फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 02 फेब्रुवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769

1⃣  🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 02/02/2017 वार - गुरुवार 
========***********=========
        *📆 . . दिनविशेष . . 📆*
⌛१६५३ : अमेरिकेत न्यूऍम्स्टरडॅम गावाची स्थापना. पुढे याचे नाव बदलुन न्यूयॉर्क ठेवण्यात आले.
💥 जन्म :-
⌛१८८४ : ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर,
💥 मृत्यू :-
⌛१९०७ :  मूलद्रव्यांच्या आवर्त सारणीचे संशोधक, दिमित्री मेंडेलीव
⌛१९१७ : महर्षी अण्णासाहेब पटवर्धन

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
*अर्थसंकल्प विशेष*
1⃣ अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणा-यांकडून आता 10 ऐवजी 5 टक्केच कर आकारण्याची करण्यात आली घोषणा
2⃣ राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांची नावे समोर येणार नाहीत, पण राजकीय पक्षांना टॅक्स रिटर्न भरावा लागेल अर्थमंत्री अरुण जेटली
3⃣ अर्थसंकल्पात नव्या गाड्यांची घोषणा करण्यात आलेली नाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
4⃣ या अर्थसंकल्पामुळे विकासाला चालना मिळेल, शिक्षण ते उद्योग प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करणारे हे बजेट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी.
5⃣  आधार कार्ड UIDAI प्रणाली देणाऱ्या नंदन निलेकणी यांचे जेटलींनी केले अभिनंदन
6⃣ आंध्रप्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 4 पोलीस शहीद.
7⃣ इंग्लंडवर 75 धावांनी विजय मिळवित भारताने टी-20 मालिका जिंकली

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" स्वतःला जिंकायचे �असेल तर डोक्याचा उपयोग करा, इतरांना जिंकायचे असेल तर ह्रदयाचा उपयोग करा."

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                    80070 84419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
             *अर्थसंकल्प*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 रुख्माजी भोगावार, नपा, धर्माबाद
👤 पोतन्ना लखमावाड, पत्रकार, धर्माबाद
👤 विनोद गुंडेवार
👤 राजू जगदंबे
👤 किरण बासरकर
👤 चेतन घाटे
👤 साई पांचाळ
👤 भोजमोड बबलूकुमार
👤 राहुल सरोज
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*

   "पारदर्शक "

प्रत्येकाला वाटते आमचे
कार्य पारदर्शक आहे
ज्याच्या त्याच्या नजरेत
तर ते रोमहर्षक आहे

पारदर्शक रोमहर्षक हे
म्हणावं आनंदाने लोकानं
स्वस्तुती करू नका हे
सांगावं लागतयं शोकानं

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
⭐ 🌟 *॥ विचार धन ॥* 🌟 ⭐

*'स्थितप्रज्ञ' हा समतेचा साक्षात्कार घडवणारा असतो. स्थितप्रज्ञ लक्षणांचे ज्ञानदेवांनी फार सुंदर विवरण केले आहे. माऊली म्हणतात.... हे पार्था, ज्याच्या ठायी विषमतेची नावनिशाणीही नसते आणि शत्रू अथवा मित्र या दोघांबाबतही ज्याचे वर्तन, ज्याची भूमिका सारखी असते, तो 'स्थितप्रज्ञ.'*

       *गायीची तृषा हरू*,
       *व्याघ्रा विषय होऊनी मारू ।*   
        *हे नेणेचि गा करू, तोय जैसे ॥*

*पाण्याचा गुणधर्म हा तृष्णाशमन. तो गुण पाणी कधीही सोडणार नाही. गाय पाणी पिण्यासाठी आली किंवा वाघ आला, तरी तृष्णा भागवणार. गाय गरीब आहे, वाघ क्रूर आहे, गाय माणसाला उपयुक्त आहे, वाघ माणसांचा भक्ष्यक आहे, असा विचार पाणी करणार नाही.*

*ज्ञानदेवांचे दृष्टांत म्हणजे सहजसोपी पण साक्षात्कारी अनुभूतीच. व्यवहारातील कितीतरी उदाहरणे देऊन ज्ञानदेवांनी स्थितप्रज्ञ कोण ? यावर कोणतेही कठीण भाष्य न करता विवरण केले आहे.*

          ⛳ *॥ रामकृष्णहरी ॥* ⛳
            🔰🔰🔰🔰🔰🔰
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध.......✍🏻
〰〰〰〰〰〰〰

शब्दच असे आहेत की,
कधी चेह-यावरचे हास्य फुलवतात तर कधी
डोळ्यांत आनंदाचे किंवा दुःखाचे अश्रू आणतात.
शब्दांना मनही जोडता येतं आणि तोडताही येतं.
पण शब्द असे वापरा की,त्यात माणुसकीचे नाते जोडण्याचे काम शब्दांनीच केले पाहिजे.ज्यामुळे आपले संबंध इतरांशी चिरकाल टिकण्यासाठी मदत करतील.

- व्यंकटेश काटकर, नांदेड
  संवाद.9421839590.

🔮🔴🔮🔴🔮🔴🔮🔴🔮🔴🔮🔴🔮🔴
*वपुर्झा*
काही काही शब्द, वाक्यं, विधानं फार भयंकर असतात. ती मोघम असतात, पण गैरसमज पसरवण्याची त्या मोघम वाक्यांची ताकद, साथीचा रोग पसरवणाऱ्या जंतूंपेक्षा अफाट असते.
~ वपु काळे | ऐक सखे
*संकलन - संजय माचेवार, वसमत*
========***********=======
*आजची बोधकथा*
            *बोधकथा*
     " एके काळाची गोष्ट आहे. एक गाढव होते. दुसरे प्राणी नेहमी त्याची थट्टा करत. तो दुसऱ्या प्राण्यांचे असे वागणे पाहून कंटाळला होता. तो नेहमी विचार करत असे की, त्याच्या जवळ सुध्दा ताकात,सौंदर्य किवा गोड आवाज असता तर दुसऱ्या प्राण्यांनी त्याची थट्टा केली नसती.
एकदा गाढव असाच कुठे तरी जात होता. वाटेत त्याला सिंहाचे कातडे पडलेले दिसले. प्रथम गाढवाने त्याचाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे तो चालू लागला. मग त्याला अचानक एक युक्ती सुचली. त्याने ते सिंहाचे कातडे घेतले आणि अंगावर टाकले. त्याला वाटले आता सगळ्या प्राण्यांना वाटेल कि, मी सिंह आहे आणि ते माझा आदर करतील .
सिंहाचे कातडे अंगावर पांघरून गाढव पुढे निघाला. वाटेत तो एका गिधाडाजवळ पोहचला. गिधाडाने त्याला सिंहच समजले आणि तो घाबरून तेथून पळून गेला. गाढवाला हे सर्व पाहून खूप मजा आली. आता त्याला वाटले कि, तो आता सहज जंगलात राजा बनेल. त्यानंतर तर जो कोणी कातडे पांघरलेल्या गाढवाला पाहत असे ते घाबरून पळून जायचे. गाढवाला या खेळामध्ये खूप मजा वाटायला लागली.
थोड्याच वेळात गाढव एका कोल्हीनी शेजारी येउन थांबला. गाढव तिला घाबरावायला जातो. कोल्हीन त्याचा आवाज ऐकते .कोल्हीन त्याला म्हणाली ,जर मी तुझा रेकण्याचा आवाज ऐकला नसता तर मी पण तुला घाबरले असते. गाढव बिचारा एवढंस तोंड करून निघून गेला. सिंहाचं कातडे पण त्याचा बावळटपणा लपू शकला नाही.
*तात्पर्य -*आति शहाणा त्याचा बैल रिकामा "
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
        श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
📚📚📚📚📚📚📚📚📚
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
========***********=========

Comments