फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 10 जानेवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 10/01/2017 वार - मंगळवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*
⌛१९२० : जिनिव्हा येथे राष्ट्रसंघाची स्थापना झाली. याच दिवशी युनोचे पहिले अधिवेशन भरले.
💥 जन्म -
⌛१९४० : येशु दास, भारतीय पार्श्वगायक.
⌛१९७४ : ॠतिक रोशन, भारतीय चित्रपट अभिनेता.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
 1⃣ हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी राज्यातील रस्ते, वीज आणि पाण्याची सुविधा पूर्ववत करण्यासाठी दिला 25 कोटींचा निधी
2⃣  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश धोरणांवर दिलेल्या भाषणांचे पुस्तक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले प्रकाशित 
3⃣  भारतात सर्वात मोठी विदेशी गुंतवणूक रेल्वे क्षेत्रात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
4⃣  अमेरिकेची राज्य सहाय्यक सचिव निशा बिस्वाल यांना राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून 'प्रवासी भारतीय सन्मान' प्रदान.
5⃣  हिमाचल प्रदेशातील जवळपास 450 रस्ते वाहतुकीसाठी बंद, बर्फवृष्टीनंतर 100 रस्ते केले स्वच्छ, जनजीवन विस्कळीत
6⃣  पेट्रोल पंपचालक 13 जानेवारीपर्यंत कार्डने पैसे स्वीकारू शकतात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री, धर्मेंद्र प्रधान
7⃣  धोनीवर राजीनाम्यासाठी दबाव आणला हे वृत्त चुकीचं असून कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय धोनीनं स्वतःहून घेतला आहे निवड समितीचे प्रमुखएमएसके प्रसाद

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" मोहाच्या क्षणी बुद्धिवर भावना मात करते."

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *क्षण*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 शिनू रेड्डी , बाळापुर
      साई सुपर मार्केट, धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*     
   
       *" वेगळी चूल "*

स्वतःची पोळी भाजण्यासाठी
वेगळी चूल मांडली जाते
त्याच साठी तर सून
सासूला भांडली जाते

भांडण तंटे करून
वेगळी चूल मांडतात
आपआपले प्रश्न पुन्हा
एका उखळात कांडतात

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
⛳⛳ *॥ विचार धन ॥* ⛳⛳

*आपल्या सर्व संत मंडळींनी जे जीवनाचे सार आणि सार्थक सांगितले ते अध्यात्मविद्येच्या जोरावर सांगितले आहे. 'आधी संसार करावा नेटका, मग परमार्थ विवेका' असे जे समर्थांनी सांगितले ते फार खोलवर जाऊन आपण विचारार्थ ठेवले पाहिजे. संतानी सांगितलेले अध्यात्म हे वरवरचे नाही. ते गहन आहे. आपण आपले रोजच्या जगण्यातले एखादे काम जर तन्मयतेने करत असू तर तिथेही अध्यात्म प्रकट होत असते; त्यासाठी अध्यात्म या शब्दाचा व्यंगार्थ लक्षात घ्यावा लागेल.*

*ज्याला या विद्येचे गमक कळले त्यालाच वैराग्य साधता येते. या संकल्पना दूर कुठेतरी जाऊन अनुसरणे कुणाला मान्य नाही. मी वर्गात जाऊन शिकवितो, त्यावेळी 'शिकविणे' या क्रियेशी मी किती तादात्य पावतो हा प्रश्न प्रत्येक शिक्षकाने स्वत:ला विचारला पाहिजे. आसपासच्या सगळ्या गोष्टी विसरून जर शिकविणे या एकाच क्रियेशी मी जोडला गेलो, तर माझ्याकडून होणारे काम पाहून विद्यार्थी तृप्त होतील. तीच तृप्तता मला अध्यात्माचा नवा धडा देणारी असेल. त्यातली अतृप्ती मला ज्या दिशेने घेऊन जाईल त्या स्थळीही मी स्वत:चा शोध घेतला पाहिजे, तरच वैराग्याचा अर्थ आकलनात येईल.*

          ⛳ *॥ रामकृष्णहरी ॥* ⛳
           ⛳⛳⛳⛳⛳⛳
      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*

🎯 विचारवेध.........✍🏻

➖➖➖➖➖➖➖➖

पाण्यावर येणारे बुडबुडे किती मनाला आकर्षक वाटतात.ते पाहून आपल्याला वाटते की ते हातावर घेऊन त्याच्यासोबत आनंद लुटावा;परंतु तसे होत नाही.कारण त्यांचं आयुष्यच अल्प असतं तरी ते इतरांना आनंद देऊन जातात आणि दुःख घालवून जातात.

आपलं तर आयुष्य दीर्घ आहे.आपणही आपल्या आयुष्यात कुणाचेही मन न दुखवता आनंदीत कसे ठेवता येईल याचा सातत्याने प्रयत्न करायला हवे.आपले जरी आयुष्य दीर्घ असले तरी पाण्यावरच्या बुडबुड्यासारखेच आहे.केव्हा कोण कुठे असेल काही सांगता येत नाही.अभिमान कधीही मनाला स्पर्श करु देऊ नये .

- व्यंकटेश काटकर,नांदेड.

   संवाद.9421839590.

🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺

http://epunyanagari.com/epapermain.aspx?eddate=1/10/2017%2012:00:00%20AM&queryed=42&a=11&b=247843#

*पोशाख म्हणजे व्यक्ती ओळख* हा लेख आज पुण्यनगरीमध्ये प्रकाशित झाला आहे. पूर्ण लेख वाचून अभिप्राय कळवावे. 

*तुमचा पोशाख कोणता ?*

========***********=======
             . *मैफ़िल-ए-इक्बाल*

                *मराठी*

झेलतो सारेच त्यांचे वार छातीवरी माझ्या
काळजाचे घाव कोणालाच मी दाखवत नाही।

                   *उर्दु*

अंधेरा हो चुका है चारो ओर ये बात मान ले तू
तेरे ना माननेसे सुरज रात में नही निकलनेवाला

- *डॉ शेख इक्बाल मिन्ने*
     ७०४०७९११३७
========***********=======
*आजची बोधकथा*
            . *सवय*

एका माणसाने त्‍याच्‍या घरी एक पोपट पाळला होता. पिंज-यात ठेवलेल्‍या पोपटाला चांगले खायलाप्‍यायला मिळत असे व पोपट बोलका असल्‍याने घरातील लोकांकडून त्‍याचे फार कौतुकही केले जाई. पण पोपटाच्‍या मनात मात्र पारतंत्र्याचे शल्‍य दाटून येई. अखेर एकेदिवशी पोपटाला संधी चालून आली. त्‍या माणसाने पोपटाला खाणे देण्‍यासाठी पिंज-याचे दार उघडले होते व त्‍याच्‍याहातून ते तसेच उघडे राहिले होते. माणसाला अचानक काही काम आल्‍याने तो ते 
दार उघडे टाकून निघून गेला असता 
पोपट पिंज-याच्‍या बाहेर निघून गेला. पण लहानपणापासूनच पिंज-यात राहिला असल्‍याने त्‍याला फारसे नीट उडताच येत नव्‍हते. एका झाडावर गेला असता त्‍याला इतर पोपटांशी बोलता येईना कारण लहानपणापासूनच तो परकी भाषा शिकत असल्‍याने त्‍याला पोपटांची भाषा येत नव्‍हती म्‍हणून इतर पोपटही त्‍याला सहकारी मानत नव्‍हते. पिंज-यात आयते खायची सवय असल्‍याने त्‍याला अन्न मिळवणे अवघड जाऊ लागले व ऊन वारा पाऊस यांची कधीच सवय नसल्‍याने तो आजारी पडला व 
मरून गेला.

तात्‍पर्य : - जास्‍त काळ पारतंत्र्यात(गुलामगिरीत) राहिल्‍याने तशीच गुलामगिरीची सवय अंगात मुरुन राहते. मग परक्याची भाषा, संस्‍कृतीच आपली वाटू लागते आणि मिळालेले स्‍वातंत्र्य टिकवण्‍यासाठीची जिद्द अंगी राहत नाही. परक्‍या संस्‍कृतीचे चांगले काही घेताना आपल्‍या संस्‍कृतीचे विस्‍मरण होऊ न देणे हाच खरा शहाणपणा.
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments