फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 18 फेब्रुवारी 2017

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 18/02/2017 वार - शनिवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९०५- भारतीय होमरुल सोसायटीची लंडन येथे शामजी कृष्ण वर्मा यांनी स्थापना केली.

⌛भारतीय ज्ञानपीठ संस्थेची स्थापना करण्यात आली.
💥 जन्म :-
⌛ १८२३- लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म
⌛ १९२६- हॉकी खेळाडू नंदीसिंह यांचा जन्म
⌛ १४८६- बंगालमधील थोर संत चैतन्य प्रभू यांचा जन्म

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ ग्रीन कार्डसाठी भारतीय खर्च करतायत 5 लाख डॉलर 
2⃣ तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी अण्णाद्रमुकमधून निष्कासित 
3⃣ मुंबईत राष्ट्रवादीची संघटना बांधण्यास कमी पडलो – सुप्रिया सुळे 
4⃣ शिर्डीत साई संस्थानवर आयएएस अधिकारी नेमा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
5⃣ कोल्हापूरातील टेंबलाईवाडीच्या मुलांना मिळतेय लंडनचे शिक्षण 
6⃣ शिक्षकांच्या हातात खडूच्या एवजी ‘स्मार्टफोन’
7⃣ महाराष्ट्र सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून मिळणारा महसूल एक हजार कोटींनी घटला आहे. 

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" समाजाचा काैल हा पुष्कळ वेळा भाषणापेक्षा माैन व्रतानेच अधिक प्रभावीपणे व्यक्त केल्या जातो."

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *प्रभावी*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👥 सौ. रेखा बालाजी सुंकेवार, देगलुर
लग्नाचा वाढदिवस

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

     "पुड्या "

काही काही माणसांच्या
कसल्याही पुड्या असतात
विश्वास बसणार नाही
असल्याही उड्या असतात

विश्वास बसेल अशीच
मारली पाहिजे पुडी
नाहीतर मग खड्ड्यातच
पडत असते बरं उडी

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
  ----------------------------------------------------
*आजचा*
🌼 ☀ *॥ विचार धन ॥*☀ 🌼

*'चहा' आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग, नुसते पेय नाही तर वेगवेगळ्या घटनांमध्ये त्याला खास स्थान आहे.*

*'चहा' ही दोन अनोळखी माणसांमधल्या नात्याची सुरूवात असते व त्यांच्यातील गहि-या होत जाणा-या नात्याचा 'चहा' एक साक्षीदार असतो.चहाभोवती अनेक आठवणी पिंगा घालत असतात.*

*यातलंच एक अतिशय सुंदर, नाजुक,*
*कधी हवंहवसं वाटणारं...*
*आणि कधी आयुष्यभराची  सल,*
*देऊन जाणारं हळुवार नातं....**

*'त्याचं आणि तिचं!'*
    *'चहा' च्या साक्षीने*
          *गुंफलं जाणारं..*
              *गुलाबी नातं....!*
     
      🍵  *॥ रामकृष्णहरी ॥* 🍵
          ☕☕☕☕☕☕
*संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
________________________

तुम्ही जे काही चांगले काम हाती घेतले आहे ते काम पूर्ण होईपर्यंत थांबू नका.
जर तुम्ही जे काम थांबवून पुन्हा करु असे म्हणत असाल किंवा मी हे काम पूर्ण करणार होतो पण ते जमले नाही असं म्हणून काम थांबवत असाल तर तुमच्या कामाला  थांबविण्याचे काम फक्त ' पण ' हा एक अक्षरी शब्दच कारणीभूत आहे. जर तुम्हाला प्रचिती पाहायची असेल तर तुम्ही पण हा शब्द वापरुन पहा.काय होतं ते.तुमच्या पूर्ण होणा-या कामाला आणि तुमच्यातल्या आत्मविश्वासाला तडा निर्माण करण्याला पण हा शब्दच  कारणीभूत आहे.त्यामुळे ' पण ' या शब्दाला तुमच्या जीवनात कधीही थारा न देता आपले काम पूर्ण होईपर्यंत चालू ठेवावे.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
  संपर्क..9421839590,
  8087917063.

💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠🍃💠🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*

'काहीही वाईट घडलं की काहीतरी स्वतःचं जळतय एवढी जीवनाबद्दल ओढ हवी..स्वतःच्या दुखांबद्दल आपलं भांड नेहमीच मोठ ठेवावं आणि दुसा-यांबद्दल भांड एवढं लहान असावं की एका अश्रूनेही ओसंडून जाईल.
~ वपु काळे | भुलभुलैय्या

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
          🔵 *बोधकथा*🔵
       ••●===◆==◆===●••
      *❃ ज्ञानार्जनासाठी... ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   *एका साधूला* पितळेच्‍या धातूचे सोन्‍यात रूपांतर करण्‍याची कला अवगत होती. पण याचा उपयोग तो गरजुंना करण्‍यासाठीच करत होता. एकेदिवशी एक गरीब ब्राह्मण त्‍याच्‍याकडे आला. त्‍याला मुलीच्‍या लग्‍नासाठी पैशांची आवश्‍यकता होती. साधूने त्‍याची अडचण ओळखून त्‍याला एका पितळेच्‍या भांड्याचे रूपांतर सोन्‍यात करून दिले.

    ब्राह्मण सोनाराकडे गेला. सोनाराला त्‍याच्‍याकडे सोन्‍याचे भांडे पाहून मनात संशय आला. सोनार राजाकडे गेला. राजाने त्‍याची चौकशी केली केली तेव्‍हा ब्राह्मणाने खरी घटना सांगितली. राजाच्‍या मनात लोभाची भावना उत्‍पन्न झाली. त्‍याने साधूला ती विद्या शिकविण्‍याचे फर्मान काढले. साधूने राजाला ठामपणे नकार सांगितला. राजाने साधूला 15‍ दिवसांची मुदत दिली अन्‍यथा फासावर लटकावेन अशी धमकी दिली.

    राजा त्‍याच्‍याकडून काय उत्तर येते यासाठी दूत पाठवित असे पण साधू काही होकार देईना. हे पाहून राजाने वेश पालटला व तो साधूच्‍या येथे राहून त्‍याची सेवा करू लागला. साधूने राजाच्‍या सेवेवर प्रसन्न होऊन त्‍याला पितळापासून सोने तयार करण्‍याची विद्या शिकविली. राजा महालात परतला.

    पंधराव्‍या दिवशी साधूला बोलावून त्‍याला विद्या शिकविण्‍याची आज्ञा केली. साधूने परत नकार दिला. तेव्‍हा राजा गर्वाने म्‍हणाला,’’ साधू तू मला कला शिकवली नसती हे मी जाणून होतोच पण मी ही हट्टी आहे. मी पण तुझ्याजवळ राहून ती कला शिकून तयार झालो आहे.’’ साधू म्‍हणाला,’’महाराज तुम्‍ही माझी सेवा करून ती कला शिकला आहात, धमकी देऊन नाही.

    *_🌀तात्पर्य_ ::~ * ज्ञानासाठी गुरुची मर्जी सांभाळावी लागते.’’*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
            *✍�संकलन ✍�*
              *साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂0

Comments