*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 08/01/2017 वार - रविवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
१९०८ : बालवीर चळवळीस प्रारंभ
जन्म
१९०९ : आशापूर्णादेवी- ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणार्या प्रथम लेखिका.
मृत्यू
१९४१ : लॉर्ड बेडन पॉवेल स्मृतिदिन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ जर बाळासाहेब आज असते तर त्यांनी आजच्या स्थितीवर फटकारे ओढले असते उद्धव ठाकरे
2⃣ जोरदार बर्फवृष्टीमुळे सलग दुस-या दिवशी काश्मीरचा संपर्क तुटला.
3⃣ राज्य माहिती आयुक्तपदी के. एल. बिष्णोई, संभाजी सरकुंडे आणि दिलीप धारुरकर यांची, राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी केली आयोगावरील नवी नियुकती.
4⃣ इंडियन डेयरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी गोकुळचे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांची निवड. महाराष्ट्राला प्रथमच संधी.
5⃣ राजकीय पक्षांना मिळणा-या निधीमध्ये अधिक पारदर्शकता यावी असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले
6⃣ 2015 च्या तुलनेत 2016 मध्ये पोलिसांची कामगिरी उंचावली 2015 वर्षी 5405 तर 2016 मध्ये 3384 गुन्हे दाखल एकूण 604 गुन्हे कमी तसेच गुन्हे उकलमध्ये 3%ची वाढ बहुतांश मुख्य गुन्ह्यात घट, वार्षिक पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली माहिती
7⃣ भारताचा नवनियुक्त कर्णधार विराट कोहलीने महेंद्रसिंह धोनीमुळे संघातील आपले स्थान टिकून राहिल्याची प्रांजळ कबुली दिली
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
आयुष्य हे दुचाकी चालविण्यासारखे आहे. तुमचा तोल सांभाळण्या करीता तुम्हाला पुढे पुढे जात राहिले पाहिजे.
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*नियुक्त*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 बालाजी पेटेकर, साहित्यिक, नांदेड
👤 शेख आसिफ
👤 पोतन्ना मुदलोड
👤 आकाश गाडे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"तास "
आपल्या लोकांना म्हणे
खायचं कस कळत नाही
खाल्ल्या शिवाय कोणाच्या
पोटाला मिळत नाही
कसं खायचं किती खायचं
आता घ्यायचा आहे तास
व्यवस्थित खाणारे लोक
तयार होतील मग खास
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
☀ 🌷 *॥ विचार धन ॥* 🌷 ☀
*आयुष्यात संगतीला फार महत्त्व असते. संगतीचा परिणाम विनासायास आणि बराचसा नकळत होत असतो. संतसंगती लाभणे ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. ती पूर्वपुण्याईमुळेच लाभते. ज्यांच्याशी आपण संगत करातो, त्याचे गुणधर्म आपल्याला येऊन चिकटतात.*
*देहाच्या संगतीने सामान्य माणसाचेही गुणधर्म आपल्यात येतात, तर संतसंगतीचा परिणाम किती होत असला पाहिजे ? प्रवासात आपल्या शेजारी विडी ओढणारा असला आणि आपल्याला धूर सहन होत नसला तरी नाइलाजाने तिथेच बसावे लागते. व्यसनी किंवा विषयी माणसाची संगत ही अशी तापदायक, घातक असते. "सत्पुरूषाची संगत ही उत्तम, लाभदायी ठरते. संतसंगतीपासून 'सद्भावना' आणि 'सद्विचार' प्राप्त होतात."*
♻ *॥ रामकृष्णहरी ॥* ♻
☘☘☘☘☘☘
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯 वि चा र वे ध.....✍🏻
________________________
रस्त्यावरुन वाहन चालवत असताना रहदारीचे नियम पाळतो आणि आपल्या जीवाचे संरक्षण करतो.
त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचेसुद्धा चांगल्याप्रकारे संरक्षण करायला हवे.जीवन सुंदर बनवायचे असेल तर आजुबाजूला असणा-या काही आपल्या चांगल्याप्रकारे जीवन जगणा-या जीवनामध्ये ढवळाढवळ करण्या-या वाईट प्रवृतीची माणसे असतात.ते नेहमी चांगल्या माणसाच्या पाठीमागे त्याचे कसे वाईट करु यासाठी लागत असतात.
पण अशा प्रवृत्ती असणा-या व्यक्ती ओळखून आपली जगण्याची दिशा ठरवावी जेणे करुन आपल्या चांगल्या जीवनाचे नुकसान होणार नाही.कारण जीवन हे सुंदर आहे ते पुन्हा पुन्हा येणारे नाही.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590.
⬆⬇↗↙⬅➡🔁🔄
========***********=======
*आजची बोधकथा*
*साधू आणि यक्ष*
एक साधू तपश्चर्येस एका निर्जन स्थळी बसले होते. त्या ठिकाणी एका यक्षाचे वास्तव्य होते. या गोष्टीची साधूला कल्पना नव्हती. ते जेव्हा तेथे पोहोचले तेव्हा निर्जन स्थान पाहून त्यांनी तेथेच ध्यानधारणा सुरु केली. त्या वेळी यक्ष तेथे नव्हता. रात्री जेव्हा यक्ष तेथे आला तेव्हा आपल्या जागेवर दुस-यास व्यक्तीला पाहून त्याला राग आला. त्याने मोठ्याने आरडाओरड सुरु केली, पण समाधी अवस्थेत असलेल्या साधूवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. यक्षाने मग हत्तीचे रूप घेऊन त्यांना भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते ध्यानस्थ असल्याने त्यांच्यावर याचा काहीच परिणाम झाला नाही. मग यक्षाने वेगवेगळी रूपे घेऊन साधूला घाबरविण्याचा प्रयत्न केला. कधी तो वाघ, सिंह, तरस, कोल्हा अशा जंगली प्राण्यांची रूपे घेतली तरी साधूच्या ध्यानात काहीच खंड पडेना. शेवटी त्याने विषारी सापाचे रूप धारण करून त्यांना दंश केला तरीही त्यांच्यावर याचा काहीच परिणाम दिसेना. इतक्या प्रयत्नानंतरही साधूवर कोणताही परिणाम न झाल्याने यक्ष झालेल्या श्रमाने थकून सर्परूपातच विश्रांती घेऊ लागला. थोड्याच वेळात साधूंची समाधी अवस्था पूर्ण झाली व ते जागे झाले व त्यांची नजर सर्परूपी यक्षावर पडली. त्या नजरेत इतके प्रेमभाव भरलेले होते की त्या कृपादृष्टीने सापाच्या अंगातील विष अमृत बनले. यक्ष साधूंना शरण गेला व त्याने त्यांना आदरपूर्वक वंदन केले.
तात्पर्य – एकाग्रता, स्नेह आणि प्रेमभावनेने कोणावरही विजय प्राप्त करता येतो.
वर्तमानपत्रातून संग्रहीत
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment