फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 21 जानेवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 21/01/2017 वार - शनिवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*
⌛१९७२ :  मणिपूर  व  मेघालय  या  राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला
💥 जन्म :-
⌛१८९४ : कवी माधव जूलियन (माधव त्रिंबक पटवर्धन).
💥 मृत्यू :-
⌛१९४५ : रासबिहारी बोस.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣  भारतातील तरुणांच्या मनात श्रमप्रतिष्ठा जागवण्याची गरज. कष्टाची कामे करण्यासाठीह त्यांना तयार करावे लागेल पंतप्रधान नरेंद्र मोदी
2⃣ बीसीसीआयमधील नव्या प्रशासकांच्या नावांची घोषणा 24 जानेवारी रोजी करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. 
3⃣  नोटबंदीमुळे जीडीपीवर अल्पकाळासाठी परिणाम होईल, पण दीर्घकालीन दृष्टीकोनातून हा निर्णय फायदेशीर ठरेल. आरबीआय गव्हर्नरांनी दिली पीएसीसमोर माहिती
4⃣  2016 मध्ये कोल्हापूर परिक्षेत्रात गुन्ह्यांमध्ये १,८०८ संख्यने घट, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची माहिती.
5⃣  पुणे मेट्रोला स्थगिती देणाऱ्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
6⃣ संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या खैरलांजी हत्याकांडातील पीडित भैयालाल भोतमांगे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज शुक्रवारी नागपूर येथे निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते. सुप्रिम कोर्टाचा निर्णयाच्या प्रतिक्षेत असतानाच त्यांच्या निधनामुळे आज एका संघषार्चा अस्त झाला, अशी भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.
7⃣ इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्स दुखापतीमुळे उर्वरित भारत दौऱ्याला मुकणार. हेल्सच्या उजव्या हाताला झाली दुखापत

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

" विश्वास म्हणजे माणसाला जीवंत ठेवणारी शक्ती होय "

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*

                   8007084419

========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *स्थान*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 विरभद्र बसापुरे, सहशिक्षक, धर्माबाद
👤 संतोष हेंबाडे, सहशिक्षक, धर्माबाद
👤 साईनाथ सायन्ना जगदमवार
👤 अनिल मुपडे
👤 ऋषिकेश पवार

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

"अंधारात की उजेडात "

कोणी उघड बोलत असतात
कोणाला गुपीत बोलायचं असतं
बंद खोलीत बोलून कोणाला
जरा वेगळे चालायचं असतं

अंधारात एक उजेडात एक
असं कुठं कोणाला पटतयं
उजेडात बोलायचं ही काही
महाभागांना दु:ख वाटतयं

     शरद ठाकर
  सेलू जि परभणी
  8275336675
========***********=========
*आजचा*
🍀 ☀ *॥ विचार धन ॥* ☀ 🍀

*निसर्गतःच 'प्रेम' हे प्रत्येक व्यक्तीत आणि प्राणीमात्रांत असते. फार काय, प्रेमाशिवाय मनुष्यप्राणी जगू शकणार नाही. प्रेमाने सर्व जग वश करून घेता येते. प्रेम ठेवण्यात पैसा खर्च होत नाही, कष्ट होत नाहीत. परंतु प्रत्येकाचा अनुभव पाहावा तर प्रेम करणे तितकसं सोपं आहे असं दिसत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव निराळा, आवड निराळी, आणि दैवयोगाने आलेले ऋणानुबंध निरनिराळे असतात.*

*आपल्या विचाराचे लोक असतील तर त्यांच्यावर स्वभाविकच प्रेम जडते, विरोधक असतील तर त्यांच्याबद्दल प्रेम वाटत नाही, किंबहुना द्वेषही उत्पन्न होतो. द्वेष का उत्पन्न होतो तर आपला आणि दुस-याचा विचार आणि आवड जमत नाही. परंतु थोडा विचार केला तर असे दिसते की, आपण ज्या कारणामुळे दुस-याचा द्वेष करतो, तेच कारण दुस-याने आपला द्वेष करायला पुरेसे होते.*

     🔱🍁 *॥ रामकृष्णहरी ॥*🍁🔱
             🍁🍁🍁🍁🍁🍁
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध......... ✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰

चांगले विचार करणे,चांगले विचार करायला लावणे आणि चांगल्या विचारांचा योग्य ठिकाणी उपयोग करणे हे आपल्या बुद्धीचे काम आहे.आपली बुद्धी जर क्रियाशील असेल तर ह्या सा-या विचारांचा व्यवहार व्यवस्थितपणे पार पडतो.जर बुद्धीच काही काम करत नसेल तर सारे जीवन व्यवहारच ठप्प होतात.
अशा बुद्धीला अधिक चांगले क्रियाशील ठेवायचे असेल तर प्रत्येक चांगल्या गोष्टींचे अवलोकन करणे.जे ज्ञात नाही ते ज्ञात करुन घेणे,जे आपल्या आणि इतरांच्या हिताचे आहे आणि त्याच्यापासून जगाचे कल्याण होणार आहे. या सा-या गोष्टींचे विचार सदैव करणे.अशा चांगल्या कृती करण्यासाठी आपल्या बुद्धीला सदैव चांगल्या विचारांचे खतपाणी घातले पाहिजे.अशा गोष्टी वृद्धींगत करण्यासाठी चांगल्या संस्काराचा  स्वीकार करणे,चांगल्या पुस्तकांच्या सहवासात राहणे,सज्जनांच्या
सानिध्यात आणि
जीवापेक्षाही जास्त प्रेम करणा-या चांगल्या मित्रांच्या संगतीत राहिले की, आपल्या चांगल्या बुद्धीचा विकास अधिक जोमाने होऊ शकतो हे निश्चित.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद..9421839590.
📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖
========***********=======
*आजची बोधकथा*
         ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
     🔹 *मांजरे व  उंदीर* 🔹
        
    एकदा मांजरे व उंदीर यांची लढाई फार दिवस चालली होती. त्यात प्रत्येक वेळी उंदराचा पराभव होऊन त्यांना पळून जावे लागले. एकदा सगळे उंदीर जमून पराभवाचे कारण काय याचा विचार करीत असता त्यांना असे समजले की आयत्या वेळी आपला सेनापती कोण आहे हे आपल्या सैन्याला ओळखता येत नसल्याने पराभव होतो. तेव्हा सेनापती कोण आहे हे ओळखता येण्यासाठी त्याने काहीतरी चिन्ह धारण करावे असे ठरले. प्रत्येक सेनापतीने आपल्या डोक्यावर गवताची लहान मोळी बांधावी असे ठरले. त्याप्रमाणे केले गेले. नंतर सगळे सेनापती सैन्यासह लढाईवर गेले. पण मांजरांपुढे उंदराचे काय चालणार ? पराभव होऊन ते सगळे पळत सुटले व जीव वाचविण्यासाठी बिळात शिरले. अशा प्रकारे शिपायांनी स्वतःचा जीव वाचवला पण सेनापतीची स्थिती फार वाईट झाली. त्यांच्या कपाळावर गवत बांधलेले असल्यामुळे त्यांना बिळात शिरता येईना व शेवटी ते सगळे मांजरांच्या भक्ष्यस्थानी पडले.

       *_🌀तात्पर्य_ ::~*
*मोठेपणा बरोबर माणसाची जबाबदारी व संकटे वाढतात*.
*संकलन-* *साई पाटील*, श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments