*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि.07/02/2017 वार - शनिवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
💥1610 गॅलिलिओने *गुरु*या ग्रहाचा शोध लावला.
💥1992 विश्वनाथ आनंद यास बुध्दिबळ चॅपियनशिपचे ग्रँड मास्टर हा दर्जा मिळाला.
सौ. खेडकर सुभद्रा त्रिंबकराव
मु.अ. जि.प.प्रा.शा. किट्टी आडगाव
ता.माजलगांव जि.बीड
मो.न.9403593764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचं हृदयविकाराच्या झटक्याने काल सकाळी झालं निधन, ते 66 वर्षांचे होते.
2⃣ रेल्वेने तिकीट बुकींगसाठी आयआरसीटीसीचं नवीन मोबाइल अॅप लॉन्च करण्यात आलं
3⃣ सरकारने 2016-17 वर्षासाठी 7.1 टक्के विकास दर गृहित धरला आहे, 2015-16 मध्ये 7.6 टक्के विकास दर गृहित धरण्यात आला होता.
4⃣ अखेर शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या लोकार्पणाचा मार्ग मोकळा, केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकार्पण सोहळ्याला दिली परवानगी
5⃣ औद्योगिक क्षेत्रातून इंदू मिलला वगळण्याचा निर्णय, राज्य सरकारकडून महापालिकेला आदेश
6⃣ बर्फवृष्टीमुळे 7 आणि 8 जानेवारीला होणा-या परिक्षा काश्मीर विद्यापीठाने पुढे ढकलल्या, नव्या तारखा लवकरच होतील जाहीर.
7⃣ इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेंटी-20 सामन्यांसाठी भारतीय संघ जाहीर, विराट कोहली कर्णधार तर युवराज सिंगचे संघात पुनरागमन
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" जी माणसे आपल्या कुवतीप्रमाणे इच्छा करतात, सामर्थ्यानुसार काम करतात व कुणाचा अनादर करीत नहीत ; ती माणसे कर्तव्यदक्ष समजावित. उगाच विश्रांती मिळविण्याची धडपड करण्यातच माणसे थकून जातात. "
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*विश्रांती*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 कुणाल पवारे, सहशिक्षक, पाटोदा बु.
वृत्त संकलक, फ्रेश मॉर्निंग बुलेटिन
दैनिक सामना प्रतिनिधी, कुंडलवाडी
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"स्वाभिमान "
सत्तेसाठी स्वाभिमान
सरळ गुंडाळला जातो
नपटणारा मार्ग ही
सहज धुंडाळला जातो
सत्तेच्या लालशेने तर
स्वाभिमान विसरतात
सत्तेसाठी कोणा पुढेही
सरळ हात पसरतात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌸 🍁 *॥ विचार धन ॥* 🍁 🌸
*'यश' नेमकं काय? असं विचारल्यावर प्रत्येकाचं उत्तर वेगळं असतं. मुलांनी परीक्षेत चांगले मार्कस् मिळवणं? त्याला ‘योग्य’ तो मार्ग मिळणं, चांगली नोकरी मिळणं, भरपूर पैसे-प्रतिष्टा कमविणे? घर-गाडी मिळविणे.* *९५% मिळवून देखील आत्महत्या/नैराश्य असतेच. प्रतिष्टा-पैसा असूनही तुरुंगवास, वाद-विवाद... मग स्वतःला यशस्वी समजून देखील सुखी का नाही? असो... !*
*कृष्णमूर्ती, रविंद्रनाथ टागोर याचं कधीही शाळेशी जमलं नाही. महात्मा गांधींना ३८%- ४०% गुण मिळत, तरीदेखील ही माणसं जगद्गुरू झाली. मुलं परीक्षा देऊन, गुणवत्ता दाखवून कधीच हुशार होत नाहीत किंवा यशस्वी होत नाहीत. जेव्हा शिक्षण संपतं आणि जगणं सुरु होत, तेव्हाच अनुभवाचं शिक्षण चालू होतं. worldclass होण्यासाठी अनुभवाचं शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी स्वप्रतिमा प्रबळ असावी लागते. आनंदी, समाधानी आणि जगावर प्रेम करणारी माणसंच "Worldclass Personality" म्हणून ओळखली जातात.*
🍀 *॥ रामकृष्णहरी ॥* 🍀
⭐⭐⭐⭐⭐⭐
*--संजय नलावडे, चांदिवरी, मुंबई*
========***********=========
*आजची*
🎯 विचारवेध.......✍🏻
➖➖➖➖➖➖➖➖
शारीरिक व्याधीने मनुष्याला शारीरिक वेदना होतात तर मानसिक रोगाने मनाला त्रस्त करुन टाकते. त्यामुळे माणूस कितीही सधन असला तरी त्यातून त्याची लवकर सुटका होत नाही. या व्याधीतून सुटका करायची असेल तर आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. तेच स्थिर नसेल तर सधन असूनही आपण निर्धन असल्यासारखेच आहे. आरोग्यासाठी व्यायाम व सदृढ मनासाठी चांगले विचार आचरणात आणावे. त्यामुळे मनाचीही सकारात्मकता वाढविता येऊ शकते. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला सहजरित्या प्राप्त करता येऊ शकतात. तशी आपली मानसिकता तयार करावी म्हणजे यातून मुक्तता मिळू शकते.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
========***********=======
*आजची बोधकथा*
धर्म
एकदा एका राजाने दवंडी पिटवली की जो कोणी मला सर्वश्रेष्ठ धर्माचे महत्व समजावून सांगेल त्याला मी मोठे बक्षीस देईन व तो धर्म मी स्वीकारेन. ही वार्ता ऐकताच सगळीकडे मोठमोठे धर्मगुरु, धर्मोपदेशक, आचार्य राजाला आपल्या धर्माचे महत्व समजावून सांगण्यासाठी येऊ लागले. ते सर्वच जण एकच गोष्ट आठवणीने करत होते की स्वत:च्या धर्माचे महत्व सांगताना मात्र दुस-याला धर्माला कमी लेखत होते. दुस-याच्या धर्माची निंदानालस्ती करत होते. यातून एकच झाले की, राजाला काहीच कळेना की कोणता धर्म सर्वश्रेष्ठ आहे व त्यामुळे तो दु:खी होत होता. पण त्याने शोध सुरुच ठेवला. वर्षानुवर्षे हाच क्रम चालू राहिला. राजा वृद्ध होत चालला. शेवटी राजा एका साधूच्या दर्शनास गेला. तेथे गेल्यावर त्याने साधूला नमस्कार केला व म्हणाला,''साधूमहाराज, मी सर्वश्रेष्ठ धर्माच्या शोधात आहे पण आजपर्यंत मला सर्वश्रेष्ठ धर्म कोणता हेच कळाले नाही.'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,''सर्वश्रेष्ठ धर्म तर जगात अस्तित्वातच नाहीत. जगात एकच धर्म आहे आणि बाकी सगळे हे त्या धर्माला फुटलेले अहंकार आहेत. धर्म तर तोच असतो जिथे व्यक्ती निष्पक्ष असतो, पक्षपात करणा-या मनात धर्म राहूच शकत नाही.'' साधूचे हे बोलणे ऐकून राजा प्रभावित झाला. साधू पुढे जाऊन राजाला म्हणाला,''राजन, चला आपण नदी पार करून पलीकडे जाऊया'' नदीतीरावर दोघे पोहोचले, त्यांनी तिथे अनेक सुंदर नावा (होडया) पाहिल्या. साधू राजाला म्हणाले,'' राजे, चला आपण एका सर्वश्रेष्ठ नावेतून पैलतीर गाठूया'' प्रत्येक नावेपाशी जाताच साधू त्या नावेबद्दल काही ना काही चुक दाखवित असे व पुढे जात असे. असे करता करता दुपार झाली. राजाला भूक लागली व त्रासून राजाने साधूला म्हटले,''महाराज आपल्याला नावेतून फक्त पलीकडे जायचे आहे, अहो इतकी छोटी नदी आहे की पोहूनसुद्धा आपण पटकन पलीकडे पोहोचून जाऊ मग त्याची इतकी चर्चा कशाला'' साधूने राजाकडे पाहिले व म्हणाले,'' राजन, हेच तर मला तुम्हाला सांगायचे आहे. धर्माला नाव नसतेच, धर्म आपल्याला स्वत:ला पोहून पार करायचा असतो. दुसरा कोणी आपल्याला धर्मापलिकडे पोहोचवू शकत नाही. आपल्यालाच जावे लागते.'' राजा सर्व काही समजून चुकला.
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment