*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 03/02/2017 वार - शुक्रवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९२५ : भारतातील पहिली विद्युत रेल्वे मुंबई ते कुर्ला या लोहमार्गावर सुरु झाली.
⌛१९६६ : रशियाने ‘लूना-९’ हे अवकाशयान चंद्रावर उतरवले.
⌛१९८४ : स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
💥 जन्म :-
⌛१९६३ : रघुराम राजन, भारतीय अर्थशास्त्री.
💥 मृत्यू :-
⌛१८३२ : उमाजी नाईक, महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी आज होणार मतदान , सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत करता येणार मतदान
2⃣ टेक्नॉलॉजीमधील दिग्गज गुगलने क्रोम ब्राऊझरच्या जुन्या व्हर्जनवर Gmail सपोर्ट बंद होणार असल्याची केली घोषणा
3⃣ अर्थसंकल्पात ऊर्जा मंत्रालयासाठी 26 टक्के तरतूद करण्यात आली आहे पीयूष गोयल
4⃣ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (ट्राय) रिलायन्स जिओला देण्यात आली क्लीनचिट जिओची वेलकम ऑफर आणि हॅप्पी न्यू इअर ऑफर ही ट्रायच्या नियमांनुसारच आहे आणि यामुळे ट्रायच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन होत नसल्याचं ट्रायने म्हटलं आहे
5⃣ 2015 साली भारतात भूकंपामुळे 115 नागरीकांचा मृत्यू झाला, 2016 मध्ये भूकंपामुळे 13 हजारपेक्षा जास्त घरांचे नुकसान झाले - सरकार.
6⃣ भारताविरूद्धच्या एकमेव कसोटीसाठी बांगलादेश संघाचे हैदराबादमध्ये आगमन, 9 फेब्रुवारीला होणार सामना.
7⃣ टी-20 अंध विश्वचषक भारताने इंग्लंडचा 10 विकेट राखून केला पराभव.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम किर्ती होय."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*सर्वोत्तम*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 गंगाधर धडेकर, पत्रकार, धर्माबाद
📱 9423509222
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"एक घाव "
एकदा भिडले की
दुस-याची औकात काढतात
खालची भाषा वापरण्याचे
सारेच रेकॉर्ड मोडतात
विरोध करतांना क्षणभर
विसरतात आपण कोण
तरीही होऊ देत नाहीत
एक घाव तुकडे दोन
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🌹 🌹 *॥ विचार धन ॥* 🌹 🌹
*एका गावात एक साप वावरताना अनेकांना दंश करायचा. त्यापायी कित्येक मृत्यूमुखी पडले. पूर्वजन्मीच्या पापामुळे त्याला ही सर्प योनी मिळाली होती. याचा त्याला पश्चातापही झाला होता. सर्पयोनीतून मुक्त व्हावे असे त्याला वाटे. त्याने अनेकांना मुक्तीचा उपाय विचारला. अखेर एका साधुने सांगितले,'कोणालाही दंश करायचा नाही.' सापाने ते ऐकले. तो निमूट एका जागी पडून राहायचा. एकाच जागी सरपटत राहिल्याने त्याला कुणी घाबरेनासे झाले. लोक त्याला छेडू लागले, छळू लागले. चुंबळीसारखा वेटोळे करून त्यावर घागरीचे ओझे ठेऊ लागले. बिचारा अगदी मरायला टेकला होता.*
*एकेदिवशी साधुमहाराज पुन्हा त्याच रस्त्याने जाताना त्यांना तो मरणोन्मुख साप दिसला. त्यांनी त्याची दशा पाहिली. कीव आली,'अरे, असे कसे झाले?' त्यांना सगळा प्रकार लक्षात आला. त्यांनी विचारले,'स्वसंरक्षणासाठी तू फुत्कार तरी करीत होतास की नाही?' सापाने नकारार्थी उत्तर दिले. साधुने त्याला फुत्कार करण्यास सांगितले. सापाने 'स्वभावधर्म' ओळखला नि काय चमत्कार झाला पहा, नुसत्या भयाने लोक त्याच्यापासून दूर राहू लागले.*
*"मूळ स्वभावधर्म सोडला, तर सापाचीही चुंबळ करायला लोक घाबरत नाहीत. तेव्हा सृष्टीने दिलेले बरे-वाईट संचित ज्याने त्याने संभाळून वागावे हेच खरे."*
~~~🏵 *॥ रामकृष्णहरी ॥* 🏵~~~
🌹🌹🌹🌹🌹🌹
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध..........✍🏻
--------------------------
दैवावर विश्वास ठेऊन काम करणारी माणसं मनानं दुबळी तर असतातच आणि काम करताना आपल्या कामात कर्तव्यतत्परही नसतात.
त्यामुळे त्यांच्या वाट्याला अपयशच मिळते.
यशापासून ते बरेच कोसो दूर असतात.यशापेक्षा
समोर येणा-या प्रसंगांनाही व्यवस्थित सामना करु शकत नाहीत. दैवावर विसंबून राहण्यापेक्षा आपल्या प्रत्यक्ष कृतीत जीव ओतून काम केले तर यश नक्कीच मिळू शकते.दैवापेक्षा आपल्या कर्तव्यावर अधिक विश्वास ठेऊन काम करावे.त्यामुळे जीवन सुखासमाधानाने आणि आनंदाने जगण्याचा मार्ग मिळेल आणि आत्मिक समाधानही मिळेल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590
🌷🌕🌷🌕🌷🌕🌷🌕🌷🌕🌷🌕🌷🌕
*वपुर्झा*
ज्याला गरज निर्माण होते त्याला ती एकदम लाचार, दुबळा बनवते. आणि जो ती गरज पुरूवु शकतो त्याला ती अचाट सामर्थ्यवान आणि उद्दाम बनवते.
~ वपु काळे | वपुर्झा
========***********=======
*आजची बोधकथा*
📚📚📚📚📚📚
"एकदा एक श्रीमंत माणूस नदीकाठावरील मंदिरात देवदर्शनासाठी गेला. अचानक त्याच्या मनात आले, नदीत जाऊन हात-पाय धुवावेत व मग मंदिरात देवदर्शनासाठी जावे. तो नदीवर गेला. हात-पाय धूत असताना त्याच्या तोल गेला आणि तो नदीत पडला. त्याला पोहता येत नव्हते. त्याची धडपड सुरू झाली. तो ओरडू लागला पण त्याला वाचविण्यासाठी कुणीही पुढे येईना.
अखेर, एका साधूने नदीत उडी घेतली. त्या साधूने त्याला वाचविले. काठावर आणले.
काही वेळाने, तो श्रीमंत गृहस्थ भानावर आला. त्याने खिशातून खूप नोटा बाहेर काढल्या. पण त्यातील फक्त एक रूपयाची नोट साधूच्या हातावर ठेवली.
हे पाहून काठावर जमलेले लोक संतापले. चिडून त्यांना थांबविले. त्यांनी त्या व्यापार्याला उचलले व नदीत टाकणार इतक्यात साधूने त्यांना थांबविले. साधू म्हणाला, 'थांबा, त्यांने स्वत:चा किंमतीएवढेच बक्षिस दिले आहे. यात त्याची काय चूक? त्याची किंमत एवढीच आहे.'
*तात्पर्य :* माणसाची खरी किंमत प्रसंगानेच कळते. उपकारकर्त्याचे उपकार स्मरणे हेच माणसाचे कर्तव्य आहे."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●
*✍संकलन ✍ साई पाटील*,
श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅─
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********========
Comments
Post a Comment