*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 14/02/2017 वार - मंगळवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
. *व्हॅलेन्टाईन्स डे*
⌛१८९९ - अमेरिकेत निवडणुक यंत्र वापरण्यास सुरूवात.
💥 जन्म :-
⌛१९३३ - मधुबाला, हिंदी चित्रपट अभिनेत्री
💥 मृत्यू :-
⌛१९८९ - जेम्स बॉन्ड, अमेरिकन पक्षीशास्त्रज्ञ मृत्यू
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ बनावट कंपनी स्थापन करून सुमारे ३७00 कोटी रुपयांचा ऑनलाइन घोटाळा करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच नोएडात आणखी एक ५00 कोटींच्या ऑनलाइन घोटाळा समोर आला आहे.
2⃣ बिहार राज्यात शिवहरमध्ये 19 नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
3⃣ एक्झिट पोल घेतल्यामुळे दैनिक जागरण या हिंदी वृत्तपत्रावर एफआयआर दाखल करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश.
4⃣ नोटाबंदी घोटाळ्याविरोधात 17 फेब्रुवारीला आम आदमी पार्टी करणार देशव्यापी आंदोलन.
5⃣ २८ फेब्रुवारीला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
6⃣ - एकमेव कसोटी सामन्यात भारताचा बांगलादेशवर 208 धावांनी विजय, बांगलादेशचा डाव 250 धावांवर आटोपला.
7⃣ जो रुट बनला इंग्लंडचा नवा कसोटी कर्णधार
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
"तुम्ही आपली गुलामगिरी नष्ट करा.
स्वाभिमान शुन्यतेचे जीवन जगणे नामर्दपणाचे आहे."
-------------- *डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*स्वाभिमान*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 रितेश भोसले, परळी
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"गंमत जंमत "
शाब्दिक चकमकी ह्या
गंमत जंमत आहेत
काहीही बोलले तरी
दोघेही संमत आहेत
लोकांसमोर विरोध करून
हे गंमत जंमत करतात
एकमेकांचे अंधारात
दोघेही पाय धरतात
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*आजचा*
🔆~🔅॥ विचार धन ॥* 🔅~🔆
*अनवाणी पायाने फोटो घेत असलेल्या माणसाला एकदा 'लतादिदी' म्हणाल्या, "तुम्ही पायात चप्पल घाला, खाली वाळू आहे, खडे टोचून तुमचे लक्ष विचलित होईल." या साध्या गोष्टीत लताजींच्या 'यशाचे गमक' आहे. त्यांनी आयुष्यात अनेक ब-यावाईट प्रसंगी, संघर्षाच्या काळात आपल्या गाण्यावरील लक्ष विचलित होऊ दिले नाही. गाणे हेच आपले आयुष्य आहे, असे ज्याक्षणी त्यांना उमजले, तेथूनच यश त्यांच्याकडे आकर्षित झाले.*
*जीवन जगताना असे अनेक प्रसंग येतात. कधी-कधी साध्या क्षणांनी तर कधी दु:खाचा डोंगर कोसळल्यामुळे आपले मन विचलित होते. मन विचलित न होऊ देणे, हे आपल्या हातात आहे.*
*अशावेळी आपण अंतर्मुख झाले पाहिजे. 'खूप आभ्यास करूनही परिक्षेत गुण कमी मिळाले.'असं मुलं सांगतात. आभ्यासात एकाग्रता पाहिजे, मन स्थिर पाहिजे, मग हवं ते यश मिळू शकते.*
*" मनाची एकाग्रता मोलाची आहे."*
🌀 *॥रामकृष्णहरी ॥* 🌀
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध..........✍🏻
===================
आपल्या जीवनाला अधिक सुंदर बनवायचे असेल तर चांगल्या व्यक्तींच्या सहवासात,
चांगल्या पुस्तकांच्या सानिध्यात,चांगल्या मित्रांच्या सहवासात व चांगल्या प्रसन्न वातावरणात राहावे,
ज्यामुळे आपले जीवन अधिक सुंदर बनू शकेल. ज्याचे परिणाम इतरांचेही जीवन सुंदर बनण्यासाठी तुमची त्यांना प्रेरणा मिळेल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.
🌇🏡🌇🏡🌇🏡🌇🏡🌇🏡🌇🏡
----------------------------------------------------
*वपुर्झा*
सर्वात जीवघेणा क्षण कोणता? खूप सद्भावनेनं एखादी गोष्ट करायला जावं आणि स्वतःचा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणा यावा, सद-हेतूंचीच शंका घेतली जावी, हा!
~ वपु काळे | वपुर्झा
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*आजची बोधकथा*
" एका जंगलात एक सिंह त्याच्या मित्रांसोबत राहत होता. एक कावळा, एक कोल्हा आणि एक चित्ता, अन्न मिळवण्यासाठी , पोटासाठी सिंह शिकार करत असे आणि मग तो आणि त्याचे मित्र मनसोक्त भोजन करीत असत.
एक उंट एक दिवस रस्ता चुकतो आणि सिंहाच्या गुहेजवळ पोहंचतो. तो सिंहाला म्हणतो मला मारू नका ! सिंह त्याला म्हणतो ठीक आहे. तू आमच्याबरोबर राहू शकतोस. उंट तिथे आनंदाने राहतो.
एक दिवस, सिंह शिकार करताना जखमी झाला. त्यामुळे तो अशक्त होतो आणि शिकार करणे थांबवतो. कारण त्याला ते शक्य नव्हते. चित्ता आणि कोल्हा सगळ्यांना पुरेल इतकी शिकार करू शकत नव्हते. कधी - कधी ते परत रिकाम्या हातानेच परत येत असत. शिकारी विना जगणे त्यांना खूप कठीण झाले होते.
एका संध्यकाळी , कोल्हा सिंहाकडे जातो आणि म्हणतो, महराज , तुम्ही मला खा आणि आपला जीव वाचवा. सिंह म्हणतो. नाही, मी तुला मारू शकत नाही. नंतर चित्ता येतो आणि कोल्हासारखीच सिंहाला विनंती करतो. पण सिंह त्याला खाण्यचे टाळतो.
उंट विचार करतो की, सिंहाचे त्यांचावर प्रेम आहे म्हणूनच त्यांना तो मारणे टाळत आहे. मग त्याच्या मनात असा विचार येतो कि मलाच त्यांनी खाल्ले तर त्यांचे पोट भरेल. आपण त्यांच्यासाठी बळी जाऊ. उंट तोच प्रश्न विचारतो तेव्हा सगळे प्राणी त्याला मारून टाकतात. उंट मूर्ख पणामुळे आपला जीव गमावतो.
*तात्पर्य - आती शहाणा त्याचा बैल रिकामा. "*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍�संकलन ✍�*
*साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment