*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 04/02/2017 वार - शनिवार
========***********=========
*📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९४४ : ‘चलो दिल्ली’ चा नारा देत आझाद हिंद सेनेनी दिल्लीकडे कूच केली.
⌛१९८८ : रशियाने नेहरु फुटबॉल चषक जिंकला
💥 जन्म :-
१९०६ : प्लुटो हा ग्रह शोधणारे क्लाईड विल्यम टॉमबॉ.
⌛१९२२ : स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी.
💥 मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन :-
⌛१६७० : कोंडाणा किल्ला लढविताना नरवीर तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ मराठी भाषा टिकवायची असेल तर शब्द वापर वाढवायला हवा संमेलनाध्यक्ष डॉ. काळे यांचे प्रतिपादन
2⃣ नोटाबंदीच्या निर्णयामुळे मागच्या वर्षी 2016 मध्ये सोन्याच्या मागणीमध्ये नोंदवण्यात आली मोठी घट
3⃣ पवार यांचं बोट धरून राजकारणात आलो असे पंतप्रधान सांगतात, मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मोदींचं बोट आवश्यक साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस
4⃣ डोंबिवली येथील 90 व्या साहित्य संमेलनाला मसाप पुणेच्या वतीनं 1 लाखाचा निधी, पुण्यभूषण फाऊंडेशनने हा निधी संमेलनाध्यक्ष डॉ. काळेंकडे केला सुपूर्द
5⃣ डोंबिवली मराठी शाळा जगवायच्या असतील तर मराठीचं ज्ञानभाषेत रूपांतर केलं पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6⃣ 20 फेब्रुवारीला होणार आयपीएल 2017 साठी खेळाडूंचे लिलाव
7⃣ लिएंडर पेस! भारतीय टेनिस विश्वातील लिजंड डेव्हिस चषकात दुहेरीच्या सर्वाधिक लढती जिंकण्याच्या विश्वविक्रमाच्या उंबरठ्यावर, आज होणाऱ्या दुहेरीची लढत जिंकल्यास या विजिगीषू वृत्तीच्या या खेळाडूच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला जाईल.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" सज्जन लोकांना जबाबदारीने काम करण्यासाठी कायदे सांगायची गरज पडत नाही पण दुर्जन मात्र कायद्याच्या पळवाटा शोधत असतात."
______ प्लेटो
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*दुर्जन*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 कृष्णा तिम्मापुरे, पत्रकार, धर्माबाद
👤 राजरेड्डी गडमोड, येताळा
👤 संजय गायकवाड, धर्माबाद
👤 डी. एन. पाटील बेंबरेकर, देगलुर
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"पारदर्शक "
प्रत्येकाला वाटते आमचे
कार्य पारदर्शक आहे
ज्याच्या त्याच्या नजरेत
तर ते रोमहर्षक आहे
पारदर्शक रोमहर्षक हे
म्हणावं आनंदाने लोकानं
स्वस्तुती करू नका हे
सांगावं लागतयं शोकानं
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🔸 🔶 *॥ विचार धन ॥* 🔶 🔸
*मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी, अनेक उत्सव हे मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा झाल्याशिवाय होऊ शकत नाही. या उत्सवांमध्ये 'यथा देहे तथा देवे' हे सुत्र धाब्यावर बसवून आनंदी-आनंद केला जातो. आपल्या नाकासमोर जर कोणी सूत धरले, गुदगुल्या केल्या तर प्रचंड शिंका येतील. परंतु श्रीगणेशाच्या मूर्तीवर नाकातोंडात दूर्वा जाईपर्यंत थर मांडायला आपल्याला काही वाटत नाही. साधी झोपमोड आपल्याला चालत नाही, पण मंडपात कानठळ्या बसवणारा डी जे तो गणनायक आपल्या कानांच्या पाळ्यात आणि हा अपराध विशाल उदरात सामावून घेतो.*
*आपण सिग्नलला दोन मिनिटेही थांबत नाही, पण श्रीगणेशास मात्र दुपारच्या नैवद्याची संध्याकाळपर्यंत वाट पहावयास लावतो. प्रसंगी त्याला एकभुक्त ठेवतो. खरंतर पाहुण्यांचे 'स्वागत' आणि जाताना भावपूर्ण 'निरोप' ही आपली परंपरा. पण गणेशमूर्ती आणताना 'गोंधळ' आणि विसर्जनात 'कल्लोळ' ही नवपरंपरा आहे. मूर्तीपूजेचे हे भयानक स्वरूप आपणच इतर धर्मियांसमोर आणून ख-या पूजेपासून दूर गेलो आहोत. 'मूर्तीपूजन' हे सगुण रूपातील ईश्वरास अनुभवण्याचे साधन आहे, आणि ते समजावून घेतल्यास त्याचा खरा आनंद मिळेल.*
🔹🔷 *॥ रामकृष्णहरी ॥* 🔷🔹
☘☘☘☘☘☘
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯 *विचारवेध.........*✍🏻
=====================
आपण पुस्तके वाचायला शिकलो.त्यातून ज्ञान घेऊन जगायला शिकलो.पण माणसे जोडण्याचे काम मात्र शिकलो नाही.माणसे जोडण्यापेक्षा माणसापासून दूर दूर राहायला शिकलो.
नातेसंबंध, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा आपल्यातला हळुहळू कमी करायला शिकलो .खरे तर ज्ञानाने माणसे जोडली जातात पण माणसे तोडायला शिकलो. आम्ही चार पुस्तके शिकलो की,
आमच्यासारखे या जगात कोणीच श्रेष्ठ नाही असे म्हणायला लागलो.
अशा माणसांना खरे ज्ञान म्हणजे काय बहुतेक समजले नसावे .उलट अशी माणसे शिकून सवरुनही अज्ञानच आहेत असे म्हणायला काहीच हरकत नाही.ज्या ज्ञानाचा उपयोग आपल्या जीवनातील अज्ञान घालवणे आणि इतरांमधील असलेला अज्ञानपणा घालवून जीवन जगण्याची नवी दिशा दाखवने हा आहे. हा मुख्य उद्देश ठेऊन जगणे म्हणजे ज्ञान होय. अशा वर वर ज्ञान घेतलेल्या माणसांनी खरे ज्ञान म्हणजे काय हे शिकून माणसे जोडण्याचे काम शिकायला हवे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590.
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖
*वपुर्झा*
बाहेरच्या जगात स्वतःचं नाणे खर असून नुसतं चालत नाही, तर ते वाजवून दाखवण्याची किमया असावी लागते. त्यासाठी थोडं धाडस हवं
~ वपु काळे | इतर
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
========***********=======
*आजची बोधकथा*
🗯 *आजची बोधकथा*🗯
" एक उंट जंगलात चरण्यासाठी जात होता. तेथे राहणारा एक दुष्ट कोल्हा त्याला पाहून रोज विचार करायचा की याला कसे फसवता येईल. एकदा त्याने उंटाला विचारले,''काका, रोज गवत खाऊन तुम्हाला कंटाळा येत नाही का?'' उंट म्हणाला,''बेटा, माझ्या नशिबात गवत खाणेच आहे. या जंगलात दुसरे काय उगवणार?'' तेव्हा कोल्हा म्हणाला,'' मी तर रोज जवळच्याच एका शेतात जातो आणि तेथे गाजर, मुळा, काकडी, भोपळा खातो. तेथील भाज्या व फळे खूप रसाळ आणि ताजी असतात.'' उंटालाही अशी भाजी खावीशी वाटली व कोल्ह्याला त्याने तेथे नेण्यासाठी विनंती केली.
उंट कोल्ह्यासोबत शेतात गेला. कोल्ह्याने आधी जाऊन स्वत: खाऊन घेतले व उंटाला नंतर पाठविले. उंट शेतात जाताच कोल्ह्याने मग जोराने कोल्हेकुई सुरु केली. कोल्ह्याचा आवाज ऐकताच शेताचा मालक आणि त्याचे चार गडी शेतात घुसले. त्यांना पाहताच कोल्ह्याने जोरात धूम ठोकली व जंगलात पळून गेला पण बिचारा उंट पळता न आल्यामुळे तिथेच अडकून बसला. शेतक-याने उंटाला बेदम मारहाण केली.
त्याला मार खाताना पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. या गोष्टीला काही दिवस गेले. कोल्ह्याने उंटाला परत एकदा फसवून पुन्हा शेतात नेले व पुन्हा एकदा उंटालाच मार पडला. दरवेळी आपल्यालाच मार पडतो ही गोष्ट आता उंटाच्या लक्षात आली व त्याने कोल्ह्याची खोड मोडण्याचे ठरविले. काही दिवसांनी मोठा पाऊस झाला व जंगलामध्ये पाणीच पाणी झाले. चिखल आणि दलदलीमधून छोट्या प्राण्यांना बाहेर काढण्याची जबाबदारी सिंहाने उंटावर सोपविली. उंटाने सगळे प्राणी बाहेर नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले मात्र जेव्हा कोल्ह्याची वेळ आली तेव्हा उंटाने मुद्दामच जास्त खोल पाण्यात नेऊन डुबकी मारली. कोल्हा पाण्यात पाण्यात बुडून मरण पावला.
*तात्पर्य :*करावे तसे भरावे. जो जसा पेरतो तसेच फळ त्याला
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment