*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 19/02/2017 वार - रविवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९४६- भारतीय नौदल सैनिकांनी याच दिवशी इंग्रजाविरुध्द बंड पुकारले.
💥 जन्म :-
⌛१६३०- पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. शिवाजी महाराज यांचा जन्म
💥 मृत्यू :-
⌛१९१५- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते गोपाळ कृष्णा गोखले यांचे निधन
⌛ नरहरी सोनार पुण्यतिथी
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ नोटाबंदीच्या काळात आपल्या बँक खात्यामध्ये दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करणा-यांकडे आयकर विभाग चौकशी करण्याची शक्यता असून उत्पन्न स्त्रोताची माहिती मागू शकतात.
2⃣ मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 1582 ठिकाणी 7304 मतदान केंद्र उभारणार.
3⃣ तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी 122 मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला.
4⃣ अहमदनगर जिल्ह्यात पांगरमल येथे निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पार्टीत बनावट दारू देणारा मुख्य आरोपी मोहन श्रीराम दुग्गलला नांदेड येथील गुरूद्वारातून पोलिसांनी केली अटक.
5⃣ जिओलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका जर्नलने छापलेल्या रिपोर्टनुसार झीलँडिया नावाच्या आठव्या खंडाचा लागला शोध
6⃣ कर्णधार मिताली राज आणि सलामीची फलंदाज मोना मेश्राम या दोघींच्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक पात्रता फेरीच्या सुपरसिक्स लढतीत बांगला देशचा ९९ चेंडू आधीच नऊ गड्यांनी पराभव करीत मुख्य फेरी गाठली. महिला विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये २४ जून ते २३ जुलै या कालावधीत होणार आहे.
7⃣ अनुभवी फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने भेदक माऱ्याच्या बळावर २४ धावांत अर्धा संघ बाद करताच द. आफ्रिकेने एकमेव टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७८ धावांनी धुव्वा उडविला.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत, त्यांच्या विषयी कधीच दुःखी होऊ नये."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*विश्वास*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 अतुल मामडेकर
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"नारद "
सावध रहा ठिक ठिकाणी
कळलावे नारद आहेत
हलक्या कानाचे तर
कधीही गारद आहेत
कळलाव्या नारदा पासून
सदा सावध असल पाहिजे
कोण म्हणेल तस वागायला
हलक्या कानाचं नसल पाहिजे
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*आजचा*
🔱 ⚜ *॥ विचार धन ॥* ⚜ 🔱
*स्वास्थ्य टिकविण्यासाठी आणि चित्ताच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला निसर्गाकडून 'ध्यानस्थ' होणे शिकावे लागेल. एकतानता आणि अंत:करणाची तन्मयता यावर भर द्यायला निसर्ग शिकवितो. त्यामुळे आपले जगणे-वागणे आनंददायी होते. अगदी साधी गोष्ट, आपण आपल्या अंगणात किंवा टेरेसमध्ये छोटी बाग विकसित केली, तर तिचा बहर पाहून एक आंतरिक समाधान वाटते. या समाधानासाठीच माणूस आयुष्यभर झटतो व झगडतो. ते मिळाले नाही की, मग हाॅस्पिटलच्या वा-या ! त्या तशा वाढू नये म्हणून चांगल्या गोष्टी आत्मसात करणे गरजेचे आहे. त्यात निसर्ग सहवास महत्वाचा आहे.*
*आपल्याकडे जी ऋषीमुनींची परंपरा आहे ते सगळे अरण्यात राहत. त्यांची तपश्चर्या आणि निसर्गाधीन जगणे त्यांच्या आयुर्मानावरही परिणाम करते. त्यामुळे त्याचा शोध-बोध घेणे आपले कर्तव्य आहे. विकेण्डला निसर्गरम्य स्थळी राहणे, म्हणजे निसर्गाकडून शिकणे नव्हे, ते केवळ मनोरंजन असते. त्यातून साधना घडत नाही. त्यासाठी ज्ञान लागते. त्यामुळे निसर्गाशी जवळीक जरूर केलीच पाहिजे. तो स्वास्थ्यावरचा आणि स्वस्थ चित्तावरचा 'अनमोल' उपाय आहे.*
🔅☀ *॥ रामकृष्णहरी ॥* ☀🔅
🌻🌻🌻🌻🌻🌻
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध...........✍🏻
--------------------------
चुका करणारी माणसं कधीच वाईट नसतात.
त्यांच्या अज्ञानपणामुळे त्यांच्या हातून चुका होत जातात.अशा माणसांना योग्य दिशा दाखवणारा मार्गदर्शक भेटला तर त्यांच्याकडून होणा-या चुकावर मात करता येईल.त्यासाठी चुका करणा-यांनीसुद्धा आपल्या हातून नेहमी चुका होऊ नये या साठी प्रयत्न करावे व मनात अहंकार येऊ न देता योग्य दिशा दाखवणा-यांचा सल्ला घेऊन परत चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.त्यात सुधारणा करुन आपले भविष्य अधिक चांगले घडवायला हवे.
- व्यंकटेश काटकर,नांदेड
संवाद.9421839590.
🍃🌺🍃🌺🍃🌺🍃🌺
----------------------------------------------------
*वपुर्झा*
स्वत:शी प्रामाणिक असलेला माणूस स्वत:च एक खणखणीत नाणं असतो.
~ वपु काळे | इतर
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*गाढवाचा गैरसमज*
एकदा एका पाथरवटाने दगडांच्या चांगल्या सुंदर मूर्त्या बनवल्या व त्या बाजारात विकायला न्यायला सुरवात केली.नेण्यासाठी एक गाढव आणले ,दगडाचे ते देव पोत्यात भरले .व रस्त्याने चालू लागले लोकांना ते देव पाहून लोक हात जोडु लागले .हे सर्व गाढवाच्या लक्षात आले कि ,माणसे आपल्याला हात जोडत आहे .मग गाढव एका जागेवर उभे राहले .गाढव का बर चालत नाही याचे कारण काही पाथरवटाला समजले नव्हते ,पण जेव्हा त्याला माहिती झाले की गाढव लोकांचा मान स्वीकार करण्यासाठी उभे आहे .तेंव्हा त्यावर दोन काडी चे फटके दिले व म्हणाला ,आता चालतो नीट की परत देऊ मुर्खा हा जो नमस्कार आहे तुला नव्हे तर त्या देवांना आहे .
*तात्पर्य :- खोट्या अहंकाराचे फजितीची वेळ येते*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍संकलन ✍*
*साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment