फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 06 फेब्रुवारी 2016

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
📅 दि. /02/2017 वार - वार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛ १९३२ : दादासाहेब फाळके यांचा ’अयोध्येचा राजा (चित्रपट)’ हा पहिला मराठी बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
💥 मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन :-
⌛१९३९ : सयाजीराव गायकवाड, बडोद्याचे महाराज
⌛१९३१ : पंडित मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरूंचे वडिल.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣  अवघ्या नऊ तासात तुर्कमेनिस्थानला भूकंपाचे पाच जबरदस्त धक्के बसले. भूकंपाचे सर्व धक्के ४.५ ते ५.२ तीव्रतेचे असून केन्द्रबिन्दू भूगर्भात २ ते १० कि.मी. खोल आहे.
2⃣ मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी योग्य पाठपुरावा करावा, त्यासाठी समिती नेमावी, 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ठराव.
3⃣  शशिकला नटराजन होणार तामिळनाडूच्या नव्या मुख्यमंत्री, विधीमंडळाच्या नेत्या म्हणून झाली निवड.
4⃣ हिमाचल प्रदेशमध्ये चंबा, लाहुल- स्पिती, मंडी, कंग्रा, शिमला या ठिकाणांना हिमस्खलनाच्या धोक्याचा इशारा
5⃣  गुगलने प्रतिस्पर्धी टेक्नॉलॉजी कंपनी अॅपलला मागे टाकत जगातील सर्वात लोकप्रिय ब्रॅंड म्हणून कोरलं आपलं नाव
6⃣ गोव्यात मडगावमधील 8 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर 7 फेब्रुवारीला फेरमतदान घेण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय
7⃣ डेव्हिस कपमध्ये भारताने केला न्यूझीलंडचा 3 -1 असा पराभव.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*यशस्वी आयुष्यापेक्षा  समाधानी* *आयुष्य*
*केंव्हाही चांगलं*.
*कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो*

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *यशस्वी*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

       "स्वप्न "

ज्याच्या त्याच्या परीने
स्वप्न पहाणे सुरु आहे
प्रत्येकाला वाटते मीच
सा-यांचा गुरु आहे

गुरु म्हटल्यावर मलाच
सारं काही मिळायला हवे
कष्टा शिवाय फळ नाही
हे नक्की कळायला हवे

     शरद ठाकर
सेलू जि परभणी
  8275336675
----------------------------------------------------
*आजचा*
🔆~🔅 *॥ विचार धन ॥*  🔅~🔆

     *अनवाणी पायाने फोटो घेत असलेल्या माणसाला  एकदा 'लतादिदी' म्हणाल्या, "तुम्ही पायात चप्पल घाला, खाली वाळू आहे, खडे टोचून तुमचे लक्ष विचलित होईल." या साध्या गोष्टीत लताजींच्या 'यशाचे गमक' आहे. त्यांनी आयुष्यात अनेक ब-यावाईट प्रसंगी, संघर्षाच्या काळात आपल्या गाण्यावरील लक्ष विचलित होऊ दिले नाही. गाणे हेच आपले आयुष्य आहे, असे ज्याक्षणी त्यांना उमजले, तेथूनच यश* *त्यांच्याकडे आकर्षित झाले.*
      
       *जीवन जगताना असे अनेक प्रसंग येतात. कधी-कधी साध्या क्षणांनी तर कधी दु:खाचा डोंगर कोसळल्यामुळे आपले मन विचलित होते. मन विचलित न होऊ देणे, हे आपल्या हातात आहे. अशावेळी आपण अंतर्मुख झाले पाहिजे. 'खूप आभ्यास करूनही परिक्षेत गुण कमी मिळाले.' असं मुलं सांगतात. आभ्यासात एकाग्रता पाहिजे, मन स्थिर पाहिजे, मग हवं ते यश मिळू शकते.*
        *" मनाची एकाग्रता मोलाची आहे."*
          
         🌀 *॥रामकृष्णहरी  ॥* 🌀
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध.......✍🏻
〰〰〰〰〰〰〰

शब्दच असे आहेत की,
कधी चेह-यावरचे हास्य फुलवतात तर कधी
डोळ्यांत आनंदाचे किंवा दुःखाचे अश्रू आणतात.
शब्दांना मनही जोडता येतं आणि तोडताही येतं.
पण शब्द असे वापरा की,त्यात माणुसकीचे नाते जोडण्याचे काम शब्दांनीच केले पाहिजे.ज्यामुळे आपले संबंध इतरांशी चिरकाल टिकण्यासाठी मदत करतील.

- व्यंकटेश काटकर, नांदेड
  संवाद.9421839590.

🔮🔴🔮🔴🔮🔴🔮🔴🔮🔴🔮🔴🔮
----------------------------------------------------
*वपुर्झा*
आपण धुपासारख बनायला हवं. विस्तावावर कुणी का टाकेना, विस्तव अंगाला लागला की, सुगंध देण्याचं वातावरणात उदात्तता निर्माण करण्याचं काम आपलं.
~ वपु काळे |

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
      
🗯🗯 *खरा न्याय* 🗯🗯
  " एका गावात राम आणि शाम नावाचे दोन व्यापारी राहत असतात. ते एकमेकांचे खूप चांगले मित्र असतात. एक दिवस अचानक राम त्याची सर्व संपत्ती गमावतो. तो गरीब होतो. तो शामकडे मदतीसाठी येतो. शाम खूप दयाळू मानाने फार चांगला असतो. तो क्षणाचा हि विचार न करता,रामला आपल्या संपत्ती मधील अर्धा वाटा देऊन टाकतो.
शामच्या मदतीमुळे रामला फार आनंद होतो. तो शामला वाचन देतो कि, जेव्हा कधी तुला मदत लागेल तेव्हा मी तुला अवश्य मदत करीन. खूप वर्षानंतर शाम गरीब बनतो. त्याला रामची आठवण येते आणि तो मदतीच्या अपेक्षेने रामकडे जातो. परंतु राम त्याला मदत न करता घरातून हाकलून देतो
शामला खूप वाईट. राम खूप बदललेला असतो. शामच्या एका नौकाराने हे सर्व ऐकलेले असते. तो राजाकडे जातो आणि राजाला सर्व गोष्ट सांगतो. राजा सगळे ऐकून घेतो. सगळी माहिती काढतो.
राजा शामला आणि रामला बोलावतो. राजा रामला त्याच्या वचनाची आठवण करून देतो. राजा लगेच रामला आदेश देतो कि, त्याने त्याची अर्धी मालमत्ता शाम बरोबर वाटून घ्यावी शामला योग्य तो न्याय मिळतो. शामने रामला अर्धी मालमत्ता दिली होती तशीच राम शामला देतो. आता खरा न्याय होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◑◎✹★🔅★✹◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस, धर्माबाद*
──┅━━═▣🔻▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments