*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
📅 दि. 07/02/2017 वार - मंगळवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛२००३ : महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर.
💥 जन्म :-
⌛१९३८ : एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता.
💥 मृत्यू, पुण्यतिथी :-
⌛ २००३ : जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राज्य घटनेने मतदानाचा दिलेला पवित्र हक्क बजावण्यासाठी मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक आयुक्त सहारिया यांनी केले
2⃣ मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे तिसऱ्यांदा विजयी
3⃣ सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस मनी घेऊन माघवारीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून तीन लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरपुरात झाले दाखल, आज माघवारी असून विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आतूर
4⃣ एका वर्षात सर्व सिम कार्ड आधार कार्डसोबत जोडले जातील असं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितलं
5⃣ शशिकला नटराजन यांच्या मुख्यमंत्री बनण्याला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल.
6⃣ रामकुमार रामनाथन आणि युकी भांबरी या नव्या दमाच्या खेळाडूंनी केलेल्या शानदार कामगिरीच्या जोरावर डेव्हिस चषक टेनिस लढतीत भारताने वर्चस्व गाजवताना न्यूझीलंडचा ४-१ ने धुव्वा उडविला.
7⃣ भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवामुळे सातत्याने टीकेचे लक्ष्य होत असलेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार अॅलेस्टर कूकने दिला आपल्या पदाचा राजीनामा
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" कीर्ती नदीप्रमाणे उगमस्थानी अत्यंत अरूंद असते, परंतु दूरवर गेल्याने अत्यंत विशाल होते."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*कीर्ती*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 कवी बी. एल. खान
👤 पवनकुमार गट्टूवार, कुंडलवाडी
👤देविदास नारमोड, कास्ट्राईब
केंद्रीय बिलोली तालुका अध्यक्ष,
📱 9403205143
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"कार्यकर्ता "
पुढा-यांच्या पोरांसाठी
कार्यकर्ता उभा असतो
युवराज म्हणून त्याला
सहजच सुभा असतो
पुढा-यांच्या पोरांची
सहज होते सोय
कार्यकर्त्यांना माञ
चोखलेलीच कोय
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*आजचा*
~~~~‼ *विचार धन* ‼~~~~
*वैदिक परंपरेप्रमाणे सर्वप्रथम मृत्यू पावलेली व्यक्ति म्हणजे यम. सहाजिकच तो सर्वात आधी पितृलोकी गेला. त्यामुळे तेथील राजेपद त्याला मिळाले. याठिकाणी पुढील मृत व्यक्ति गेल्यानंतर यम त्यांना त्यांच्या दर्जाप्रमाणे स्थान देऊ लागला. त्या लोकी कोणत्याही अन्न-पेय आदि वस्तु स्वतंत्रपणे उपलब्ध नसल्याने ही पितरे त्याकरीता त्यांच्या जिवंत वंशजावर अवलंबून असतात. ज्या मृताचे वंशज नसतील अगर असूनही पितरांकरीता श्राद्धविधी करत नसतील, त्या पितरांना पितृलोकी उपाशी राहावे लागते.*
*या कल्पनेवरूनच मराठीत 'पाप्याचे पितर' हा वाक्यप्रयोग आला आहे. सामान्यपणे हडकुळ्या अगर दुबळ्या व्यक्तिस 'पाप्याचे पितर' असे संबोधले जाते. पापी व्यक्ति पापाचरण करणारी, आणि म्हणून धार्मिक आचरण न करणारी मानली जाते. अशी व्यक्ति आपल्या पितरांकरिता श्राद्ध करत नसणारच. मग भरण-पोषण न मिळाल्याने त्या व्यक्तिची पितरे यमलोकी अगदी दुबळी आणि लुकडी होत असणार. याउलट जो श्राद्धविधी करतो, त्याची पितरे मात्र सदृढ शरीराची असली पाहिजेत.*
🌹‼ *रामकृष्णहरी* ‼🌹
🍂🍂🍂🍂🍂🍂
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
********************
चांगल्या माणसांच्या हातून कधीच वाईट गोष्टी घडत नाहीत आणि वाईट विचार कधीही मनात आणत नाहीत.दुस-याबद्दलही कधी वाईट विचार आपल्या मनात आणत नाहीत. एखादा माणूस दुस-याबद्दल आपल्या मनात वाईट विचार आणत असेल तर त्याला थांबवण्याचे काम तो नक्कीच करतो. तो वाईट विचारांचा कधीही स्वीकार करत नाही आणि इतरांनाही करायला सांगत नाही.अशीच माणसे चांगला समाज घडावा याचे नेहमीच आपल्या मनात विचार आणत असतात.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590
🔮🔴🔮🔴🔮🔴🔮🔴🔮🔴🔮🔴🔮
----------------------------------------------------
*वपुर्झा*
व्यवहारात येणारी संकटं आणि समस्या निवारण्यासाठी जे वेगळं रसायन लागतं, त्याला 'मित्र' म्हणतात. ऐन वैशाखात 'वर्षा' ऋतूची शाश्वती आणि गारवा फक्त मित्रच देतो. कसलेही हिशोब न ठेवता जो गणिताप्रमाणे शाश्वत नेमकेपणा देतो, तो मित्र.
~ वपु काळे | घर हरवलेली माणसं
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*आजची बोधकथा*
" उन्हाळ्याच्या दिवसात, एक सिंह, एका आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तिथे एक उंदीर येतो. तो उंदीर सिंहला खूप त्रास देतो. त्यामुळे जागा होऊन, सिंहने पंजात उंदीरला धरला आणि त्यास आता फाडून टाकणार इतक्यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, ‘महाराज, आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान दयावे, हेच आपणास उचित आहे.’ ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले.
पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असताना आंब्याच्या झाडाजवळ जातो, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात सिंह सापडतो. त्यावेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठयाने ओरडू लागला. ती ओरडणं ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, ‘राजा, भिऊ नको, स्वस्थ रहा. ’ इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली.
*तात्पर्य:-*जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी, कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे. वैभव कायम राहीलच, असा नेम नाही, यासाठी आपल्या चालत्या काळी, मनुष्याने लोकांवर उपकार करून ठेविले, तर पडत्या काळात तेच "
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹🔅✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस, धर्माबाद.*
┅━━═▣🔻▣═━━┅
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment