फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 14 जानेवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 14/01/2017 वार - शनिवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*
     *भूगोल दिन किंवा मकरसंक्रांत*

⌛१९९३ : मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
💥 जन्म -
⌛ १८८२ : रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत.
💥 मृत्यू -
⌛१९३७ : जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राज्यात आयसीएसई दहावी आणि आयएससी बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलल्या.
2⃣ सोशल मिडिया विषय उपस्थित करण्याचे चांगले माध्यम नाही, त्याऐवजी तक्रार पेटीचा वापर करा लष्करप्रमुख बिपिन रावत.
3⃣  समाजवादी पक्षाच्या सायकल चिन्हावरील निर्णय निवडणूक आयोगाने ठेवला राखून
4⃣ मुंबईत मकरसंक्रांतीच्या औचित्यावर पतंगबाजीसाठी नायलॉन मांजा वापरण्यास पोलिसांनी घातली बंदी
5⃣ कोलकात्याच्या ब्रिगेड परेड मैदानावर आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या सभेला कोलकाता उच्च न्यायालयाने दिली परवानगी.
6⃣  भारतात विभागीय कर्णधारपद चालत नाही, मी बाजूला होण्याची ही योग्य वेळ होती महेंद्रसिंग धोनी यांचे प्रतिपादन
7⃣ वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने टी-20 मालिकेसाठी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा करण्यास दिला नकार.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
समाजाचा कौल हा पुष्कळ वेळा भाषणापेक्षा मौन व्रतानेच अधिक प्रभावीपणे व्यक्त केल्या जातो .

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *पुष्कळ*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 बालाजी माळवतकर, सहशिक्षक, उमरी

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@

   " तिळगुळ "

हेवेदावे विसरू सारे
चला तिळगुळ देऊ
अनोखा हा आनंद
आपण सारे घेऊ

दिल्या घेतल्याने आनंद
बघाच कसा वाढतो
चिमूटभर तिळगुळ
माणूस माणूस जोडतो

मकरसंक्रातीच्या शुभेच्छा

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
☘ ☘ *॥ विचार धन ॥* ☘ ☘

*'मी कोण' हे जोवर आपण ओळखत नाही तोवर, वैभवाच्या शिखरावर जरी गेलो तरी आपल्याला समाधान मिळणार नाही. ज्याच्यापासून प्रपंच झाला, त्याला ओळखता आले पाहिजे. देहच सत्य नाही तर त्यावर उभारलेली इमारत कुठून सत्य असणार ? ठिगळे लावून आपण प्रपंच करतो, मग त्यात कमतरता असणारच. कोळसा उगाळून पांढरा रंग मिळेल हे जसे वेडेपणाचे आहे, तसे प्रपंचात 'सुख मिळवीन' हे म्हणणे आहे. सुख-दुःख हे जाणिवेत आहे.*

*आपली वासना गेली की,  सुख-दुःख रहात नाही. वासना मारायला, देवाचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या श्वानाप्रमाणे आहे, त्याला नुसते हाड-हाड करून ते बाजूला जात नाही. कारण आपणच त्याला लाडावून ठेवले आहे, म्हणून देवपूजेच्या वेळीसुद्धा ते देवघरात येते. चांगली वासना तेवढीच आत येऊ द्यावी म्हटले, तर तिच्याबरोबर वाईट वासनाही हळूच आत येते."वाईट वासनेमध्ये चांगल्या वासनेला मारण्याचे बळ आहे हे ओळखता आले पाहिजे."*
           
         🌻 *॥ रामकृष्णहरी ॥*  🌻
           🔷🔷🔷🔷🔷🔷
      *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
              *9167937040*
========***********=========
*आज*
🌸  संक्रांतीचा सण...
〰〰〰〰〰〰

तीळ गुळ आम्ही
सांगतो हो ऐका l
ठेऊ नका हेका
अबोलाचा...ll

असू आम्ही सान
नसे अभिमान l
मानतो समान
मंत्र हाच...ll

आम्हा सारे देती
नानाची आकार l
स्वप्न ते साकार
करु आम्ही....ll

भेटीगाठी होती
आम्हा कारणाने l
रहा एकोप्याने
जीवनात.....ll

मकरसंक्रांत
असा शुभदिन l
नसे कोणी दीन
संसारात...ll

- व्यंकटेश काटकर,नांदेड

ll  मकर संक्रात दिनाच्या सर्व तीळगुळ खाणा-या बंधुभगिणींना मनस्वी शुभेच्छा...ll

🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸
🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷
~~~~~~~~~~~~~~~~~~~

        *मैफ़िल-ए-इक्बाल*

                *मराठी*

नोटबंदी सांग ही उठणार केव्हा
भाकरीचा प्रश्न हां सुटणार केव्हा

                   *उर्दु*

निंद आ कर पलकों में अटक जाती है
तेरी याद मुझे रातभर सोने नहीं देती

- *डॉ शेख इक्बाल मिन्ने*
     ७०४०७९११३७
========***********=======
*आजची बोधकथा*
           
🌺 *अंतःकरणातील गुणदोषाची पारख*🌺
===========================
एका मधमाशीने एक साधी माशी आपल्या पोळ्याजवळ आनंदाने उडत असताना पाहून तिला रागाने विचारले, 'तू इथे काय करतेस ? हवेतल्या राण्यांच्या संगतीत आगंतुकासारखे शिरणे तुझ्यासारखीला योग्य आहे काय ?' यावर साधी माशी म्हणाली, 'खरोखरच तुला राग यायला मोठे कारण घडले यात संशय नाही, तुझ्यासारख्या भांडखोर प्राण्याशी संबंध ठेवणारे वेडे असले पाहिजेत, असं मला खात्रीनं वाटतं.' रागानं संतापलेल्या मधमाशीने विचारले, 'असं का ? हे मला सांग बरं ! आमचे कायदे उत्तम असून आमचे राज्य जगात सर्वोत्कृष्ट धोरणावर चाललेलं आहे. आम्ही अत्यंत सुवासिक फुलांवर आमची उपजीविका करून मध तयार करण्याचं काम करतो, तो मध अमृतासारखा गोड असतो. त्याउलट तू नेहमी कुजलेल्या पदार्थांवर आपली उपजीविका करतेस.' माशी म्हणाली, 'आम्हाला जसं राहाता येतं तसं आम्ही राहतो, मला वाटतं की गरिबी हा काही दोष नाही, पण राग हा खात्रीने दोष आहे.

तुम्ही तयार केलेला मध गोड असतो हे मला मान्य आहे, पण तुमचं अंतःकरण मात्र द्वेषानं पूर्ण कडवटलेले आहे, कारण, शत्रूवर सूड उगविण्याच्या भरात तुम्ही तुमचा स्वतःचाही नाश करून घेता व रागात तुम्ही इतका अविचारीपणा करता की शत्रूपेक्षा तुम्ही आपलं स्वतःचंच अधिक नुकसान करून घेता. बुद्धी कमी असलेली एक वेळ परवडेल, पण तिचा आपल्याला जास्त शहाणपणाने उपयोग करता आला पाहिजे, हे लक्षात ठेवल तर बरं होईल.'
*तात्पर्य :उत्तम गुणाचा वाईट उपयोग करणारे लोक  आहेत.आपल्या अंतःकरणातील गुणदोषाची पारख आपणच करावी.*
*-----------------------------------*
*📝 संकलन 📝*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments

Post a Comment