*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 15/01/2017 वार - रविवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
*लष्कर दिन*
⌛१९९६ : भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा, संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.
⌛१९९९ : ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
💥 जन्म :-
⌛१९२६ : खाशाबा जाधव, भारतीय कुस्तीगीर
💥 मृत्यू :-
⌛२०१४ : साहित्यिक नामदेव ढसाळ (नामदेव लक्ष्मण ढसाळ)
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ लष्करात स्मार्टफोन वापराला बंदी नाही लष्करप्रमुख बिपीन रावत यांचे स्पष्टीकरण
2⃣ आम्ही कोणाच्याही विरोधात नाही तर हिंदू समाजाला एकत्र आणण्यासाठी काम करत आहोत, सशक्तीकरणासाठी हे काम करत आहोत मोहन भागवत.
3⃣ डिजिटल कॅशसाठी आपल्याकडे चांगले इन्फ्रास्ट्रक्चर आहे एन.नारायण मुर्ती यांचे प्रतिपादन
4⃣ राज्यात अनेक ठिकाणी विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघासाठी आचार संहिता सुरु असताना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षकांना आरोग्य विम्याचे कवच देण्याची घोषणा सापडली वादात
5⃣ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचा आम्ही आदर करतो अर्थ मंत्रालय.
6⃣ सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील जन्मशताब्दी वर्षानिमित्त रिओ पॅराऑलिम्पिक विजेता सुरज जाधव यास ३ लाख रूपयाचे बक्षीस देऊन गौरव.
7⃣ रणजी करंड अंतिम सामन्यात गुजरातचा मुंबईवर पाच विकेटने विजय गुजरातने मुंबईचे 312 धावांचे आव्हान केले पार, कर्णधार पार्थिव पटेल ठरला विजयाचा शिल्पकार.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" प्रत्येक देशाच्या इतिहासात नेहमी असेच दिसून येईल की, ज्या व्यक्तिंच्या ठायी आत्मविश्वास होता त्याच महान व शक्तिशाली बनल्या."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*आत्मविश्वास*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 साईनाथ अन्नमवार, नांदेड
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
*" विकतय म्हणून "*
विकतय म्हणून कधी
काहीही विकत नसतं
सोपं म्हणून लोखंड
सांगा कुठ खपत असतं
सोनं म्हणून लोखंडाला
सांगा कसं विकता येईल
सोन्याची किंमत लोखंडाला
कोण बरं कस देईल
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌹 🌹 *॥ विचार धन ॥* 🌹 🌹
*ब-याचदा आपण हर्षाने म्हणतो,'काय नितळ मनाचा माणूस आहे !' आपल्या वाणीतून काहीतरी मिळाल्याचा आनंद वाहत असतो. प्रत्येकाचा शोध हा अशाच नितळ निर्झराचा असावा बहुधा. निदान प्रत्येकाची अपेक्षा तरी अशीच असते. असा सहवास प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो, जो सुखावून जाणारा , खूप काही देणारा असतो. कधी-कधी तर हा सहवास परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने व्हावे तसा एखाद्याच्या जीवनात लख्ख प्रकाश जन्माला घालतो, पण ज्यांच्यावर या सहवासाचा कसलाच परिणाम होत नाही ते मात्र दगडच !*
*नितळ मनाची माणसं सत्याचरणी असतात म्हणून ती तेजाप्रमाणे लख्खही असतात. म्हणूनच ती दिपवून टाकतात. अशी माणसं साने गुरूजींच्या 'खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे' या वृत्तीची व निखळ प्रेम करणारी असतात. जे कुणी असे निखळ प्रेम करू शकत नाहीत, त्यांच्या मनात कसलातरी अंधार वा गढूळपणा साचलेला असतो वा ती अहं मध्ये अंध तरी झालेली असतात. अशी माणसं मग कितीही सोवळ्याच्या सोंगात सत्यनारायणाची कथा, पारायणे गाऊ लागली तरी वैराण मनात सत्याचा प्रसव होत नसतो. प्रेमाची परिभाषा फार कमी लोकांना कळते, बाकी सर्व प्रेमाचं सोंग पांघरून असतात. प्रेमाची निराळी दुनिया समजायला पोथी-पठणाची आवश्यकता नसते, तर कबिराची अडीच अक्षरे पुरेशी ठरतात. जर ते प्रेम ओठातलं नसेल, थेट काळजाच्या देठातलं असेल.*
☀☀ *॥ रामकृष्णहरी ॥* ☀☀
🔰🔰🔰🔰🔰🔰
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध.........✍🏻
〰〰〰〰〰〰〰
ज्यांच्या हृदयात दुस-याविषयी प्रेम,आत्मियता,
करुणा,त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ आहे तो इतरांच्या हृदयात आपले स्थान निश्चितच ग्रहण करतो.
केवळ स्थानच नाही तर तो आपले राज्यही त्यांच्या हृदयावर बनवतो.अशी माणसे इतरांनाही प्रिय असतात आणि परमेश्वरालाही.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590
🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
========***********=======
*आजची बोधकथा*
*आत्मनियंत्रणाचे महत्व*
एक जिज्ञासूवृत्तीचा मुलगा होता. तो कोणतीही नवी गोष्ट शिकण्यास तयार होत असे. त्याने धनुष्यबाण तयार करण्यास ते कसे तयार करतात हे शिकून घेतले. नाव बनवणा-यांकडून नाव, घराचे बांधकाम, बासरी बनविणे इ. प्रकारात तो निपुण झाला. परंतु त्याच्यात अहंकार आला, तो आपल्या मित्रांना सांगत असे. या जगात माझ्याइतका प्रतिभावंत अन्य कोणी नसेल. एकदा या शहरात बुद्धांचे आगमन झाले. त्यांनी जेव्हा या मुलाची कला आणि अहंकाराबाबत ऐकले. तेव्हा त्यांना वाटले, या मुलाकडून आपण अशी कला शिकून घ्यावी जी आतापर्यंतच्या कलांमध्ये श्रेष्ठ असेल. ते भिक्षापात्र घेऊन त्याच्याकडे गेले. मुलाने विचारले, तुम्ही कोण आहात. बुद्ध म्हणाले,''मी शरीरावर नियंत्रण ठेवणारा माणूस आहे.'' मुलाने यावर त्यांना खुलासा विचारला असता बुद्ध म्हणाले,''जो धनुष्यबाण वापरतो त्याला त्याचा वापर माहित असतो, जो नाव हाकतो, जो घराचे बांधकाम करतो त्याला ते काम माहित असते. पण जो ज्ञानी आहे तो स्वत:वर नियंत्रण ठेवतो,'' मुलाने विचारले, ते कसे काय. बुद्ध म्हणाले, '' जर कोणी प्रशंसा केली तर अभिमानाने ताठ होत नाही तसेच निंदा केली तरी तो शांत राहतो, अशी व्यक्ती नेहमी आनंदी असते. मुलाला जाणीव झाली की सर्वात मोठे कौशल्य तर स्वत:ला नियंत्रणात ठेवण्याचे असते.
तात्पर्य :- ज्यांना स्वत:ला नियंत्रणात ठेवता येते त्याला समभाव ठेवता येतो. हाच समभाव अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत आपल्याला आनंदी ठेवतो.
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment