*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
----------------------------------------------------
http://fmbuleteen.blogspot.com
----------------------------------------------------
📅 दि. 05/02/2017 वार - रविवार
========***********=========
*📆 . . दिनविशेष . . 📆*
⌛१६६४ : शिवरायांनी आपले ठाण रायगडावर मातोश्री जिजाबाईच्या सहवासात मांडले.
💥 जन्म :-
⌛महाराष्ट्रातील सुप्रसिध्द कीर्तनकार बाबा महाराज सातारकर.
💥 मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन :-
⌛१९२० : संत वाड्मयाचे अभ्यासक विष्णुबुवा जोग.
⌛२००० : वैद्य माधवशास्त्री जोशी, महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाचे माजी अध्यक्ष.
⌛२००३ : गणेश गद्रे, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
========***********=========
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ न्यायालयाच्या आदेशामुळे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला अखेर सात मुस्लिम देशातील नागरीकांना केलेल्या अमेरिका प्रवेश बंदीवरुन माघार घ्यावी लागली माघार
2⃣ मुंबईत चांगल्या कामाचे श्रेय फक्त शिवसेनेचे, भाजपाचे नाही उद्धव ठाकरे.
3⃣ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच गझलला मिळाले स्थान महाराष्ट्रातून आले 110 गझलकार
4⃣ पवार साहेबांमुळे महिलांना 33 टक्के निवडणुकीत आरक्षण मिळाले सुप्रिया सुळे.
5⃣ बुलडाणा मलकापूर येथे कापसाच्या गंजीला आग लागून लाखो रूपयाचा कापूस जळून खाक झाल्याची घटना काल दुपारी घडली.
6⃣ गोव्यामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विक्रमी 83 टक्के तर पंजाब मध्ये 70 टक्के मतदान.
7⃣ भारताचा दिग्गज खेळाडू लिएंडर पेस आणि विष्णूवर्धन ही जोडी अतिशय अटीतटीच्या लढतीत पराभूत झाल्याने डेव्हिस चषकाच्या इतिहासात सर्वाधिक दुहेरी लढती जिंकण्याचा पेसचा विश्वविक्रम हुकला.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
========***********=========
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" स्वतःच्या वाट्याला जरी काटे आले असले, तरी दुसऱ्याला गुलाबाची सुंदर फुले देता येतात."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
========***********=========
*आजचा मराठी शब्द*
*दिग्गज*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
========***********=========
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 बाळासाहेब कदम
👤 नीलेश गोधने
👤 अच्युत पाटील खानसोळे
👤 सौ. रंजना जोशी, प्रा. शि. धर्माबाद
👤 विठ्ठल पेंडपवार, नांदेड
👤 श्याम राजफोडे
👤 संदीप मुंगळे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
========***********=========
*आजची @@ गुगली @@*
"खोती "
खोती घरातचं ठेवायची
प्रत्येकाची धडपड आहे
सामान्य कार्यकर्त्याची
मात्र उगी तडफड आहे
सामान्यालाही कधी
खोती करून द्यावी
खोतीसाठी किती दिवस
त्यांनी माती करून घ्यावी
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
========***********=========
*आजचा*
🔻🔻 *॥ विचार धन ॥* 🔻🔻
*आपण प्रत्येक नात्याचा सतत भौतिक पातळीवर विचार करीत असतो, आणि त्यामुळे कोणतेही नाते टिकविले तर टिकते. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात; पण जे नाते मोडणारच नाही, मोडूच शकत नाही, असे टिकाऊ बळ त्यात हवे. म्हणजे एकमेकांमधील प्रेमभाव हासुद्धा जगण्याचा भाग होतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करण्याची गरज नसते. सहजाविष्कार हेच त्या नात्याचे मुख्य सूत्र बनते. असे होताना आज दिसत नाही. कोणत्याही नात्यात आलेली विषवल्ली ही त्यातील निरपेक्षता गळून पडल्याने निर्माण होते. निरपेक्ष भावभावनांचे प्रकटीकरण प्रत्येकाच्या ह्रदयात व्हायला हवे.*
*हा मार्ग, विचार सहज सापडत अथवा उमजत नाही. त्यासाठी संत, गुरू लाभावे लागतात. मी - माझे असाच भाव कायम निर्माण होत राहिला तर भातृ आणि मातृदृष्टीने जगाकडे पाहता येणार नाही. त्यासाठी नको त्या भ्रमापासून दूर होणे गरजेचे ठरते. आपले चित्त जोवर आत्मज्ञानावर केंद्रित होत नाही तोवर सगळे नातेसंबंध हे जुजबी, पोरकट आणि मतलबी ठरतात. स्वार्थ हा त्याचा पाया बनतो. मग संबंधांची ती सगळी इमारत विखारी बनते.*
⚜🍁 *॥ रामकृष्णहरी ॥* 🍁⚜
⚜⚜⚜⚜⚜⚜
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
========***********=========
*आज*
🎯 विचारवेध..........✍🏻
====================
जे लोक तुम्हाला भेटायला येतात आणि तुम्ही त्यांना भेटलात की मनस्वी खुप आनंद होतो.कारण तुम्ही त्यांच्यासाठी आदर्श आहात, प्रेरणा आहात.
तुम्ही त्यांचे काही प्रश्न किंवा समस्या असलेल्या सोडवू शकाल त्याची अपेक्षा तुमच्याकडून असते.मग आपणही तितकेच त्यांना ओळखून घ्यावे.जे आपल्याकडून चांगल्या अपेक्षा व्यक्त करतात. त्या अपेक्षा आपण भंग करु नये. मीपणाचा मोठेपणा त्यांच्यासमोर आणू नये. त्यांना त्यांची बाजू मांडण्यापूर्वीच उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांचे मन नाराज करु नये किंवा अपमानीतही करु नये.हा त्यांचा अपमान नाही तर तुमचा अपमान आहे.त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी असलेल्या चांगल्या विचारांचा अपमान आहे हे ही तुम्ही विसरु नका.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद..9421839590.
💠🌷💠🌷💠🌷💠🌷💠🌷💠🌷💠🌷
*वपुर्झा*
निर्णय घेता न येणं ह्यासारखा दुसरा घातक दोष नाही. निर्णय न घेण्यापेक्षा चुकीचा निर्णय घेणं अधिक बरं. चुकीचा निर्णय घेणाऱ्या माणसांनी जीवनात यश मिळवलेलं आहे. परंतु जो निर्णय घेऊ शकत नाही त्याचं मन नेहमी 'हे करू की ते करू' ह्या गोंधळात गुंतलेल असतं. मात्र हा मनुष्य कधीही यशस्वी झाल्याचं ऐकिवत नाही. ज्याला निर्णय घेता येत नाही, त्याला कृती करता येत नाही. आणि ज्याला कृती करता येत नाही, त्याला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येत नाही.
~ वपु काळे | वपुर्झा
*संकलन :- संजय माचेवार, वसमत
========***********=======
*आजची बोधकथा*
🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
02. *❃ यशाचे गमक ❃*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
एका गावामध्ये एक खूप श्रीमंत शेतकरी होता. त्यांचाकडे खूप पैसा होता पण,त्याची पाच मुले ही खूप आळशी होती .कोणतेच परिश्रम करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. या गोष्टीचा त्या श्रीमंत शेतकऱ्यांला मोठा विचार पडायचा की माझ्या म्रुत्यू नंतर ही माझी मुले काहीच करणार नाही सर्व सम्पत्ति फुकट जाईल,म्हणून त्या शेतकऱ्यांनी सर्व मुलांना बोलावले व सांगितले कि मी गावाला जात आहे तेंव्हा तुम्ही सर्व शेतं खोदून शेतात आपल्या पूर्वजांनी सोने ठेवले आहे .ते सर्व सोने तुम्ही काढून सर्व वाटून घ्या मी वापस ये पर्यंत हे कार्य पूर्ण करा .शेतकरी गावाला गेल्यानंतर सर्व मुलांनी पूर्ण शेतं खोदले त्यांना कुठे सोने दिसले नाही पण ,शेतं पूर्ण खोदले व पाऊस सूध्हा भरपूर पडला तेंव्हा सर्वानी शेतांमध्ये धान पेरले व चांगले उत्पन्न सुध्हा निघाले .त्यांनी ते धान मार्केट ला विकून खूप धन जमवले शेतकरी वापस आला तेंव्हा सर्व हकीगत त्या मुलांनी सांगितली तेंव्हा शेतकरी खूप खुश झाला व म्हणाला हेच खरे धन
*_🌀तात्पर्य_ ::~*
खूप मेहनतीने व कष्टाने कोणतेही कार्य केले तर यश नक्कीच मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
श्री कॉम्प्युटर्स, धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
========***********=======
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
========***********=========
Comments
Post a Comment