फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 09 जानेवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 09/01/2017 वार - सोमवार 
========***********=========
        *📆 . . *दिनविशेष . . 📆*

           . *राष्ट्रीय पर्यटन दिन*

⌛१८८० : क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झाली.
⌛१९२२ : हरगोविंद खुराना, नोबेल-पुरस्कृत भारतीयवंशी जैव-रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म
⌛२००४ : शंकरबापू आपेगावकर- राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक यांचा मृत्यू

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ महाबळेश्‍वर गोठले, महाबळेश्‍वरमध्ये दुसर्‍या दिवशी हिमकणाची दुलई कायम
2⃣ दूध दोन रुपयांनी महागणार
3⃣ ३१ जानेवारीलाच धडकणार मुंबईत मराठा क्रांती मोर्चा
4⃣ डेबिट-क्रेडिट कार्ड पेट्रोल पंपावर बंद
5⃣ राजकोटमधील सहकारी बँकेतील ८७१ कोटी रुपयांचा संशयित व्यवहार उघड
6⃣ शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर 20 जानेवारीपासून होणार पुन्हा प्रक्रिया
7⃣ इंग्लंड संघाचा नेटमध्ये कसून सराव

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
ज्ञानाशिवाय मनुष्य आंधळा आहे आणि कलेशिवाय जीवन नीरस आहे.

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *मनुष्य*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤भीमाशंकर भालेकर
👤माधव नरवाडे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ मुक्त कविता @@*

   जगण्याचे नाटक *

जे व्हायचे ते झाले अन् संपूनही गेले

जाता जाता आठवणींचे प्याले भरून गेले


किती करावे विषयांतर तरी फिरून आले

त्याच त्याच वाटेवरून पुन्हा विचार कोसळले


घडले ते रामायण, झाले ते महाभारत

तरी पुन्हा अयोध्येत सीता शोधणे आले


जमला तो जमाव, मागे सीतेस वनवास

एकटेपणातही पुन्हा स्वतःस शोधणे आले 


उमेद मिळाली जखम भरली तरी पुन्हा 

जननिंदेस सामोरे जाणे आले...


जगण्याच्या नाटकांत आपलेच आपल्याशी भांडण 

वैर नको मनाशी, म्हणून पुन्हा मनाला स्वैर सोडणे आले 


किती भूमिका, किती नातलग

ओळखिचे सारे

जपताना नात्यांना कधी खोटे, कधी खरे बोलणे झाले 


वाटेत वेदनांना टाळले कितीदा तरी... 

कोंडमारा मनाचा होताना, भावनांशी भांडण झाले... 


© सौ. शशिकला बनकर, भोसरी, पुणे 

========***********=========
*आजचा*
♻ ♻ *॥ विचार धन ॥* ♻ ♻

*व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र यांच्या जीवनात भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ नेहमीच असतात. जीवनसरिता पुढे पुढे वाहात जाते. पाणी पुढे वाहात जाते तेव्हा मागील काळ हा भूतकाळ असतो. पाण्याला पुढे जायचे असते तेव्हा पुढचा काळ हा भविष्यकाळ असतो. जीवनप्रवाहाचे तसेच आहे. एखादे मुल वढत असते, ते मोठे होते, तरूणवयात हे मुल असते, तैव्हा बालपण हा भूतकाळ असतो. तारूण्य हे वर्तमान असते, वृद्धावस्था हा भविष्यकाळ असतो.*

*ग.दि.माडगुळकर यांनी या काळाचं सुंदर वर्णन एका गीतात शब्दांकित केले आहे...*
          *मुकी अंगडी बाळपणाची*
          *रंगीत वसने तारूण्याची*
          *जीर्ण शाल मग उरे शेवटी*
          *लेणे वार्धक्याचे...*
*एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे।*
*जीवनात खरी प्रगती करायची असेल, तर भूतकाळाला कधीही विसरता कामा नये; कारण भूतकाळ हा इतिहास असतो. एका तत्ववेत्त्याने फार सुंदर शब्दात भूत, भविष्य आणि वर्तमान या काळांचे आपल्या जीवनातले महत्व सांगितले आहे. भूतकाळाच्या खांद्यावर बसूनच वर्तमानकाळ, भविष्यकाळाची सुंदर स्वप्ने पाहू शकतो. म्हणून भूतकाळ मागे टाका; पण त्याला विसरू नका, वर्तमान जगा; पण भूतकाळाला आठवा तरच उज्ज्वल भविष्य घडविता येई, हा विचार खरंच मोलाचा आहे.*

         🔰 *॥ रामकृष्णहरी ॥* 🔰
            🔅🔅🔅🔅🔅🔅
     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯  विचारवेध.........✍🏻
➖➖➖➖➖➖➖➖
आपल्यामध्ये जेव्हा रामायणातल्या  गोष्टी चालतात तेव्हा रामाच्या आदर्श गुणावर प्रकाश टाकला जातो आणि महाभारतातल्या जेव्हा गोष्टी चालतात तेव्हा निती अनितीवर चाललेलं राजकारण यावर चर्चा चालते.या दोन्हीतून जेव्हा आपल्या जीवनाशी संदर्भ लावल्या जातो तेव्हा आपल्याला कसे जीवन जगायचे याचे ज्ञान प्राप्त होते.त्यातून माणूस जे आदर्श विचार आहेत तेच वास्तव जीवनामध्ये आचरणात आणून जगण्याचा प्रयत्न करतो. तोच जीवनात यशस्वी होतो हे निश्चितपणे सांगता येते.आपल्या दैनंदिन जीवनात रामायण,
महाभारत,वेद,ऋचा,बायबल,कुराण,इ.ग्रंथाचॆ वाचन केल्यास त्यातून आपणास आदर्श जीवन जगण्याची दिशा मिळते यात संशय नाही.

- व्यंकटेश काटकर,नांदेड
  संवाद.9421839590

📕📝📕📝📕📝📕📝
========***********=======
        . *मैफिल-ए-इक्बाल*

              . *मराठी*

काळजाला वास्तवाचे भान यावे
आसवांचे रोज थोडे दान द्यावे !

                   . *उर्दू*

थाम ले मुझे अपनी बाहों में अभी कसकर
मैं रेत हूँ सेहरा का.. हातों से फिसल जाऊंगा।

- डॉ. शेख इक्बाल मिन्ने
  7040791137
========***********=======
*आजची बोधकथा*
            
🌺 *अडवणूक* 🌺
=================
*एक कुत्रा गोठ्यातल्या गव्हाणीत बसला असता तेथे एक भुकेला बैल गवत खायला आला. पण तो कुत्रा त्याला गवत खाऊ देईना. तो त्याच्या अंगावर भुंकू लागला. तेव्हा बैल त्याचा धिक्कार करून त्याला म्हणाला, 'अरे. क्षुद्र प्राण्या, हे गवत तूही खात नाहीस नि मलाही खाऊ देत नाहीस.तु मला असे अडवून तुला ह्या गवताचा काय फायदा होणार.त्यापेक्षा माझे पोट मला भरु दे तु असा विनाकारण मला ञास देऊ नकोस, तुझ्या या अशा वागण्यामुळे तुला सदा दारिद्रय अवस्था येईल असे.*'

*तात्पर्य: काही लोक इतक्या छोट्या  मनाचे आणि दृष्ट विचारांची  असतात की एखाद्या वस्तूचा स्वतःला उपयोग नसला तरी दुसर्‍याला त्याचा उपयोग करू न देता ती अडवून ठेवतात.चांगल्या विचारातुनच चांगली कृती घडते.म्हणून विचार चांगले ठेवा.*
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments

  1. फ्रेश माॅर्निग छान असते

    ReplyDelete

Post a Comment