फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 10 फेब्रुवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 10/02/2017 वार - शुक्रवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९२१ : काशी विद्यापीठाचे गांधीजींच्या हस्ते उदघाटन झाले
⌛१९२९ : राष्ट्रीय विद्यापिठाची स्थापना झाली.
⌛१९३१ : भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली
⌛१९४९ : पुणे विद्यापीठाची स्थापना
💥 जन्म :-
⌛१८०३ : मुंबईचा पाया घालणारे जगन्नाथ शेठ.
💥 मृत्यू :-
⌛१९८२ : नरहर कुरुंदकर, मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक आणि समाजचिंतक.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र ९ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीत होईल - एएनआय वृत्त
2⃣  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य शासनाला रॉकेलचा कोटा का कमी होऊ दिला, अशी विचारणा करून यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्याचे दिले निर्देश
3⃣ राज्यभरात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या निवडणुकांमुळे दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार नसुन, वेळापत्रकानुसारच दहावी, बारावीच्या परीक्षा
4⃣ कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्सनंतर डॉक्टर शॉना पांड्या ही भारतीय वंशाची अवकाशात जाणारी तिसरी महिला ठरणार आहे.  कॅनडाच्या अल्बर्टा युनिवर्सिटीमध्ये त्या न्यूरोसर्जन म्हणून कार्यरत आहेत.
5⃣ फ्रान्समधील अणुऊर्जा केंद्रात स्फोट, जीवितहानीचे वृत्त नाही
6⃣ लोढा समितीच्या शिफारशींवरून बीसीसीआयमध्ये अद्याप धुसफूस सुरूच, बीसीसीआयचा लोढा समितीच्या शिफारशींकडे कानाडोळा सुरूच
7⃣ हैदराबाद कसोटीत पहिल्या दिवसअखेर भारताच्या 3 बाद 356 धावा, विराट कोहली 111 आणि अजिंक्य रहाणे 45 धावांवर नाबाद

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" जेव्हा आम्ही नम्रतेने लहान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो."

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *नम्रता*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤जगन्नाथ दिंडे, सहशिक्षक, चिरली
📱8668453639

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

   "लाडीगोडी "

एकदा मन उठल्यावर
कशातच रमत नाही
पहिल्या सारखं पुन्हा
कधीच जमत नाही

जुळवून घ्यायचे म्हणजे
मन रमवावे लागते
जमत नसले तरी
लाडीगोडीने जमवावे लागते

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
  ----------------------------------------------------
*आजचा*
🚸 🕙 *॥ विचार धन ॥* 🕙 🚸

*एक खेळ बहुधा सर्वांनीच खेळला असेल. चिमणी उडाली, कावळा उडाला, एका एका पक्ष्यांबरोबर खेळातला एक एक गडी सुरक्षित होत गेला. त्यांच्या चेह-यावर जिंकल्याचा आनंद ओसंडून वाहत राहिला. उरलेल्या गड्यांच्या मुखावर गंभीर असे मुकेपण गडद होत गेले. हरल्याची चीड चेहरा लपवू शकला नाही. ते केविलवाणेपणे स्विकारून खेळात उतरावे लागते. जे जिंकले त्यांना आपण सुटल्याचा आनंद. जो हरला, तो स्वत:च्या नशीबाला कोसत बसला. तो आनंद, तो त्रागा, चीड, संताप, निराशा, त्या क्षणाची ती एक मूकपणे स्विकारावी लागणारी पीडाच..!*

*गावोगावी मांडलेला निवडणूकांचा खेळ काहीसा असाच. पण प्रत्येक वेळी पराभव मात्र त्या गावाचाच होतो. एवढंच काय त्यांचा विचार आणि त्यांच मतदेखील पराभूत होतं. ही वेळ का आली ? तर दरवेळी लबाडीच्या थापाच त्यांच्या वाट्याला आल्या. हजार चेहरे बदलूनही लबाडांनी लचके तोडले. सारेच चेहरे संवेदनाहीन प्राण्यांचे होते. माणुसकीच्या नात्याचे नव्हते. म्हणून आज गाव सर्रास पंचवार्षिकमध्ये स्वत:ला चारदा हिरव्या, पिवळ्या, लाल नोटांमध्ये विकून गरिबीसाठी मीठ-भाकरीची भूक भागवतो. बोटी आणि बाटलीवर त्यांना गुलाम बनवणारे, गांधीछाप नोटेवर खरीदणारे खादीवाले, गांधी टोपीवाले आजवर अनेक आलेत, पण एकही गांधी अजूनही खेड्याकडे आला नाही.*
         *"कधी येणार बापू तू.. ?"*

    🍁✋ *॥ रामकृष्णहरी ॥* ✋🍁
        *संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯विचारवेध...........✍🏻
====================

जी माणसे तुमची तुमच्यासमोर स्तुती करायला लागतात.तुम्ही त्यांच्या स्तुतीने चढून जाऊन नका किंवा आनंदाने हुरळूनही जाऊ नका. याचा अर्थ असा समजून घ्या की,
तुमच्याकडे त्याचे काहीतरी काम आहे किंवा तुमच्याबद्दल त्याच्यामनात काहीतरी वाईट करण्याचा बेत आहे.अशा लोकांपासून थोडे सावध रहा.नाही तर एक दिवस तुमचा त्यांच्याकडून काहीतरी धोका होऊ शकतो..

-व्यंकटेश काटकर,नांदेड
भ्रमण.9421839590.

🌷🌇🌷🌇🌷🌇🌷🌇🌷🌇🌷🌇
----------------------------------------------------
*वपुर्झा*
कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखा असतो.
~ वपु काळे | रंगपंचमी

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
          *आजची बोधकथा* 
         " एकदा एक व्यापारी त्याच्या काही नोकरांबरोबर दुसऱ्या देशात व्यापार🏇🏇🏇 करण्यासाठी जात असतो जाताना त्यांना रस्त्यात वाळवंट लागते. वाळवंटात चालून चालून त्याच्या काही नोकरांना पाण्याविना चक्कर यायला लागते. उन्हामुळे आणि जवळ कोठेही पाणी नसल्यामुळे🚱🚱 नोकर कासावीस होऊ लागतात . 🏖🏖
त्यांची अवस्था पाहून व्यापारी मनात विचार करतो जर मीच माघार घेतली तर माझे नोकर पण माघार घेतील. मला माघार घेऊन चालणार नाही. मला आशावादी राहायला हवे. व्यापारी इकडे तिकडे पाहू लागतो त्याला जवळच एक हिरवे झुडूप दिसते. ☘☘☘
व्यापारी विचार करतो 🤔🤔कि जर पाणी नाही तर हिरवे झुडूप कसे आले? म्हणजे नक्कीच येथे पाणी असावे . व्यापाऱ्याला हायसे वाटते. 🙂🙂

व्यापार्याने नोकरांना तेथे खोदायला सांगितले त्याचे नोकर खोदतात पण खाली दगडच दिसतात. पाणी लागतच नाही व्यापारी म्हणतो आणखी खोल खोदा व्यापारी दगडांना आपले कान लावतो त्याला जमिनी खालील पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. व्यापारी त्या दगडांवर एक हातोडा मारतो. आणि काय आश्चर्य जमिनीतून पाण्याचे कारंजे उडू लागते. ते पाणी पिउन सर्वाना खूप आनंद होतो. त्यांच्या कष्टाचे सार्थक होते.
*तात्पर्य – प्रयत्न केला तर यश मिळते. "*   ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★🔅★✹◎◑◎●
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,  धर्माबाद.*
─┅━━═▣🔻▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments