अंधारात सारं चालुन जातं,' पण अंधाराच्या आडोशाने जे चालतं ते ते सारं अनैतिक. हा अंधारच संपुर्ण व्यवस्था नासवतो. आजपर्यंत आम्ही जे जे सुरक्षित म्हणत आलो ते ते असुरक्षित बनते आहे. आपण 'काहीच करू शकत नाही' असे म्हणू लागलो आहोत. हे आपण होऊन स्वीकारलेले षंढत्व सर्वत्र निपजतयं. अलिकडे गुणवत्ता सिद्ध करायचे परिमाण बदलतेय. जेवढी ज्याची बंडलं तेवढी त्याची अक्कल, तेवढी त्याची लायकी. ज्यांच्याकडे हे भांडवल नाही त्यांचा धंदा चौपट समजा !*

    🌹🌹॥ *रामकृष्णहरी* ॥🌹🌹
      --संजय नलावडे, मुंबई
========***********=========
*आजची*
🎯 विचारवेध.......✍🏻
________________________

जीवनाच्या जीवनपटात सुख आणि दुःख ही दोन महत्वाची पात्रे आहेत. ती सातत्याने आपापल्या परीने भूमिका पार पाडत असतात. दुःख हे कधी शरीराच्या वेदनेला स्पर्श करत सशक्त मनाला विचलीत करण्याची भूमीका करते की, जीवनाला सहन होत नाही.ते जीवनाला नको असते तरी ते करण्यासाठी भाग पाडते आणि ते सहन केल्याशिवाय सुखही मिळत नाही.त्यासाठी सुखाची खरी भूमिका साकारण्यासाठी दुःख भोगावेच लागते.
           सुख म्हणते मला सारेचजण जवळ करतात. मी त्यांच्या सुखासाठी, आनंदासाठी मदत करतो. त्यामुळे मला सारेचजण मनापासून माझ्यावर प्रेम करतात. हे जरी खरे असले तरी पहिल्यांदा माझीच खरी कसरत आहे ती कसरत करताना मी त्यांना सांगत असतो की,मला तुम्ही स्वीकारले नाही तर सुखाला कसे जवळ करणार ? म्हणून माझ्यानंतर तुला जवळ करतात.दोघेही आपापल्या परीने भूमिका अतिशय प्रामाणिकपणे साकारतात म्हणून जीवन अधिक खुलून दिसते. त्यामुळे जीवनाचा जीवनपट ह्या दोघांच्याही भूमिकांना माणूस कधीच विसरत नाही.जीवनाच्या जीवनपटात दोघांचीही पात्रे अविस्मरणीय आहेत.ती साकारल्याशिवाय जीवनालाही पूर्ण अर्थ प्राप्त होत नाही.हे प्रत्येकजण स्वीकारतो आणि स्वीकारलेच पाहिजे.या दोघांनाही आपल्याला आपल्या जीवनाच्या जीवनपटात विसरता येत नाही.

- व्यंकटेश काटकर,नांदेड
  संवाद.9421839590.

🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
========***********=======
*आजची बोधकथा*

          *वृद्ध महिला आणि चोर*

एक गरीब वृद्ध महिला आपल्‍या गावातून दुस-या गावाला जाण्‍यास निघाली. तिच्‍या डोक्‍यावर मोठे गाठोडे होते. चालून चालून ती फार थकली. ती विचार करू लागली कि आपल्‍याला आता कोणाचीही जर मदत मिळाली तर किती बरे होईल तेवढ्यात तेथून एक घोडेस्‍वार जाताना तिला दिसला. वृद्ध महिला त्‍याला थांबवत म्‍हणाली,'' मुला मी फार थकले आहे. तू माझ्यावर दया कर आणि ही गाठोडी पुढच्‍या गावात पोहोचवून दे. मी पाठीमागून चालत चालत येईन आणि ते गाठोडे तेथून घेईन'' घोडेस्‍वार घाईत होता, त्‍याने न थांबताच म्‍हटले की मला इतका वेळ नाही की दुस-याचे ओझे मी वहात बसू. इतके बोलून तो पुढे गेला. महिलेला फार वाईट वाटले आणि ती त्‍याला दोष देऊ लागली मग अचानक कोणीतरी तिच्‍या कानात म्‍हणले,'' जे झाले ते चांगले झाले. तुझे गाठोडे घेऊन तो पळून गेला असता तर. तू तर त्‍या माणसाला ओळखतही नव्‍हतीस की मग तू काय केले असते.'' हा विचार मनात येताच तिने सुटकेचा निश्‍वास सोडला. कारण त्‍या गाठोड्यात तिच्‍या आयुष्‍यभराची कमाई होती. तिने तिची जीवनभराची कमाई चांदीच्‍या रूपात साठविली होती. पुढे थोडे दूर गेल्‍यावर घोडेस्‍वाराच्‍या मनात विचार आला की आपण त्‍या गाठोड्यात काय आहे हे न पाहताच संधी सोडून दिली. कदाचित त्‍या गाठोड्यात काही सोनेनाणे असले तर आपण मोठी चूक केली हे लक्षात येऊन तो परत वृद्धेच्‍या दिशेने परत आला आणि तिला म्‍हणाला,''आजीबाई, मी चूक केली तुझे गाठोडे मी घेतले नाही, मला आता चुकीचे परिमार्जन करण्‍याची संधी दे. मी तुझे गाठोडे पुढच्‍या गावात नेऊन पोहोचवितो.'' पण महिला आता सावध होती. तिने घोडेस्‍वाराची मानसिकता अचूक ओळखली व म्‍हणाली,''बेटा, आता काहीही झाले तरी हे गाठोडे मी तुला देणार नाही. ज्‍याने तुला गाठोडे परत मागण्‍याची अक्कल दिली त्‍यानेच मला गाठोडे न देण्‍याचीही अक्कल दिली आहे.'' घोडेस्‍वार रिकाम्‍या हाताने परत गेला.

तात्‍पर्य : बिगर ओळखीच्‍या माणसावर विश्‍वास ठेवल्‍याने धोका होण्‍याची शक्‍यता असते. विश्‍वास अशा माणसावर ठेवा ज्‍याला तुम्‍ही पारखले आहे.

वर्तमानपत्रातून संग्रहित  
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments