फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 05 जानेवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*

📱 9423625769


1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 

🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am

----------------------------------------------------

http://fmbuleteen.blogspot.com

----------------------------------------------------

📅 दि. 05/01/2017 वार - गुरुवार 

========***********=========

   *📆 . . दिनविशेष . . 📆*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖  

          *गुरु गोविंदसिंह जयंती*

💥१९४९ : राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनी (एन. डी. ए) पुणे येथे सुरु झाली.

जन्म

१९२५ : रमेश मंत्री, मराठी साहित्यिक.

१९१३ : श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.

💥१८९२ मराठीतील संशोधक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी जन्मदिन

मृत्यू

१९८२ : रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार.


   *सौ. खेडकर सुभद्रा त्रिंबकराव*

   मु.अ. जि.प.प्रा.शा. किट्टी आडगाव

   ता.माजलगांव जि.बीड

   मो.न.9403593764

========***********=========

*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात इस्रो करणार 103 सॅटेलाइट्सचं लाँचिंग

2⃣ एसबीआयने पेटीएमसह सर्व ई वॉ़लेट केले ब्लॉक

3⃣ हुंडा पद्धतीला प्रोत्साहन देणा-या सर्व वैवाहिक वेबसाइट बंद करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं सर्व राज्य सरकारांना दिले निर्देश

4⃣ अंध असल्याने नोकरी नाकारण्यात आलेल्या प्रांजला पाटील हिला रेल्वेत नोकरी मिळणार. रेल्वेमंत्र्यांनी दिले आदेश

5⃣ दिलीप वेंगसरकरांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाचा दिला राजीनामा

6⃣ दिलीप वेंगसरकरांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदाचा दिला राजीनामा

7⃣ महेंद्रसिंग धोनीनं वन-डे, टी-20 चं कर्णधारपद सोडले, बीसीसीआयनं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली माहिती


*ता. क. महत्त्वाच्या उत्तर प्रदेशासह पंजाब , गोवा, उत्तराखंड आणि मणिपुर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने केल्या जाहीर


*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*

📱 9960358300

========***********=========

*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

" स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार न होऊ देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. "


*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*

                  7588876539

========***********=========

*आजचा मराठी शब्द*

             *स्वैराचार*


*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*

                  8668453639

========***********=========

*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 अशोक कुबडे, साहित्यिक, नांदेड

👤 व्यंकटी केंद्रे, प्रा. शिक्षक, कंधार

👤 भाऊसाहेब चासकर, उपक्रमशील शिक्षक व लेखक

👤 नितीन उत्तरवार

👤 राजकुमार बेरलीकर


*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*

                  9423625769

[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]

========***********=========

*आजची @@ गुगली @@*


      "दोष "


आपल्याचे दोष सारे 

पोटात असतात 

दुस-याचे दोष मात्र

ओठात असतात


आपला असो वा परका 

दोष दूर झाले पाहिजे 

आपल्याला अन् परक्याला 

दोष मुक्त केले पाहिजे


   शरद ठाकर 

सेलू जि परभणी 

8275336675

========***********=========

*आजचा*

💢 💢॥ *विचार धन* ॥💢 💢


*मानवी संबंधांमध्ये एकमेकांशी बोलणं, संवाद साधणं, हास्यविनोद करणं, भांडण करणं, रडणं, ओरडणं या क्रिया घडण्यासाठी शब्दांची गरज असते, पण कधी कधी  शब्दांपेक्षा शरीरभाषा तुलनेने आधिक प्रभावी ठरत असते. त्यातून 'शब्दांविण संवादु' या उक्तीप्रमाणे 'ये ह्रदयीचे ते ह्रदयी' भाव पोचवणं सहज साध्य होत असतं. या 'देहबोली'वरून समोरच्याच्या मनातील भावना समजून घेता येतात.*


*अबोलपणे व्यक्त होणा-या देहबोलीत अनेक संकेत व संदेश दडलेले असतात. देहबोलीवरून समजून घेणं म्हणजे 'मनकवडा' असणं. समोरच्याची देहबोली ओळखून कोणाशी संबंध वाढवायचे व कोणाशी मर्यादित ठेवायचे हे ठरवता येते, सावध होता येते. ही देहबोली आत्मसात करण्यासाठी लोकांमध्ये मिसळायला हवं, संवाद  साधता यायला हवा, निरीक्षण वाढवायला हवं. अनुभवाच्या आणि सरावाच्या कसोटीवर आपण समोरच्याची 'देहबोली' नक्कीच ऐकू व समजू शकू.*

             

          🌷 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷

            ☀☀☀☀☀☀

     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*

========***********=========

*आजची*

🎯 विचारवेध.........✍🏻

--------------------------


चंदनापेक्षाही संसारासाठी झिजणारी,परमेश्वरापेक्षाही जास्त आपल्या संसारावर प्रेम करणारी,

सुखदुःखातही सगळ्यांना आपलं म्हणून जवळ करणारी,कसल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा न करणारी,कोणत्याही कामात कामचुकार न करता सदैव तत्पर राहणारी. जर कोणी असेल तर ती म्हणजे एक स्त्री. एक स्त्रीच करु शकते.

अशी स्त्री एक आई,ताई,

पत्नी,काकी,मामी,वहिणी,सासू इत्यादींच्या नाना रुपात साकारणारी भूमिका हीच एक स्त्री करु शकते.अशा स्त्रीला सदैव आपल्या जीवनात आदराचे स्थान द्यायला हवे.अशा नारी शक्तीला सा-यांनीच मानसन्मानाची वागणूक द्यायला पाहिजे.

हाच आपल्या सा-या जीवनाचा आधारस्तंभ आहे.


- व्यंकटेश काटकर,नांदेड.

  संवाद.9421839590.


🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿

========***********=======

*आजची बोधकथा*


           *संस्‍कारीत मुलेच यशस्‍वी*


नैतिक मूल्‍यांचे शिक्षण देणा-या एका शिक्षकाने मुलांसाठी चॉकलेटस मागवली होती. त्‍यांनी सगळ्या मुलांना रांगेत बसवले होते. शिक्षक चॉकलेटस वाटायला सुरुवात करणार इतक्यात शाळेचा शिपाई त्‍या वर्गात येऊन पोहोचला व म्‍हणाला,''सर तुम्‍हाला आताच्‍या आत्‍ता प्राचार्यांनी काही महत्‍वाचे सांगण्‍यासाठी त्‍यांच्‍या कार्यालयात बोलावले आहे.'' शिक्षकांनी चॉकलेटचा डबा हातातून खाली ठेवला व मुलांना म्‍हणाले,'' मुलांनो मला काही कामासाठी प्राचार्यांकडे जावे लागत आहे. खरेतर ही चॉकलेटस मला माझ्या स्‍वत:च्‍या हाताने तुम्‍हाला द्यायची खूप इच्‍छा होती. परंतु मला जावे लागणार आहे. पाहिजे तर तुम्‍ही हाताने चॉकलेटस घेऊ शकता. अन्यथा मी परत आल्‍यावर तुम्‍हाला देईन'' ही चांगली संधी आहे. असा काही विद्यार्थ्‍यांनी विचार केला व त्‍यांनी चॉकलेटस स्‍वत:च्‍या हाताने घेऊन खाल्ली तर काही विद्यार्थ्‍यांनी शिक्षकांची वाट बघण्‍यात वेळ घालविला. शिक्षक परत आले व त्‍यांनी मुलांना विचारले,'' मुलांनो ज्‍यांनी ज्‍यांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस खाल्ली त्‍यांनी आपले हात वर करा'' ज्‍यांनी चॉकलेटस खाल्ली होती त्‍यांनी हात वर केले. मग शिक्षकांनी उरलेल्‍या मुलांना प्रेमाने चॉकलेटस वाटली. काही वर्षानंतर त्‍या शिक्षकांनी त्‍या विद्यार्थ्‍यांची माहिती मिळविली तेव्‍हा त्‍यांना असे दिसून आले की ज्‍या मुलांनी स्‍वत:च्‍या हाताने चॉकलेटस घेतले होते ती मुले सामान्‍य स्‍वरूपातील कामे करून उदरनिर्वाह करत होते तर ज्‍यांना शिक्षकांनी चॉकलेटस दिली ते सर्व विद्यार्थी उच्‍च पदावर काम करत होते. ही सर्व संस्‍कारांची देणगी होती.


तात्‍पर्य :- संस्‍काराने माणूस घडतो. मिळालेली संधी आणि तिचा योग्य वापर करणे हे मानवाच्‍या हाती आहे. चुकीच्‍या मार्गाने गेल्‍यास व संयम न पाळल्‍यास योग्‍य संधी मिळूनही तिचा वापर करता येत नाही.


वर्तमानपत्रातून संग्रहित

========***********=======

🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या

फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 

========***********========

Comments