*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 13/01/2017 वार - शुक्रवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१६१० : गॅलिलियोने गुरूचा चौथा उपग्रह, कॅलिस्टोचा शोध लावला.
⌛१९३० : मिकी माउसची चित्रकथा प्रथम प्रकाशित
💥 जन्म -
⌛१९३८ : भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा.
.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ टीसीएसचे प्रमुख नटराजन चंद्रशेखरन बनले टाटा सन्सचे चेअरमन
2⃣ ग्राहक आणि डिलर्सना पेट्रोल पंपांवर डेबिट कार्डच्या व्यवहारावर एमडीआर शुल्क द्यावे लागणार नाही पेट्रोलियम मंत्रालय
3⃣ समाजाच्या सगळ्या घटकापर्यंत विकास पोहचवायचा आहे, कोणताही समाज एकमेकासमोर उभा करायचा नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4⃣ कडाक्याच्या थंडीमुळे नोएडा दिल्लीतील शाळा 15 जानेवारीपर्यंत बंद
5⃣ कर्णधार अजिंक्य रहाणेची (९१) आकर्षक अर्धशतकी खेळी आणि रिषभ पंतचा (५९) आक्रमक तडाखा या जोरावर भारत ‘अ’ संघाने आपल्या दुस-या सराव सामन्यात इंग्लंड इलेव्हनचा ६ विकेट्सने केला दणदणीत पराभव
6⃣ सरिता देवी बनली व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये जाणारी पहिली भारतीय महिला.
7⃣ पाकिस्तानमधील कराचीतला जलदगती गोलंदाज मोहम्मद अली याने केला विक्रम, 19 वर्षांखालील आंतरजिल्हा सामन्यात या खेळाडूने विरोधी संघाचे सर्व 10 खेळाडूना केले बाद
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
"क्रोधामुळे प्राप्तीचा, मानामुळे विनयाचा, मायेमुळे मित्राचा व मोहामुळे सर्वांचा नाश होतो "
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*प्राप्ती*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 माधव सोनटक्के, सहशिक्षक, अर्जापुर
👤 व्यंकटेश भांगे, सहशिक्षक, धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
" माणूसकी "
सत्ता मिळताच माणूस
माणूसकी विसरतो
सत्ता डोक्यात घालून
विचार ही घसरतो
सत्ता पद सांभाळत
माणूसकी जपली पाहिजे
चार माणसांत वावरतांना
वर्तणूक वपली पाहिजे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🔹 🔷 *॥ विचार धन ॥* 🔷 🔹
*प्रभु रामचंद्र वनवासात गेले आणि त्यांचे बंधू राजा भरत यांनी त्यांच्या पादुका मस्तकी लावून 'संकल्प' केला की यापुढे या सिंहासनाचा खरा वारस राजा रामचंद्र परत येईपर्यंत मी अत्यंत त्यागी वृत्तीने त्यांच्या नावाने राज्य चालवेल. राजा भरताचा मनोनिग्रह पुढील चौदा वर्षात कणभरही ढळला नाही. भरताचे आत्मबळ कैकयीच्या आमिषांना बळी पडले नाही. अगदी त्याउलट दुर्योधनाचा संकल्प, सुईच्या अग्रावर राहील, इतकीही जमीन मी पांडवांना देणार नाही. भरताच्या संकल्पामुळे रामराज्य टिकले, तर दुर्योधनाच्या संकल्पामुळे महाभारत घडले. उत्कर्ष व विध्वंस दोन्ही नेटाने पूर्ण होण्यास संकल्प कारणीभूत होतो. इतकी ताकद त्यात असते.*
*छत्रपती शिवरायांनी कोवळ्या वयात मोजक्या शिलेदारांना हाताशी धरून महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याचा 'संकल्प' सोडला आणि संपूर्ण शक्ती-युक्तीने हिंदवी स्वराज्य स्थापले. ते आणताना अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. ते डगमगले नाहीत, की मावळेही हटले नाहीत. वेळोवेळी संकल्प आणि हिंदवी स्वराज्याची 'आण' त्यांनी स्वत: आठवली व त्याची आठवण सरदारांना करून दिली व वीरश्री खेचून आणली. नुसते संकल्प सोडून भागते का ? संकल्प हा मनाला दिलेला आदेश. पण बुद्धीच्या बळावर तो पूर्ण करण्यास संपूर्ण शक्तीनिशी त्याच्या मागावर रहावे लागते.*
🔸🔶 *॥ रामकृष्णहरी ॥* 🔶🔸
🔻🔻🔻🔻🔻
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आजची लिंक*
*ऑफलाइन शाळेची ऑनलाइन कामे*
http://nasayeotikar.blogspot.com/2016/08/on-off.html
शिक्षक मंडळींना सध्या कोणकोणती कामे ऑनलाइन करावी लागत आहे आणि काय समस्या निर्माण होत आहे याविषयी प्रस्तुत लेखात मांडणी करण्यात आली आहे.
========***********=======
*आजची बोधकथा*
*रागावर विजय*
भूदान चळवळीच्या काळातील ही गोष्ट आहे. या चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे होते. त्यांची पदयात्रा सुरु होती. आपल्या काही शिष्यांसह विनोबाजी मीराजींच्या आश्रमात थांबले होते. अल्पशा विश्रांतीनंतर त्यांची पदयात्रा पुन्हा सुरु झाली. त्यावेळी ते हरिद्वारकडे चालले होते. विनोबाजींची प्रकृती थोडी ठीक नव्हती. त्यांची कंबर आणि पाय दुखत होते. त्यामुळे त्यांना खुर्चीत बसवून नेण्यात येत होते. मध्ये मध्ये खुर्चीतून उतरून पायी चालायचे. तेव्हा एक शिष्य त्यांच्याजवळ येऊन म्हणाला,'' बाबा, मला खूप राग येतो, मी काय करावे'' विनोबाजी म्हणाले,'' मी लहान असताना मलाही खूप राग यायचा, मग माझ्याजवळ मिश्री असायची ती मी तोंडात ठेवायचो, परंतु कधीकधी ती ही नसायची'' मग तुम्ही काय करत होता असे त्या व्यक्तीने विचारले. विनोबाजी म्हणाले,'' मी यावर खूप विचार केला, मग माझ्या मनात एक गोष्ट आली. जेव्हा आपल्या मनाविरूद्ध एखादी गोष्ट आली तर लगेच नाराज होतो जर तो क्षणच आपण टाळला तर रागावर विजय मिळवू शकतो. आनंद आणि नाराजी यावर आपण तेव्हाच प्रकट करतो तो पहिलाच क्षण आपल्यावर वरचढ ठरू पाहतो. तो क्षण टाळणे कठीण आहे. पण मनन करून तो टाळता येतो. मी यावर खूप मनन केले, यामुळेच जीवनात कितीही मोठी आपत्ती आली तरी मी संयम ढळू दिला नाही.''
तात्पर्य :- विचारपूर्वक उचललेले पाऊल आयुष्याला योग्य दिशा देते.
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment