*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 15/02/2017 वार - बुधवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
. *विश्वकर्मा जयंती*
💥 जन्म :-
⌛१५६४- प्रसिध्द खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ जन्म
⌛१८७१- सुप्रसिध्द शिक्षण तज्ञ आल्फ़्रेड व्हॉइटहेड यांचा जन्मश्री.
💥 मृत्यू :-
⌛१८६९- प्रख्यात शायर मिर्झा गालिब यांचे निधन
⌛१९५०- सरदार वल्लभाई पटेल यांचे निधन
⌛१९८०- कुष्ठरोग्यांचे पहिले भारतीय सेवक पद्मश्री मनोहर दिवान यांचे निधन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ मराठवाड्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती या मिनी मंत्रालयासाठी होणार्या निवडणुकीच्या प्रचार तोफा काल सायंकाळी थंडावल्या, उद्या सकाळी 07:30 ते सायंकाळी 05:30 या वेळात होईल मतदान
2⃣ अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांच्यासह 20 नेत्यांची पक्षातून केली हकालपट्टी
3⃣ जम्मू-काश्मीरमध्ये हांडवारा येथे तीन दहशतवाद्यांचा खात्मा, चकमकीत एक जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरु.
4⃣ अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात जुन्या एक हजार व पाचशे रुपयांची दहा लाख रुपयांची रोकड पकडली
5⃣ सोलापूरमध्ये मराठा समाजाचे आरक्षणाविरोधात गाजर आंदोलन. आंदोलक आक्रमक, भाजप सरकारचा केला निषेध
6⃣ मुंबई विद्यापीठाने आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय ‘शिवोत्सव’ युवा महोत्सवाचे सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ उपविजेते
7⃣ डोणजा गावाच्या विकासासाठी खासदार निधीतून राज्यसभेतील खासदार आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मंजूर केले ४ कोटी रुपये
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*"माणसाने खावे जगण्यासाठी,
पण जगावे समाजासाठी...."*
----- *डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*शिवोत्सव*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 अशोक गायकवाड, पदवीधर शिक्षक,
कें प्रा शा कन्या कुंडलवाडी बिलोली
👤 बाबूराव बोधनकर, प्राथमिक शिक्षक,
जि प हा धर्माबाद
👤 घनश्याम नानम, पोस्ट ऑफिस, धर्माबाद
👤 किरण गौड, धर्माबाद
👤 भारत लाखे
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
" स्वहित "
चांगल्या ला असते तशी
काहींची वाईटाला साथ असते
वेळ प्रसंगी विवेकाला ही
कधी कधी लाथ असते
स्वहिता पुढे विवेक ही
बाजूला सारला जातो
आपल्या हाताने आपला
विचार मारला जातो
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*आजचा*
🔔 *!!!!!!!!॥ विचार धन ॥!!!!!!!!*🔔
*सुखकर्ता आणि दुखहर्ता ही गणेशाची स्तुती फक्त स्तुतीच्या पातळीवर न राहता आपल्यात कशी परिवर्तीत होईल याकडे लक्ष हवे. आपले उलट होते आरतीतल्या शब्दांपेक्षा सगळे लक्ष प्रसादावर असते. त्यामुळे आसक्ती वाढते. आरती म्हणणे ही चार चौघांमधली सक्ती होऊन बसते आणि सक्तीने केलेले कोणतेही काम फलप्रद नसते. घरातल्या माणसांना जेवायला लागते म्हणून स्वयंपाक करायचा आणि मन:पुर्वक स्वयंपाक करायचा यात जो मुलभूत फरक, तोच फरक जगण्यातल्या अध्यात्मात आहे.*
*तो फरक जेव्हा आपल्याला कळेल तेव्हाच बदल घडेल. अन्यथा फक्त प्रतिक्रिया घडत राहील. प्रतिक्रियावादी असणे आणि गुन्हेगार असणे यात व्यापक अर्थाने फार फरक नाही. जगण्याच्या व्याप-तापात माणूसपण संभाळणे गरजेचे असते. सामाजिक उत्सव आणि उपक्रमांत ते संभाळण्याची संधी असते, पण त्या संधीचे सोने किती लोक करत असतील ? समाजातील जास्तीत जास्त वर्ग अशा उत्सवांतून उजळून निघायला हवा.*
☘ *॥ रामकृष्णहरी ॥* ☘
🍀🍀🍀🍀🍀🍀
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध.......✍🏻
_______________________
हिरा हा हिराच असतो.तो कुठेही असला तरी तरी तो चकाकतो.त्याचे अस्तित्व काही कमी होत नाही.तो एखाद्या राजाच्या मुकुटात असो की एखाद्याच्या हातामधल्या सोन्याच्या अंगठीत असो किंवा बंद तिजोरीत असला तरी तो चकाकतो.त्याचप्रमाणे चांगल्या माणसाचेही तसेच असते.तो कुठेही असला तरी त्याचे चांगुलपण कधीही कमी होत नाही.पण एवढे खरे आहे त्यांच्या सहवासात राहिले तर आपल्यामधले काही कमी गुण असतील तर त्यांच्या सहवासाने अधिक चांगले गुण वृध्दिंगत होण्यास मदत करतात.
म्हणून केव्हाही जीवनात हि-यासारख्या चांगल्या माणसांच्या संगतीत राहणे पसंत केले पाहिजे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
भ्रमण.9421839590.
💎🔎💎🔎💎🔎💎🔎💎🔎💎🔎
----------------------------------------------------
*वपुर्झा*
वेळ पुरत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो. मधे लुडबूड करत नाही. आपण त्याला वापरतो, पण तो स्वत:च अस्तीत्वही प्रकट करत नाही. पण वेळ जेव्हा उरतो, तेव्हा त्याच्यासारखा वैरी नाही. तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो. असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते क्षण मोकळे म्हणायचे, पण ते क्षण भकास असतात.
~ वपु काळे | वपुर्झा
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*आजची बोधकथा*
"एका शेतकऱ्याने एकदा आपल्या कोंबड्याला हाका मारायला सुरुवात केली असता तो कोंबडा पळून जाऊ लागला.
त्याच शेतकऱ्याने पिंजऱ्यात एक ससाणा पाळला होता. तो त्या कोंबड्याला म्हणाला, 'अरे वेड्या, मालक एवढ्या प्रेमाने तुला हाका मारत आहे, आणि तू असा पळून का जातोस? एवढ्या प्रेमाने जर त्याने मला हाक मारल्या असत्या, तर मी मोठ्या आनंदाने त्याच्याकडे गेलो असतो.'
यावर तो कोंबडा म्हणाला, 'अरे ससाण्या, आजवर माझ्या अनेक नातेवाइकांना या मालकाने अशाच प्रेमाने जवळ बोलावून, त्यांच्या माना कापताना मी पाहिले आहे. त्याची प्रेमळ हाक ऐकताच मी त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. तुझी गोष्ट अगदी निराळी आहे. त्याच्या दृष्टीने तुझे मांस रुचकर नसल्याने, तुला त्याच्याकडून कापले जाण्याचे भय नाही.'
*तात्पर्य* : प्रेमळ बोलणाऱ्यांच्या मनात प्रेम असतेच असे नाही."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍संकलन ✍*
*साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
─┅━━═▣🔻▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment