*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर प्रस्तुत 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 31/01/2017 वार - मंगळवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९२०: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी‘मूकनायक’ या पाक्षिकाची सुरुवात केली.
⌛१९४९ : बडोदा व कोल्हापूर ही दोन्ही संस्थाने मुंबई राज्यात विलीन झाली.
⌛१९९२: ६५ वे साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले.
💥जन्म :-
⌛१८९६: ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ विजेते सुप्रसिध्द कन्नड कवी दत्तात्रय रामचंद्र बेंद्रे
⌛१९०२: स्विडनमधील प्रसिध्द समाजसेविका व जागतिक नि:शस्त्रीकरणाच्या खंबीर पुरस्कर्त्या ‘मिर्दाल अल्बा’.
💥 मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन :-
⌛१७९३: रमाबाई पेशवे यांचे निधन
⌛१९९४: चित्रपट निर्माता व दिग्दर्शक वसंत जोगळेकर यांचे निधन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ जेष्ठ साहित्यिक प्रा. लक्ष्मीकांत तांबोळी यांना लोकसंवाद 2017 जीवन गौरव पुरस्कार प्रदान
2⃣ अर्थसंकल्प सादरीकरणाच्यावेळी तृणमुल काँग्रेसचे खासदार राहणार अनुपस्थित.
3⃣ पदमावती चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी संजय लीला भन्साळींनी तो चित्रपट आपल्याला दाखवावा अशी सेनेने केली मागणी.
4⃣ 01 फेब्रुवारीनंतर एटीएममधून कॅश काढण्याची मर्यादा पूर्णतः हटवण्यात येणार - आरबीआय (रॉयटर्स)
5⃣ अमूल्य पटनायक दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त
6⃣ सर्वोच्च न्यायालयाने माजी सीएजी विनोद राय यांची केली बीसीसीआय प्रमुखपदी नियुक्ती, रामचंद्र गुहा, विक्रम लिमये आणि माजी महिला क्रिकेटपटू डायना एडलजी यांचीही बीसीसीआयमध्ये नियुक्ती
7⃣ पुढच्या तीन ऑलिम्पिकसाठी क्रीडा मंत्रालयाने स्थापन केलेल्या टास्क फोर्समध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा आणि पुलेला गोपीचंद यांचा केला समावेश
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" मला तुम्ही अपयशी झाले त्यापेक्षाही तुम्ही अपयशी झाल्यानंतर काय करतात याची जास्त काळजी वाटते."
------------------------- अब्राहम लिंकन
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
7588876539
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*ऑलिम्पिक*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤राजेश पटकोटवार, विफिशि, धर्माबाद
👤विनायक हिरवे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"मीच खरा "
प्रत्येकजण म्हणतो
मीच खरा आहे
लांबून पाहिल्यास
वाटते बरा आहे
लांबून दिसतो तसा
जवळून कोणी नसतो
दुरून पहाण्यामुळे
माणूस मात्र फसतो
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌹 🌹 *॥ विचार धन ॥* 🌹 🌹
*एका गावात एक साप वावरताना अनेकांना दंश करायचा. त्यापायी कित्येक मृत्यूमुखी पडले. पूर्वजन्मीच्या पापामुळे त्याला ही सर्प योनी मिळाली होती. याचा त्याला पश्चातापही झाला होता. सर्पयोनीतून मुक्त व्हावे असे त्याला वाटे. त्याने अनेकांना मुक्तीचा उपाय विचारला. अखेर एका साधुने सांगितले,'कोणालाही दंश करायचा नाही.' सापाने ते ऐकले. तो निमूट एका जागी पडून राहायचा. एकाच जागी सरपटत राहिल्याने त्याला कुणी घाबरेनासे झाले. लोक त्याला छेडू लागले, छळू लागले. चुंबळीसारखा वेटोळे करून त्यावर घागरीचे ओझे ठेऊ लागले. बिचारा अगदी मरायला टेकला होता.*
*एकेदिवशी साधुमहाराज पुन्हा त्याच रस्त्याने जाताना त्यांना तो मरणोन्मुख साप दिसला. त्यांनी त्याची दशा पाहिली. कीव आली,'अरे, असे कसे झाले?' त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी विचारले,'स्वसंरक्षणासाठी तू फुत्कार तरी करीत होतास की नाही?' सापाने नकारार्थी उत्तर दिले. साधुने त्याला फुत्कार करण्यास सांगितले. सापाने 'स्वभावधर्म' ओळखला नि काय चमत्कार झाला पहा, नुसत्या भयाने लोक त्याच्यापासून दूर राहू लागले.*
*"मूळ स्वभावधर्म सोडला, तर सापाचीही चुंबळ करायला लोक घाबरत नाहीत. तेव्हा सृष्टीने दिलेले बरे-वाईट संचित ज्याने त्याने संभाळून वागावे हेच खरे."*
~~~🏵 *॥ रामकृष्णहरी ॥* 🏵~~~
🌹🌹🌹🌹🌹🌹
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध.........✍🏻
_______________________
कोणताही जीव असो.
मानवाचा असो किंवा इतर प्राण्यांचा. प्रत्येक जीवाला जास्त काळ जगण्याची अपेक्षा असते.ती अपेक्षा
ठेऊनच तो आपले जीवन जगत असतो.तो कधीही मरणाला भीत नाही.कारण त्याला माहित असते की,
आपला काळ जेव्हा संपेल तेव्हाच मृत्यू येईल.तोपर्यंत तर आपल्याला जगावेच लागेल.त्यासाठी धडपड करावीच लागेल.धडपड
न करता जीवन जगणे म्हणजे मृत्यूसमोर शरण जाणे होय.मृत्यूला शरण न जाता जीवन जगणे म्हणजे आपल्या जीवनावर विजय मिळवणे होय.
- व्यंकटेश काटकर
नांदेड.
भ्रमण.9421839590
🍃🌻🍃🌻🍃🌻🍃🌻
========***********=======
*आजची बोधकथा*
📚📚📚📚📚📚
" खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका जंगलात एक लांडगा राहत होता. तो लांडगा मस्त मजेत शिकार करून खात असे. शिकार खात असताना अचानक एक हाड त्याच्या घशामध्ये अडकते. घशामध्ये अडकलेल्या हाडामुळे लांडग्याला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला खाता येत नव्हते .
त्याला कोणीही मित्र नव्हता की, जो त्याला ते हाड काढण्यासाठी मदत करू शकेल. तो शेजारून जाणाऱ्यांना विनंती करू लागला की, माझ्या घशातील हाड काढून द्या. मग तो सगळ्यांना म्हणतो की,जो कोणी माझ्या घशातील हाड काढून देईन त्याला तो म्हणेल ते बक्षीस देईन पण लांडग्याच्या भीतीने कोणीच आले नाही.
शेवटी एक सरस पक्ष्याला लांडग्याने न मारण्याचे आश्वासन दिल्यानंतर हाड काढण्यास त्या पक्षानं होकार दिला. सारसने लांब चोचीने लांडग्याच्या घशातले हाड बाहेर काढले. लांडग्याने सुटकेचा नि:श्वास सोडला. तेव्हा सरस त्याला म्हणाला ,तू मला या मदतीच्या मोबदल्यात काय देणार?
लांडग्याने दुष्टपणे हसत म्हटले, मी तुझा जीव वाचविला नाही का? जेव्हा तू तुझी चोच माझ्या तोंडात घातली तेव्हाच मी तुला मारून टाकू शकत होतो सरस पक्षी लांडग्याचे असे बोलणे ऐकून नाराज झाला आणि जाता जाता विचार करू लागला की, हा लांडगा पण किती पटकन उपकार विसरणारा निघाला. मी त्याची मदत करायला नको होती.
*तात्पर्य*-उपकाराची फेड आपकाराने करू नये ."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍*
*साई पाटील*,
श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
📚📚📚📚📚📚📚📚
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment