फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 11 जानेवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 11/01/2017 वार - बुधवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*
⌛१९१६ : नेल्सन मंडेला यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला.
⌛१९२२ : मधुमेहाच्या रुग्णावर प्रथमतः इन्सुलिनचा प्रयोग केला गेला.
💥 जन्म -
⌛१८९८ : ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार विजेते, मराठीतील विख्यात साहित्यिक वि.स. खांडेकर
💥 मृत्यू -
⌛१९६६ : लालबहादूर शास्त्री, भारताचे माजी पंतप्रधान.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ भारतीय अर्थव्यवस्था देशात सर्वाधिक डिजिटल होण्याच्या मार्गावर
2⃣ २६ जानेवारीपासून माहिती अधिकार होणार  आॅनलाइन, राज्यातील माहिती अधिकारांतर्गत अर्ज करणा-यांना २६ जानेवारीपासुन व्यक्तीगत अर्ज करण्यासह माहिती मिळविण्यासाठी थेट आॅनलाइन कार्यप्रणालीचा करावा लागणार वापर
3⃣ भारत जगातील 6 व्या क्रमांकाचा सर्वात जास्त उत्पादन करणारा देश ठरला आहे  पंतप्रधान नरेंद्र मोदी
4⃣ राज्यभरातील अधिकारी-कर्मचारी जाणार संपावर, प्रलंबित मागण्यांसाठी 18 ते 20 जानेवारीला संप.
5⃣ शांतिनिकेतन आणि प्राचार्य पी. बी. पाटील फोरमचा 'कर्मयोगी पुरस्कार' पोपटराव पवार यांना जाहीर, 15 जानेवारीला होणार प्रदान
6⃣ नवज्योत सिंग सिद्धू बुधवारी काँग्रेस पक्षात करणार प्रवेश
7⃣ अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या टिच्चून माऱ्यानंतरही भारत ‘अ’ संघ पहिल्या सराव सामन्यात इंग्लंड इलेव्हन संघाविरुद्ध ३ विकेट्सने झाले पराभूत
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका.

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *कर्मयोगी*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 साई बल्फेवाड यादव

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

" खरं हे खरं असतं "

खरं बोलणारा माणूस
येथे वेडा ठरवला आहे
खरा माणूस खोटारडा
विचार डोक्यात भरवला आहे

लक्षात ठेवा नेहमी
खरं हे खरं असतं
ख-याला खोटं ठरवण
कधीच बरं नसतं

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
☀ ☀ *॥ विचार धन ॥* ☀ ☀

*विरेंद्रराजे या नावाचे एक संस्थानिक होते. नगरप्रदक्षिणा करण्यासाठी ते आपला दरबारी लवाजमा घेऊन पहाणी करीत होते. एक दगडफोड्या अत्यंत एकाग्रतेने दगड फोडण्याचे काम करीत होता. राजा समोर येऊन उभा राहिला तरी त्याचे लक्ष नव्हते. शरीरातून घाम गळत होता, त्याचा घण आघात करीत होता. राजा गुणग्राहक होता, त्याला त्याची एकाग्रता भावली. राजाने त्याला आपल्या दरबारात काही काम दिले. प्रत्येक काम तो एकनिष्ठेने, प्रामाणिकपणे व चोखपणे करू लागला. राजाची त्याच्यावर मर्जी बसली, बढती देता देता राजाने त्याला प्रधानपद दिले.*

*प्रधानाने राज्याला प्रगतीशिल बनवले. राजाने त्याचा सत्कार केला. अनेक चित्रकारांकडून प्रधानाची उत्कृष्ट चित्र काढली. त्यातील तीन उत्कृष्ट चित्रांतून प्रधानाला एक सर्वोत्तम चित्र निवडायला सांगितले. प्रधानाने एक चित्र निवडले, राजाने त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला..पूर्वी मी दगडफोड्या होतो, या चित्रात दगडफोड्याही दाखवला आहे, माझा भूतकाळ उभा केला. म्हणून हेच चित्र सुंदर आहे. प्रधान आपला भूतकाळ विसरला नव्हता.*

     🌟🌟 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌟🌟
                 ☘☘☘☘☘
     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध.. ........✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰

एखादी व्यक्ती वयाने किंवा शरीराने मोठी झाली म्हणजे ती महान होऊ शकत नाही.
तर ज्या व्यक्तीमध्ये चांगले विचार,चांगली वृत्ती व चांगली कृती,समंजसपणा,परोपकारी वृत्ती,दुस-याचे म्हणणे शांतपणे घेऊन त्यावर उपाय शोधून मार्ग काढणे अशा अनेक चांगल्या गुणांचा अंतर्भाव ज्यांच्यामध्ये आहे अशी व्यक्ती महान आणि समाजप्रिय होऊ शकते.
अशा महान व्यक्तीला नेहमी वंदन करतात.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
========***********=======
🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷
~~~~~~~~~~~~~~~~~~~
   बुधवार, ११ जानेवारी,२०१७

        *मैफ़िल-ए-इक्बाल*

                *मराठी*

तक्रार सांग आता कोणाकडे करावी
माझ्याच माणसांनी केलाय घात माझा

                   *उर्दु*

अगर मिलना है तो अपनी मर्जीसे मिल मुझे
मांगे का उजाला मुझे अच्छा नही लगता

- *डॉ शेख इक्बाल मिन्ने*
     ७०४०७९११३७
@@@@@@@@@@@@@@
*आजची बोधकथा*
            *वक्ता आणि श्रोते*

एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्‍वाच्‍या विषयावर तळमळीने भाषण देत होता. मात्र श्रोत्‍यांची चुळ‍बुळ सुरु होती. काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्‍यावर खेळणा-या लहानमुलांकडे बघत होते. तेव्‍हा श्रोत्‍यांचे आपल्‍या व्‍याख्‍यानाकडे अवधान खेचून आणण्‍यासाठी वक्त्याने एक गोष्‍ट सांगायला सुरुवात केली. कथेची सुरुवात होताच जादूची कांडी फिरल्‍याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्‍ट ऐकू लागले. वक्ता म्‍हणाला,'एकदा एक देव, एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्‍या प्रवासाला निघाले. चालता चालता त्‍यांना वाटेत एक नदी लागली. चि‍मणीने उडून पैलतीर गाठला. पाणसर्प पाण्‍यातून पोहत पोहत पलीकडे पोहोचला.'' बस्‍स इतकेच असे सांगून वक्‍त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले. श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले,'' अहो वक्तेमहाशय, देवाचे पुढे काय झाले, त्‍याने कशी काय नदी पार केली. त्‍या तिघांचे पुढे काय झाले.'' वक्‍त्‍याने शांतपणे उत्तर दिले,''देवच तो; तेव्‍हा ती नदी पार करून जाण्‍याचे सामर्थ्‍य त्‍याच्‍याठायी असणे सहाजिकच आहे. तो पाण्‍यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्‍याला बाजूला सारून जाण्‍याचीही 
त्‍याच्‍यात होती पण तो अलिकडच्याच 
तीरावर थांबला.'' श्रोत्‍यांनी मोठ्या उत्‍कंठेने विचारले की देवाने असे अलिकडेच थांबण्‍याचे कारण काय. यावर वक्ता म्‍हणाला,'' ज्‍या मूर्खाना महत्‍वाच्‍या विषयावरचे असणारे व्‍याख्‍यान न आवडता मनोरंजक गोष्‍टी आवडतात त्‍या मुर्खांचा विचार करत देव नदीकिनारी बसून आहे. जर तुम्‍ही या महत्‍वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्‍यावर काही उपाय केले व आपल्‍या राज्‍याला वाचविले तर देव निश्र्चित पलीकडच्‍या तीरावर निघून जाईल'' वक्‍त्‍याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्‍यांनी पुढील व्याख्‍यान शांतपणे ऐकून घेतले.

तात्‍पर्य :- काहीवेळेस आपल्‍या चांगल्या व देशहिताच्‍या योजना लोकांच्‍या गळी उतरविण्‍यासाठी युक्तीप्रयु‍क्तीचा वापर करावाच लागतो.
वर्तमानपत्रातून संग्रहित
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments