*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 25/01/2017 वार - बुधवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
💥१९८२: विनोबा भावे यांना ‘भारतरत्न’ पदवी प्रदान
💥१८७४: चिपळूणकरांच्या ’निबंधमाला’ मासिकाचा प्रारंभ झाला.
💥१९७१: हिमाचलला राज्याला दर्जा देण्यात आला.
💥१९८८: पृथ्वी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
💥१९९१: मोरारजी देसाई यांना ‘भारतरत्न’ हा पुरस्कार देण्यात आला.
💥२००४: लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर.
💥२००१: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेया बैठकीत शेतकऱ्यांचे 660.5 कोटीं रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल
2⃣ ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ या केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाची उत्कृष्ट अमलबजावणी करण्यासाठी महाष्ट्रातील जळगाव व उस्मानाबाद जिल्ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मेनका गांधी यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल आणि उस्मानाबाद चे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.
3⃣ शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा 12 वा राम कदम कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ गायिका डॉ अनुराधा पौडवाल यांना जाहीर.
4⃣ यावर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने महाराष्ट्रातील अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण, रत्नागिरीतील पोलीस उपअधीक्षक महादेव गावंडे आणि कोल्हापूरचे एपीआय शिवप्पा मोरटी तीन पोलिसांना राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
5⃣ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2017 मध्ये घेण्यात येणा-या दहावीच्या परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची मंडळाच्या आदेशानुसार प्रात्यक्षिक / तोंडी 15 फेब्रुवारी ते 4 मार्च या कालावधीत होणार आहे. त्याच कालावधीत विद्यार्थ्यांची कल चाचणी घेतली जाईल,असे राज्य मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
6⃣ भारतीय वंशाचे अनिरुद्ध जगन्नाथ यांनी मॉरिशसच्या पंतप्रधानपदाचा सोमवारी राजीनामा दिला आणि पंतप्रधानपदाची सूत्रे आपले पुत्र प्रवीण जगन्नाथ यांच्याकडे सोपविली.
7⃣ भारतीय कसोटी संघात आपली दावेदारी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने शानदार द्विशतक झळकावले
💥 ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि भूदान चळवळीतील विनोबा भावे यांचे सहकारी दिवाकर गोविंद हरिदास यांचे आज कोल्हापुरात झाले निधन, ते ९२ वर्षांचे होते
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" चारित्र्य हे झाडाप्रमाणे आहे आणि प्रतिष्ठा ही सावली प्रमाणे. सावली ही आपण जसा विचार करू तशी असते पण झाड हे शाश्वत असते."
__ अब्राहम लिंकन
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*प्रतिष्ठा*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤चि.अथर्व संदीप चिंतावार ,नांदेड
👤सौ. वैशाली देशमुख, कुही, नागपूर
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"यु टर्न "
डायरेक्ट यु टर्न घेणं
कधीही धोक्याचं असतं
कधी काय बोलावं
काम डोक्याच असतं
पाहिजे त्या पध्दतीने
वापराव लागतं डोकं
नाही तर लोक म्हणतात
याच चालत नाही खोकं
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌼 ~ 🍁 *॥ विचार धन ॥* 🍁 ~ 🌼
*सतत देवाचे नांव घेणारा माणूस, जेवढा 'धार्मिक' असण्याची शक्यता आहे, त्याहून तो 'दांभिक' असण्याची जास्त शक्यता आहे, कारण स्वत:चे दोष झाकण्यासाठी त्याच्याकडून 'धार्मिकता' हा परिणामकारक बुरखा म्हणून वापरला जाण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे मनुष्य चांगला ठरतो असे नाही.*
*'पुजा' आणि 'कर्मकांड' न करता, त्यासाठीचा वेळ सत्कृत्यांसाठी वापरणारा माणूस हा जास्त ' चांगला माणूस ' नाही का ? नामस्मरण, पूजा व कर्मकांडात मन व शरीर गुंतवूण आजूबाजूंच्या दूर्दैवांकडे, दु:खांकडे डोळेझाक करणा-या माणसाला खरंच का चांगला माणूस म्हणता येईल ?*
~~☀ *॥ रामकृष्णहरी ॥* ☀~~
☘☘☘☘☘☘
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
*9167937040*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध.....✍🏻
➖➖➖➖➖➖➖➖
जगणं सुंदर होऊ शकतं....
येणा-या प्रत्येक दिवसाचे हसतमुखाने स्वागत करा.
आपल्यासमोर नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा.
कालच्यापेक्षा आज चांगले आहे आणि उद्यादेखील चांगलेच होणार अशी आशा मनात ठेऊन येणा-या दिवसाला सामोरे जा.
तुमच्या मनात दुस-याविषयी चांगले विचार चिंतीत गेल्यास त्यात आपल्यालाही समाधान वाटेल.
मग आपोआपच आपलं जीवन जगणं सुंदर होऊ शकतं......!!
- व्यंकटेश काटकर.
9421839590
🌺💟🌺💟🌺💟🌺💟
========***********=======
*आजची बोधकथा*
*बोधकथा*
📚📚📚📚📚📚
*आरसा*
एक गुरूंच्या घरी एक शिष्य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्याच्या या सेवेमुळे गुरु त्याच्यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्यावर विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाला तेव्हा गुरुंकडे त्याने जाण्याची आज्ञा मागितली तेव्हा गुरुंनी त्याला आशीर्वाद म्हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्य आरसा दर्पण असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात. विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्यासाठी त्याने लगेच आपल्या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्या समोर आरसा धरताच त्याच्या चेह यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्याला याचे फारच दुख झाले की आपण ज्या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्यांच्या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्याला वैषम्य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला, रस्त्यात भेटणा या प्रत्येकाच्या मनातील भाव पाहणे हे त्याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्याने आपल्या प्रत्येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला. त्याला प्रत्येकाच्या हृदयात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्याने आपल्या जन्मदात्या आई वडीलांच्या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्यातून सुटले नाहीत. त्यांच्या हृदयात पण त्याला काही ना काही दुर्गुण दिसले. शेवटी या गोष्टीचा त्याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला. गुरुंपाशी जाऊन मोठ्या विनम्रपणे तो म्हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्या या आरशातून प्रत्येकाच्या मनात, हृदयात, अंतकरणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्येकाच्याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्या मनात कमी तर कुणाच्या मनात जास्त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दुखी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’ गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्याच्याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्याला त्याच्या मनाच्या प्रत्येक कोप यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले. गुरुजी म्हणाले,’’ वत्सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्यासाठी दिला होता पण तू दुस यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास, अरे याच कालात जर तू जर स्वतचे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्य व्यक्ती झाला असता. मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्वतला सुधारण्याचा प्रयत्नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’
*तात्पर्य*
आपण नेहमीच दुस या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका करतो पण आपल्यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्मनिरीक्षण केले तर आपल्यालाही आपले दुर्गुण सापडतीलच.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎
*✍�संकलन ✍�*
*साई पाटील*,
श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
📚📚📚📚📚📚📚📚📚
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment