*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 16/01/2017 वार - सोमवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१६८१ : संभाजी राजेंचा छत्रपती म्हणून राज्यभिषेक झाला
💥 जन्म :-
⌛१९२६ : ओ.पी.नय्यर, भारतीय संगीतकार
💥 मृत्यू :-
⌛१९०१ : सुप्रसिध्द अर्थशास्त्रज्ञ व न्यायमुर्ती महादेव रानडे
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं यासाठी भारताला फ्रान्सचं मिळालं समर्थन
2⃣ नवज्योत सिंह सिध्दूंचा राहूल गांधीच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश, अमृतसरमधून निवडणुक लढवण्याची शक्यता
3⃣ पश्चिम बंगाल मधील गंगासागर येथील यात्रेत चेंगराचेंगरी, मृतांचा आकडा वाढला, 6 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी.
4⃣ सैन्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी सोशल मीडियाद्वारे तक्रारी करणा-यांवर कारवाईचा जवानांना दिला इशारा
5⃣ मराठा मोर्चाच्या तारखेत पुन्हा बदल, आता 6 मार्चला होणार मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन
6⃣ मुंबई मॅरेथॉन पुरूषांच्या गटात टांझानियाचा अॅलफोंसे सिंबू विजयी.
7⃣ विराट, केदारचे दमदार शतक आणि शेवटच्या षटकातील हार्दिक पांड्याची फलंदाजीमुळे भारताचा इंग्लंडवर तीन गडी राखून विजय. मालिकेत 1-0 अशी आघाडी.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
ज्यावेळी तुम्हाला असे वाटेल की, तुम्ही कोणाला तरी नकोसे आहात त्यावेळी त्या व्यक्तिपासून दूरच रहा. भले तुमचे त्या व्यक्तीवर कितीही प्रेम असो
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*पश्चिम*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤किरण शिंदे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"पारदर्शकता "
सर्वांचाच पहा आता
पारदर्शकतेवर भर आहे
स्वतः पारदर्शक नव्हते
म्हणून त्यांना डर आहे
म्हणून बोलून पारदर्शकता
कधीच जपता येत नसते
कितीही पारदर्शक म्हणा
जे व्हायचे ते होत असते
शरद ठाकर
सेलू जि.परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌟 💧 *॥ विचार धन ॥* 💧 🌟
*आयुष्याला काही अर्थच उरला नाही. रोज उगवणा-या दिवसाच्या गर्भातून निराशाच निपजते का ? की आम्ही जगण्याच्या आकाक्षांना गोठवून टाकले आहे ? सगळं काही जवळ आहे, तरी ही निरर्थकता कोठून व का येते, याची उकलच होत नाही. खोल..आत..अगदी ह्रदयापाशी काहीतरी रूतुन बसतं आणि वाहात राहतं अश्वत्थाम्याच्या भाळी असणा-या जखमेसारखं. त्याला तर म्हणे शापच आहे अमरत्वाचा. ही भळभळणारी जखम घेऊन जगण्याचा... देहदंडापेक्षाही भयावह.*
*पण, आम्ही का बरं निरंतर ठेवतो त्याला प्रवाहित? कदाचित, ही एक अवस्था असेल मानवी जगण्याची. का आहे प्रश्नांची न संपणारी मालिका अनुत्तरित. इथून सुरू होतो आत्मशोधाचा प्रवास. सत्य सापडत नाही...काय होत राहतं? कळत नाही. पण जगात असेही अनेक असतात की जे हा चक्रव्यूह भेदून उभे राहतात...?*
*......समरवीरासारखे....!!*
⛳ *॥ रामकृष्णहरी ॥* ⛳
⚜⚜⚜⚜⚜⚜
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
9167937040
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध.........✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰
आपणास या जगात जे जे काही मिळवायचे ते ते आपल्या प्रयत्नानेच.प्रयत्न हे एकदाच करुन चालणार नाही.त्या प्रयत्नात सातत्य असायला हवे. सततच्या प्रयत्नातून कोणतीही गोष्ट साध्य करता येते आणि ते प्रयत्न मनातून असायला हवे.धरसोड वृती असेल किंवा आपला आत्मविश्वास ठाम नसेल तर शक्य होणारीही गोष्ट अशक्य होऊन जाते.
अशावेळी मनाची एकाग्रता,कामामध्ये सातत्य आणि आत्मविश्वास ह्या तीन गोष्टी कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी तसेच ते मिळवण्यासाठी आवश्यक आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590.
🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷🎺🎷
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*मैफ़िल-ए-इक्बाल*
*मराठी*
असा कोण आहे खरे बोलतो जो
जगी आरसा फ़क्त सत्यवान आहे
*उर्दु*
जब भी मिले मौका हर हुनर सिख लेना
जिन्दगी में कोई फन ज़ाया नहीं जाता
( ज़ाया - व्यर्थ )
- *डॉ शेख इक्बाल मिन्ने*
७०४०७९११३७
========***********=======
*आजची बोधकथा*
*खरा मित्र*
" एका गावात दोन मित्र राहत होते त्यांचे नाव राम आणि शाम. एके दिवशी ते फिरण्यासाठी शेजारच्या जंगलात दुपारी बाहेर पडले. जंगलात जाताना त्यांनी एकमेकांना वचन दिले की संकटात एकमेकांचे रक्षण करायचे.
ते जंगलाच्या मध्यभागी पोहंचताच अचानक एक अस्वल धावत त्यांच्याकडे येत असताना दिसले. राम स्वताचा जीव वाचवण्यासाठी पटकन शेजारच्या झाडावर चढतो पण शामला झाडावर चढता येत नाही. शाम घाबरून जातो त्याला काही सुचत नाही आणि जमिनीवर झोपतो आणि मेल्याचे नाटक करतो.
अस्वल शामच्या जवळ येते. ते शामला हुंगते. त्यानंतर अस्वल शामच्या कानाजवळ जातो. जणू काही अस्वल काहीतरी गुपित त्याच्या कानात सांगत आहे. शाम भीतीने शांत पडून राहतो.
थोडया वेळाने, अस्वलाला वाटते की शाम मेलेला आहे म्हणून ते तिथून निघून जातो. राम घाबरून खाली उतरतो आणि शामला विचारतो , ' अस्वलाने तुला काय सांगितले रे '..? त्यावर शाम उत्तर देतो की , त्याने मला सल्ला दिला की स्वार्थी मित्रापासून दूर राहा. जे मित्र संकटकाळी साथ देत नाहीत ते खरे मित्र नसतात. त्या मित्राला आपली चूक समजली.
*तात्पर्य - संकटकाळी जो मदत करतो तो खरा मित्र "*
📚📚📚📚📚📚📚📚
संकलन - साई पाटील, श्री कंप्यूटर, धर्माबाद
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment