*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 08/02/2017 वार - बुधवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛भारतीय ज्ञानपीठाची स्थापना
⌛१९९४ : कसोटी सामन्यात कपिलदेवने सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला.
💥 जन्म :-
⌛ १८९७ : डॉ. झाकीर हुसेन, भारताचे माजी राष्ट्रपती.
⌛१९०७ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजीं.
💥 मृत्यू :-
⌛ १९९९ : डॉ.इंदुताई पटवर्धन, आनंदग्रामच्या संस्थापिका, ज्येष्ठ समाजसेविका
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ सोशल नेटवर्कमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबुक संकेतस्थळ लवकरच आपल्या युजर्सचा दोन अब्जचा टप्पा गाठणार
2⃣ टाटा स्टीलच्या संचालक मंडळाने एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी केली निवड.
3⃣ सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक दृष्टीने राज्यात आघाडीवर, शैक्षणिक गुणवत्तेचा वास्तव सांगणारा देशव्यापी अहवाल 'असर' संस्थेकडे सादर
4⃣ कारमधून पकडलेल्या विषारी सापाला पुन्हा जंगलात सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या मृत्यूची घटना घडली आहे. हा सर्पमित्र सोमनाथ म्हात्रे बेलापूर गावचा राहणारा असून घटनेनंतर त्याच्यावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. यापूर्वी त्याने शंभरहून अधिक सर्पांना जीवदान दिले आहे.
5⃣ नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या घरात चोरीची घटना समोर आली असून कैलाश सत्यार्थी यांचा नोबेल पुरस्कार ही चोरांनी पळवला आहे
6⃣ कसोटी जिंकण्यासाठी २० बळी घेण्यावर विशेष भर देत टीम इंडियाचे मुख्य कोच अनिल कुंबळे यांनी बांगला देशविरुद्ध एकमेव कसोटीत विजयी लय कायम राखू, असा विश्वास व्यक्त केला आहे
7⃣ टी 20 अंध विश्वकपमध्ये भारताने नऊ गडी राखून केला न्यूझीलंड संघाचा पराभव.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" संस्कृती म्हणजे आपल्या मनावर ताबा व दुस-याच्या दुःखाची जाणीव होय."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*संस्कृती*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 रविंद्र भापकर तंत्रस्नेही शिक्षक.
👤 राजेश्वर ऐनवाड, सहाशिक्षक, धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"मत भेद "
मत भेद झाले की
मन भेद होतात
किती सांधले तरी
आत छेद जातात
मन भेद झाले की
मनं जुळतं नाहीत
एकदा तुटलेली मनं
पुन्हा मिळतं नाहीत
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*आजचा*
➖ ✖ ‼ *विचार धन* ‼ ✖ ➖
*वंश टिकला तरच आपल्याला अन्नपान मिळत राहील, ही पितरांची काळजी कालिदासने 'शाकुंतल' मध्ये व्यक्त केली आहे. राजा दुष्यंतास मूल नसल्याने त्याची पितरे दुष्यंताच्या मृत्यूनंतर आपल्याला पिंडदान कोण करणार ? या विचाराने रडवेली होत. राजाने अर्पण केलेल्या जलाने आपले अश्रू धुवून मग उरलेले जल ती प्राशन करीत. अशा परिस्थितीत धार्मिकदृष्या बघितले तरी पितरे आपले वाईट करतील असा विचार करणे तितकेसे योग्य नाही. उलट त्यांच्याबद्दल आदरभाव राखला जावा.*
*कुटुंबातील हयात ज्येष्ठांचा आदर करणे हेही तितकेच महत्वाचे आहे. आपले आई-वडिल जिवंत असताना त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे अगर त्यांचा अपमान करणे, त्यांची काळजी न घेणे आणि मृत्यूनंतर मात्र पितरांचा त्रास होऊ नये म्हणून निरनिराळी कर्मकांडे करणे व्यर्थ होय. मातृदेवो भव:, पितृदेवो भव: असा उपदेश आपल्या संस्कृतीने केला आहे. त्याकडे दुर्लक्ष करायचे, हे तर्कसंगत नाही. म्हणूनच असे म्हणावेसे वाटते की, ज्येष्ठांचा आदर करणे सर्वात महत्वाचे आहे. अर्थातच ज्यांची कोणाची श्रद्धा असेल तर त्याने श्राद्धकर्मे जरूर करावीत.*
•◆● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●◆•
☆☆☆☆☆☆
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध.........✍🏻
====================
ज्यांना स्वाभिमानाने,
निर्भिडपणे,समाधानाने आणि आदर्शवृत्तीने जीवन जगायचे आहे त्यांनी सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे.कारण सत्याचा मार्गच असा आहे की,तो आपल्या जीवनाला योग्य दिशेकडे आणि आपल्या चांगल्या ध्येयाच्या पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकतो.कितीही कठीन परिस्थितीत आपल्या मनाला सत्यापासून परावृत्त करीत नाही.मग अशा मार्गाचा स्वीकार करायला काय हरकत आहे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590 /
8087917063.
🌅🌷🌅🌷🌅🌷🌅🌷🌅🌷🌅🌷🌅🌷
----------------------------------------------------
*वपुर्झा*
प्रत्येक सौख्याची किंमत त्याच्या मूल्यमापना इतकी असते. काहीही फुकट नसतं आणि कोणताही सौदा स्वस्तात होत नाही. काही गोष्टींची किंमत अगोदर मोजावी लागते, तर काहींची नंतर!
~ वपु काळे | वपुर्झा
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*❃ देवाचा मित्र ❃*
••◆•◆•◆★◆•◆•◆••
एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.
*स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? म्हणून "शीवभावे जीवसेवा "करा.व देवाचा मित्र व्हा*
"जे का रंजले गांजले -त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधु ओळखावा -देव तेथेची जाणावा" ||
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑★✹🔅✹★◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment