*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 06/01/2017 वार - शुक्रवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*प्रसिध्दी माध्यमातील सर्व संपादक, पत्रकार, बातमीदार आणि वृत्तपत्र विक्रेते यांना दर्पण दिनाच्या हार्दीक शुभेच्छा*
💥1832. मराठीतील पहिले वर्तमानपत्र दर्पण सुरु झाले.
💥 1812 आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म
💥1924 बँ.सावरकर यांची जन्मठेपेतून मुक्तता
सौ. खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
मु.अ. जि.प.प्रा.शा. किट्टी आडगाव
ता.माजलगांव जि.बीड
मो.न.9403593764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ १२ जानेवारीला युवा दिनी एनसीसी कॅडेट देशभर डिजिटल पेमेंटची मोहिम राबणार
2⃣ 1 फेब्रुवारीला सादर होणा-या अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलण्याची विरोधकांची मागणी, विरोधकांनी घेतली निवडणूक आयोगाकडे धाव.
3⃣ 31 जानेवारीला मुंबईतमरिन ड्राइव्ह ते आझाद मैदान असा निघणार मराठा समाजाचा मोर्चा
4⃣ नोटबंदी ने उद्योग व्यवसाय अडचणीत अनेक उद्योगांनी कामगारांना कामावर काढून टाकले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार.
5⃣ गंभीर गुन्हे दाखल असणा-या राजकारण्यांना निवडणूक लढण्यापासून रोखण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने दर्शवली तयारी.
6⃣ रणजी उपांत्य सामन्यात मुंबईने तामिळनाडूचा सहा विकेटने केला पराभव, गुजरात बरोबर होणार अंतिम सामना
7⃣ सिडनीत आॅस्ट्रेलियाने उभारलेल्या ८ बाद ५३८ या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा डाव अडखळला.
*ता. क. - इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज संघ निवड करतील.*
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
स्वतःचे अनुभव उगीच इतरांना सांगू नयेत. इतरांना एकतर खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असे वाटायला लागतं. ज्याने त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत.
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*उद्योग*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 भगवान चव्हाण
👤 साईनाथ जगदमवार
👤 बजरंग माने
👤 रितेश जोंधळे
👤 सुदर्शन कोंपलवार
👤 अभिषेक अडकटलवार
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" वाचाळता "
क्रियेविना वाचाळता
कधीही व्यर्थ असते
वाचाळाच्या बोलण्याला
कुठे काय अर्थ असते
वाचाळाच्या बोलण्याकडे
कोणी लक्ष देत नाही
वाचाळाचे बोल कधी
कोणी मनावर घेत नाही
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
⛳ ⛳ ॥ विचार धन ॥ ⛳ ⛳
'गुरू' हे जन्मालाच यावे लागतात, त्यांच्याकडे गुरूपदाला पोहचण्याची विद्वत्ता असते, पात्रता असते. धर्माचरण कडक पाळण्याची त्यांची दक्षता असते. अशा गुरूंच्या वाणीला सामर्थ्य आलेले असते, त्यांना अपरोक्षज्ञान प्राप्त असते. सतत ईश्वराच्या नामस्मरणामुळे मन:शांती असते. शरीरात वास करीत असलेल्या ईश्वराला कसलाच त्रास होऊ नये म्हणून कडक शुचिर्भूतता पाळलेली असते. गुरूंनी तर, ज्या शरीरात ईश्वराचे वास्तव्य आहे त्या शरीराला वस्त्रांचाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने वस्त्र परिधान केलेली असत.
'गुरू' मानणे हे कोणाला कमीपणाचे वाटत असेल तर तो माणूस कधीच शिक्षणास पात्र होऊ शकत नाही. आपल्याकडे 'गुरूशिष्य' परंपरा महान आहे, आणि गुरूप्रती विनम्र भाव ठेवल्यास गुरू प्रसन्न होऊन त्यांच्याकडचे ज्ञानभांडार शिष्यांपुढे मोकळे करतात. जे जे म्हणून गुरूपदी पोहचले ते सर्व आधी उत्तम शिष्य झाले आणि नंतर गुरूपदी पोहचले. असे काही गुरूशिष्य पाहाताना ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार होतो.
⛳ ⛳॥ रामकृष्णहरी ॥⛳ ⛳
🍁🍁🍁🍁🍁🍁
--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई
========***********=========
*आजची बोधकथा*
*खरा वेडा कोण*
एका वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये वेड्यांना बाहेर पडेपर्यंत म्हणजेच पूर्ण बरा झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी अनेक मानसशास्त्रीय चाचण्यांना तोंड द्यावे लागत असे. त्यातील शेवटच्या चाचणीमध्ये वेड्यासमोर एक नवे कोरे चकचकीत पाच रूपयांचे नाणे आणि एक मळकट पन्नास रूपयांची नोट ठेवली जाई. त्यातील फक्त एकच गोष्ट त्याला उचलण्यास सांगितली जाई. वेड्याने पन्नास रूपये उचचले की त्याला डिसचार्ज दिला जाई व तसे न केल्यास त्याला पुन्हा एकदा चाचण्या पार करायला सांगितल्या जात. गरज पडल्यास पुन्हा उपचारासाठीही पाठविले जाई. हॉस्पीटलमधील एक वेडा शेवटच्या चाचणीपर्यंत सगळ्या चाचण्या पटापट पार करत असे मात्र शेवटच्या चाचणीला मात्र नापास होत असे. अनेकदा असे घडल्यावर चाचणी घेणारे डॉक्टर कंटाळले व त्यांनी एक युक्ती केली पुढच्या वेळेला त्या वेड्यासमोर एक पाच रूपयांची जुनी नोट व पन्नास रूपयांची कोरी करकरीत नवी नोट ठेवली तरीही त्या वेड्याने पाच रूपयांचीच नोट उचचली. हे पाहून डॉक्टर आश्चर्यचकित झाले व ओरडले,'' अरे मूर्खा, सगळ्या चाचण्या आरामात पार करतोस आणि शेवटच्या चाचणीत मात्र कायम चुकतोस. तुला पाच आणि पन्नास यातील फरक कळत नाही काय'' वेडा शांतपणे म्हणाला,'' ते मला चांगलं कळतं डॉक्टरसाहेब, पण इथून बाहेर पडलो की, मला रोजचा खर्च स्वत:लाच करावा लागणार आहे. त्यापेक्षा पाच रूपयांचे नाणे उचचले की, मला इथून बाहेर पडावे लागत नाही, पाच रूपयेही मिळतात आणि खाणेपिणेराहणे सगळे काही फुकटात होते. मग मी पन्नास रूपयांची नोट उचलून स्वत:च्या पायावर धोंडा पाडून का म्हणून घेऊ''
वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment