*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 23/01/2017 वार - सोमवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९९६: संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.
💥 जन्म :-
⌛ ८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस
⌛१९२६: बाळासाहेब ठाकरे
💥 मृत्यू :-
⌛१६६४: शहाजीराजे भोसले
⌛१९१९: राम गणेश गडकरी.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनासाठी राज्यातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) 23 छात्रांची निवड.
2⃣ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लगतच्या मागील निवडणुकीत किमान पाच टक्के जागा जिंकणाऱ्या नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या सर्व उमेदवारांना संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत तात्पुरत्या स्वरुपात एक समान चिन्ह देण्याचा राज्य निवडणूक आयोगाने घेतला निर्णय
3⃣ चेन्नईत जलीकट्टूसाठीच्या आंदोलनात तामिळनाडूत तीन जणांचा मृत्यू
4⃣ हिराखंड एक्सप्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातातीत मृतांचा आकडा 39 वर
5⃣ शेवटच्या एकदिवसीय सामन्यात अखेरच्या चेंडूवर भारताचा 5 धावांनी पराभव, केदार जाधवची एकाकी झुंज
6⃣ सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकली
7⃣ डाव्या हाताने स्वींग गोलंदाजी करताना 150 बळी घेणारा रविंद्र जडेजा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांचा उद्धार करणे हे आपले कर्तव्य आहे ही जाणीव ज्यांना आहे ते धन्य होत.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*उध्दार*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"विचार "
वाईटाच्या डोक्यात
विचार वाईट असतात
त्याच्या नजरेत त्याचे
विचार राईट असतात
सांगा कधी वाईटाला
चांगल कुठं सुचत
वाईटाला वाईटाच
पण सारं काही पटत
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
~~~~ ‼ *विचार धन* ‼~~~~
*काही गुरूशिष्य पाहताना ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार होतो. रामकृष्ण परमहंसानी म्हटलंय की, जो राम व जो कृष्ण होता तोच आता 'रामकृष्ण' म्हणून परत जन्माला आलाय. याबद्दल किंतु आणू नका. त्यांना कॅन्सर झाला आणि असह्य वेदना होऊ लागल्या. तेंव्हा लांबवर असलेले शिष्य विवेकानंद अस्वस्थ झाले होते. त्यांना या वेदना सहन होईनात, शिवाय मनात किंतुही आला की, जर हे राम-कृष्ण आहेत तर यांना कॅन्सर कसा झाला.? ही शंका मनात उपस्थित होताच परमहंसानी त्यांना बोलावून घेतले आणि विचारले, का रे ? अजून तुझ्या मनात शंका आहे का ?*
*त्यावर 'हो' म्हटल्यानंतर विवेकानंद शांत झाले, परंतु त्यानंतर त्याच्या लक्षात आले की हे खरंच अवतारी पुरूष जन्माला आले आहेत, आणि केवळ आपली परिक्षा पाहण्यासाठी, आपले अंत:करण पाहण्यासाठी त्यांनी असे उद्-गार काढले आहेत. तेंव्हा आता आपण आपला विवेक सांभाळला पाहिजे. त्यांना जाणीव झाली की, 'विवेक म्हणजेच वैराग्य' आणि विवेकानंदाना ख-या वैराग्याची कल्पना आली. हे घडते गुरूंच्या संगतीने.*
*परमेश्वराचा शोध म्हणजे संपूर्ण विश्वाचा शोध, तो किती जन्मात पुरा होईल सांगता येणे कठिण आहे. गुरूसहवासाची आस धरल्यास तो याच जन्मात पूर्ण होईल कदाचित..*
~~ ‼ *रामकृष्णहरी* ‼ ~~
🌹🌹🌹🌹🌹🌹
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=======
🎯 वि चा र वे ध......✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰
वाळवंटातून पुढे पुढे चालत असताना मागचे पाऊल लवकर उचलून पुढे टाकता येत नाही, कारण रेतीमध्ये पाय फसल्या जातो.पण आशा असते पुढे चालण्याची. त्यासाठी प्रयत्न करतो आणि पावले टाकतो.पण जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा मागे पडलेल्या पावलांच्या खुणा मिटलेल्या असतात.
जीवनाचेही तसेच असते.
सुखाचा जेव्हा शोध घेतो तेव्हा मागे झालेल्या दुःखाला येणा-या सुखासाठी विसरावेच लागते.नाही तर दुःखाला घेऊन चाललो तर सुखाचा प्रवासही होणार नाही आणि आनंदही मिळणार नाही.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590
💠🌹💠🌹💠🌹💠🌹
*आजची बोधकथा*
*राजा आणि मंत्री*
एका सम्राटाला झोप येत नव्हती, ते फेरफटका मारत असताना आपल्या कक्षाबाहेर आले तर मंत्री महोदय आपल्या हिशोबाच्या वह्या काढून हिशोब तपासत आहेत असे त्यांच्या लक्षात आले. मंत्र्याच्या चेहऱ्यावर कसली तरी चिंता आहे हे महाराजांच्या अनुभवी नजरेने हेरले. महाराजांनी त्यांना या चिंतेचे कारण विचारले तेंव्हा मंत्री म्हणाले, "महाराज ! मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी कर अधिक जमा झाला आहे. पण त्याचे कारण मला समजले नाही" सम्राट म्हणाले,"अहो! हिशोबात काही चूक असेल." मंत्री म्हणाले,"हिशोब अचूक आहे. मी स्वततपासला आहे." सम्राट म्हणाले," रात्र जास्त झाली आहे. हि समस्या उद्या सकाळी सोडवा." परंतु मंत्री म्हणाला," उत्पन्न अशा प्रकारे वाढणे साम्राज्यासाठी चिंतेचे कारण आहे. कराची कमतरता सहन करणे शक्य आहे पण अन्यायाची एक पै तिजोरीत जास्त आली तर तिच्यामुळे साम्राज्याला तळतळाट लागू शकतो. महाराज ! कुणा गरीबाचा तळतळाटाचा पैसा चुकून जरी आपल्या तिजोरीत पडला तर तुम्हाला आणि मला आपल्या दोघांना आवडणार नाही. यामुळे मी तो हिशोब तपासत आहे." आता सम्राटही गंभीर झाला आणि मंत्राच्या समोर बसला. बराच वेळ विचार केल्यावर मंत्री म्हणाला ,"महाराज! उन्हाळा जास्त झाल्याने नदीची पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे काठावरच्या जमिनीला शेतकऱ्यांनी कुंपण घातले. शेतकऱ्यांनी पिके कमी घेतली पण सरकारचा कर बुडवायचा कसा? या विचाराने त्यांनी सरकारात धन जमा केले. त्यामुळे जास्त धन गोळा झाले." यावर राजा म्हणाला,"जर दुष्काळाची परिस्थिती असेल तर त्या गरीब शेतकऱ्यांनी जमा केलेला कर आपल्या तिजोरीमध्ये ठेवून मला पापाचा धनी व्हायचे नाही. गरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी मदत म्हणून तोच पैसा परत करा." सम्राटाच्या आज्ञेचे पालन करण्यात आले. पुढील वर्षी त्या राज्यात भरपूर पाऊस झाला. जनतेचे आशीर्वाद फळाला आले.
*तात्पर्य*
सर्वांचे हित जाणणारा, प्रेम, आत्मीयता व कठीण प्रसंगात योग्य साथ देणारी व्यक्तीच योग्य प्रकारे सत्ता चालवू शकते.
📚📚📚📚📚📚📚📚
*संकलन* - *साई पाटील*,
श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment