फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 09 फेब्रुवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 09/02/2017 वार - गुरुवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१९५१ : स्वतंत्र भारताच्य पहिल्या जनगणेचे काम सुरु झाले.
⌛१६८९ : राजाराम महाराजांचे रायगडावर मंचकारोहण झाले.
⌛१९३३ : साने गुरुजी  यांनी  नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
💥 जन्म :-
⌛१८७४ : स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद.
⌛१९२८ : कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते.
💥 मृत्यू :-
⌛१८९७ : नारायण मेघाजी लोखंडे.
⌛१९८१ : प्रसिध्द कायदेपंडित न्यायमुर्ती एस. सी छगला.
⌛१९६६ : दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी
2⃣ पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियानाला कॅबिनेटची मंजुरी
3⃣ 'अंनिस' गैरव्यवहारप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी तक्रारीची प्रत मिळावी, विश्वस्त प्रतापराव पवार, शैला दाभोलकर यांच्यासह इतर विश्वस्तांची सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे मागणी
4⃣  मुंबईत सिंगल तिकीट वाहतूक सेवा देण्याचा मानस, एकाच तिकिटावर रेल्वे, बसने प्रवास शक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
5⃣ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पैसे काढण्याच्या मर्यादेवरील निर्बंध पूर्णतः उठवण्याचा घेतला निर्णय
6⃣  भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्तम वन-डे फलंदाज आहे, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगने व्यक्त केली
7⃣ भारत-इंग्लंड U 19 संघांमधला अखेरचा वन डे सामना टाय. अखेरच्या चेंडूवर विजयासाठी एक धाव हवी असताना भारताचा ईशान पोरेल धावचीत.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे, तो त्यालाच मिळतो; जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *विस्तीर्ण*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 राष्ट्रपाल सोनकांबळे, येवती
👤 राजेश मनुरे, धर्माबाद

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

      "नाद "

उकंडे उकरायचा
काहींना नाद असतो
उकंडा उकरला की
हमखास वाद असतो

उकंडा उकरला की
वाद झाल्या शिवाय रहात नाही
उकंडे उकरणाराची
सवय काही जात नाही

    शरद ठाकर
  सेलू जि परभणी
  8275336675
  ----------------------------------------------------
*आजचा*
🌷 ☀ *॥ विचार धन ॥* ☀ 🌷

*हत्ती आणि सात आंधळ्यांच्या कथेप्रमाणे आपापल्या खिडकीतून दिसलेला आभाळाचा तुकडा म्हणजेच ते विस्तीर्ण, अमर्याद आभाळ असल्याचा भ्रम निर्माण होतो. शोध मागे पडतो. माझ्याच मोजपट्टीनं जगाला मोजायच्या नादात मी विसरून जातो की एकाचवेळी आपापल्या अनुभवांच्या आणि अनुभूतींच्या खिडक्यांतून असंख्य डोळे या आकाशाकडे बघताहेत. मी माझी खिडकी मोठी करण्याऐवजी माझ्याच खिडकीची चौकट भक्कम करून घेतोय आणि आभाळाच्या कितीतरी रंगछटांना, आकारांना मुकतोय.*

*हे सवंग...हे भिकारडं...हे सखोल.....हे बाजारू...* *असे शिक्के मारण्याच्या नशेत मीही एखाद्या साम्राज्यवाद्याच्या पंगतीत जाऊन बसल्याचं मला कळतही नाही. सत्य गवसल्याच्या भ्रमात मी सत्यापासून अधिकाधिक दूर जात राहतो. जर दुस-याच्या खिडकीचा आदर करणंही जमणार नसेल तर कशाला गप्पा मारायच्या वैश्विकतेच्या ?*
*"सारं जग जोडायला निघालेल्यानं आधी स्वत:ला मोडायला शिकलं पाहिजे...'*
           
       ~~ 🎀 *॥ रामकृष्णहरी ॥* 🎀~~
            
     *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध.........✍🏻
====================
ज्यांना स्वाभिमानाने,
निर्भिडपणे,समाधानाने आणि आदर्शवृत्तीने जीवन जगायचे आहे त्यांनी सत्याचा मार्ग अवलंबला पाहिजे.कारण सत्याचा मार्गच असा आहे की,तो आपल्या जीवनाला योग्य दिशेकडे आणि आपल्या चांगल्या ध्येयाच्या  पूर्णत्वाकडे घेऊन जाऊ शकतो.कितीही कठीन परिस्थितीत आपल्या मनाला सत्यापासून परावृत्त करीत नाही.मग अशा मार्गाचा स्वीकार करायला काय हरकत आहे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संवाद.9421839590 /
           8087917063.

🌅🌷🌅🌷🌅🌷🌅🌷🌅🌷🌅🌷
----------------------------------------------------
*वपुर्झा*

"आयुष्य खुप साधे असतं. कधीकधी खुप रटाळ असतं. आयुष्याच महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडण. ह्याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्येय आला पाहीजे".
~ वपु काळे | महोत्सव

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
  
               *कुरापतीऊंदीर*

एका ठिकाणी एक मोठा हत्ती शांतपणे  बसलेला असतो, तेवढयात एक कुरापती ऊंदराला हत्तीला चिडवायची हुक्की येते, तो आपल्या बिळातुन येऊन तो हत्तीला त्रास देवू लागतो, सुरवातीला हत्ती दुर्लक्ष  करतो, पण नंतर ऊंदराला मजा येवू  लागते, हत्तीला त्रास देण्यात, हत्ती जागेवरुन ऊठतो आणी ऊंदराला मारण्या साठी त्याच्या  बिळाच्या दिशेने आपल्या डोक्याने टक्कर मारू लागतो, ऊंदीर आत  असल्याने ऊंदराला काहीच फरक पडत नाही, तो परत दुसरी कडुन त्रास  देत राहतो, कारण ऊंदराला पक्क माहीत होतं की हा हत्ती प्रचंड ताकदवर आहे, तसाच त्याचा टराग ही प्रचंड आहे, पण तरीही तो आपणास हरवु शकत नाही, कारण त्याचा राग आणि  अतिऊत्साहीपणाच त्याला नडेल, जितका ऊंदीर त्रास देऊ लागला, तितका हत्तीचा राग अजुन वाढु लागला ,आणि आपण कुणाशी  भांडतो कशासाठी भांडतोय , हे  हत्तीच्या लक्षात आले नाही, शिवाय ऊंदराचे तर कामच आहे कुरापतीं  करणे, आपण तिकडे लक्ष न देता  त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण  ऊंदराला हरवु शकतो हेही हत्ती  विसरला, ऊंदीर आपल्याला आपल्या  ऊद्देशापासुन लांब नेतोय हे पण  हत्तीच्या ध्यानातच येत  नसते, आणि शेवटी इतक्या मोठया बलाढ्य  हत्तीने ,ऊंदराच्या फालतु गोष्टीमुळे, आपले डोके आपटुन आपटून आपला जीव गमावला.आता यात ऊंदराचे काही नुकसान झाले  का ? नाही, उलटे  ऊंदराने चांगले स्वतःचे मनोरंजन करून घेतले, वरून एका बलाढ्य हत्तीला हरविण्याचे श्रेय आणि आनंद मिळवला. हत्तीला त्याच्या ताकदीच्या गर्वाने टझुकवलं आणी बुद्धीने काम करणं थांबवलं. जर  वेळीच त्याने विचार केला असता , आणि त्याप्रमाणे वागला असता, तर  असं कोणीही त्याची ताकद आणी  रागाचा गैरफायदा घेतला नसता.
*तात्पर्य*- समाजात पण ?असच  होत असतं. एकदा का कळालं की  आपण गरम डोक्याचे आहोत आणी  रागा मध्ये भान विसरून जातो, तेव्हा छोटा ऊंदीर ही आपला नाश करु  शकतो, शांत राहा आणि चांगला निर्णय घ्या, आपल्या जीवनात विजयी व्हा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,* धर्माबाद.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments