*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 20/01/2017 वार - शुक्रवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
💥 जन्म
⌛१७७५ : विद्युत कंपनीचे मापन करण्याचे उपकरण ‘अॅंपिअर’ हे शोधून काढणारा फ्रान्सचा भौतिकशास्त्रज्ञ आंद्रे-मरी अँपियर
⌛१८७१ : प्रसिध्द उद्योगपती रतन टाटा.
💥 मृत्यू
⌛१२९७ : योगी चांगदेवाने पुणतांबे येथे समाधी घेतली.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ धर्मशालाला हिमाचल प्रदेश राज्याच्या उपराजधानीचा दर्जा, मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांची घोषणा
2⃣ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती ही खासगी शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा चांगली असल्याचे चित्र ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणात आले समोर
3⃣ डॉ. विजया राजाध्यक्ष यांना यंदाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार जाहीर.
4⃣ उत्तर प्रदेशमध्ये शाळेच्या बसची ट्रकला धडक, भीषण अपघातात 15 मुलांचा मृत्यू, 40 जण जखमी
5⃣ दिल्ली पोलिस आयुक्त अलोक वर्मा यांची सीबीआयच्या प्रमुखपदी नियुक्ती.
6⃣ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा - डेनिस इस्टोमिनने मेलबर्न रॉड लेव्हर अरेनावरील लढतीत नोवाक जोकोविकचा ७-६(८), ५-७, २-६, ७-६(५), ६-४ असा केला पराभव.
7⃣ इंग्लंडविरुद्धच्या अटीतटीच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात भारताने अवघ्या 15 धावांनी विजय मिळविला. भारताने दिलेल्या 381 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने झुंजार खेळी करत 50 षटकात 8 गड्यांच्या मोबदल्यात 366 धावा केल्या. भारताने या विजयासह मालिकाही आपल्या खिशात घातली.
💥अहमदनगरचे माजी आमदार व कम्युनिस्ट नेते पी. बी. कडू यांचे पहाटे निधन.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" छोट्या छोट्या गोष्टी केल्यामुळेच महान गोष्टी आकार घेत असतात."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*छोट्या*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 किशोर पाटील, यूनिक कंप्यूटर
👤 अहमद लड्डा, क्रीडा शिक्षक
👤 संतोष शेटकर
👤 आदित्य कोंपलवाड
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"जादूची झप्पी "
कोणा कोणाची भूमिका
अगदी दुटप्पी असते
कधी काहीही होते ती
जादूची झप्पी असते
जादूची झप्पी वापरून
फायदा करून घेतात
ते लोक वरचेवर गब्बर
अन् गब्बरच होतात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🏵 ☀ *॥ विचार धन ॥* ☀ 🏵
*'स्तुती' कोणाला आवडत नाही? सर्वांना आवडते, देवांनाही आवडते. म्हणून तर 'आरती' हा प्रकार जन्माला आला. देवाची स्तुती सामुदायिक, एकत्रीत, तालासुरात करता यावी म्हणून तर संगीतमय आरतीचा शोध लागला असावा. त्या म्हणताना उच्चारांपेक्षा त्यातली भावना आधिक महत्वाची. आरत्यांना आरती म्हणण्याचे कारण म्हणजे, देवाची शब्दातून केलेली आर्त प्रार्थना हेच आहे. या आर्ततेमुळे त्या स्थितप्रज्ञ परमेश्वरास पाझर फुटून तो आपल्यावर कृपा करील, ही एकमेव आशा भक्ताला असते.*
*माणसांबाबत या आरतीला तालासुरांची गरज नाही. चार मोजक्या शब्दांत केलेली स्तुती समोरच्या व्यक्तीला हरभ-याच्या झाडावर चढवायला खूप होते. ही झाडे स्तुतीच्या रूपाने विविध क्षेत्रात फोफावलेली जाणवतात. राजकारणात तर त्यांचे वटवृक्ष झाले आहेत. 'साहेब, तुम्ही आहात म्हणून सर्वकाही आहे.' ही आरती तर 'सुखकर्ता दुखहर्ता' यापेक्षाही लोकप्रिय आहे. शिवाय जोडीला 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' ही समारोपाची प्रार्थना तर राजकारणात सुरूवातीलाच म्हटली जाते. कधी कमी तर कधी अमाप स्तुतीने या आरत्या आपले काम चोख करीत असतात.*
*"आरतीसमोर सहजी प्रसन्न होत नाही तो 'देव' आणि अगदी स्वस्तात पटतो तो 'माणूस' हा फरक आहे."*
~~~‼ *॥ रामकृष्णहरी ॥* ‼~~~
⚜⚜⚜⚜⚜⚜
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध.........✍🏻
➖➖➖➖➖➖➖
विचारामुळेच माणूस विचारशील बनतो.त्याच्या मनाचे चांगले विचार असतील तर त्याच्या कृतीमध्ये साकारताना दिसतात.मग ती कृती चांगली असेल तर त्याच्या वर्तनातही चांगले दिसायला लागते.ते त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक विचार कृतीतून स्पष्ट होतात.ते त्याच्या स्वतःच्याही भल्यासाठी व इतरांच्याही भल्यासाठी इष्ट असतात.पण तेच विचार जर वाईट असतील तर ते त्याच्या जीवनासाठी व इतरांच्या जीवनासाठीही हानीकारकच ठरतात.
त्यामुळे विचार हा नेहमी चांगलाच करायला हवा.
त्यात स्वतःबरोबर इतरांचेही कल्याण होण्यास मदत होईल.
- व्यंकटेश काटकर.
🌺🌿🌺🌿🌺🌿🌺🌿
========***********=======
*आजची बोधकथा*
*बोधकथा*
📚📚📚📚📚📚
*मासा आणि हंस*
एका सरोवरात एक मासा राहत होता. तिथेच एक हंस येत असे. त्या दोघांची घनिष्ट मैत्री होती. दोघेही एकमेकांशी भरपूर गप्पा मारत असत. रात्र झाल्यावर मासा सरोवराच्या तळाला जात असे तर हंस जवळच्या झाडावर झोपत असे. सकाळ झाल्यावर हंस कुठेतरी जात असे आणि परत माशाला भेटावयास येत असे. एकेदिवशी माशाने हंसाला विचारले,"तू रोज सकाळी इथून उडून जातो हे मी पाहतो. पण तू कुठे जातो हे तू मला कधीच सांगितले नाहीस" हंस म्हणाला,"अरे मित्रा ! मी समुद्राकडे जात असतो. कारण समुद्रात भरपूर शिंपले असतात. त्या शिंपल्यातून निघणारे मोती मला हवे असतात. कारण माझे अन्नच मोती आहे. मी हंस आहे मी फक्त मोतीच खातो. त्यामुळे मला रोजच समुद्रावर जावे लागते." हे ऐकून मासा म्हणाला,"मित्रा ! मलाही एकदा समुद्र बघायचा आहे." मित्राची अशी इच्छा पाहून हंस म्हणाला,"येथून थोडे पुढे गेल्यावर एक नदी आहे, ती समुद्राला मिळते, तू त्या पोहोच." त्यावर्षी प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, सरोवराचे पाणी जावून नदीला मिळाले तसा मासाही नदीच्या पाण्यात पोहोचला. नदीचा प्रवाह फार जोरात असल्याने मासा अतिशय वेगाने समुद्राकडे वाहून गेला. माशाला समुद्रात त्याच्यासारखेच लाखो मासे दिसले, पण कुणीच तो आल्याची न दखल घेतली न कुणी बोलले. तो त्या समुद्रात एकटा पडला.त्याला राहून राहून आपल्या हंस मित्राची आठवण येत होती. पण आता पर्याय नव्हता. तेथून परतणे शक्यच नव्हते आणि आलेल्या प्रसंगाला तोंड देणे हेच त्याच्या प्रारब्धात लिहिले होते.
*तात्पर्य*
मोठ्या गोष्टी मिळवण्याच्या नादात आपण आपल्याला आनंद देणाऱ्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्याने आपल्याला मोठ्या गोष्टीही मिळत नाहीत आणि छोट्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात.
📚📚📚📚📚📚📚📚📚
*संकलन* - *साई पाटील*, श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment