फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक 22 फेब्रुवारी 2017

सकाळी सूर्यकिरणा सोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण वेळ : रोज सकाळी 06:50 ते 07:00 am
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 22/02/2017 वार - बुधवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१९५४- पहिली कापड गिरणी मुंबईत सुरु
⌛१८५७- रत्नागिरीत ’पतित पावन’ मंदिरांची स्थापना झाली.
💥 मृत्यू :-
⌛१९४४- कस्तुरबा गांधी यांचे निधन

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राज्यातील दहा महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदेसाठी काल मदतान पार पडले. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगर पालिकेत 52.17 टक्के ऐवढे विक्रमी मतदान झाले
2⃣  31 मार्चला जिओचा फ्री डेटा बंद, 1 एप्रिलपासून नवे दर होणार लागू.
3⃣  चलनातून बाद करण्यात आलेली एक हजार रुपयांची नोटही नव्या स्वरुपात लवकरच व्यवहारात येणार
4⃣  मुंबईतील लाखो मतदारांची नावं यादीतून गायब, शिक्षणमंत्री विनोद तावडे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार.
5⃣ आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील शेवटच्या पात्रता सामन्यात भारतीय महिला संघानी द. आफ्रिकेच्या संघाचा केला पराभव
6⃣  अत्यंत प्रतिष्ठेची असलेली ‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेची चुरस २५ फेब्रुवारीला अंधेरी येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स येथे रंगणार
7⃣ भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंड संघाचं करणार नेतृत्व

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

"ज्याप्रमाणे कोणत्याही राष्ट्राला दुसऱ्या राष्ट्रावर राज्य करण्याचा अधिकार नाही, त्याचप्रमाणे, कोणत्याही एका विशिष्ट वर्गाला दुसऱ्या वर्गावर अधिसत्ता गाजविण्याचा अधिकार नाही..."
*डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *विशिष्ट*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
-----------------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
 
     "धक्का "

मतदानाचा आता
वाढलेला टक्का आहे
उद्या कळेल कोणाला साथ
कोणाला धक्का आहे

दोघां पैकी एकाला
नक्की धक्का बसेल
एक पडेल तर मग
दुसरा नक्की हसेल

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
  ----------------------------------------------------
*आजचा*
🔻🔻‼ *विचार धन* ‼🔻🔻

*सज्जनत्वाच्या अनेकविध कसोट्यांपैकी एक म्हणजे व्यक्तीचे बोलणे होय. माणसाच्या जिभेवर खडीसाखर असली तर त्याची न होणारी, लांबणारी कामेसुद्धा झटक्यात होतात याचा अनुभव अनेकदा येतो. वाणीतील मवाळपणा माणसाला कुठच्या कुठे घेऊन जाणारा ठरला असल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत. व्यक्तीजवळ इतर कोणतेही धन नसेल तरी एकवेळ चालेल; पण त्याच्या जीवनव्यवहारात गोडवा हवा. त्याच्याशी बोलावे, नाते निर्माण करावे असा मोह जेव्हा इतरांना होतो तेंव्हा तो त्याचा जीवन-विजय असतो.*

*लोक अनेकदा स्पष्टवक्तेपणाच्या नावाखाली दुस-याला दुखावतात, त्यांचा अपमान करतात; पण असे करणे चांगले नव्हे. मार्दवाने बोलल्यास कमीपणा येतो, आपली बाजू सत्याची असली तरी लोक साशंकतेने पाहतात, त्यात ठाशीवपणा नसतो, असा काही लोकांचा गैरसमज असतो. मोठ्याने, ओरडून बोलले तरच समोरचा नमतो, त्याच्यावर प्रभाव पडतो असे मानणे वेडेपणा आहे. ज्याला चांगुलपणाची आस असते, त्याच्या मवाळतेच्या चर्चा सर्वदूर पसरलेल्या असतात. बोलण्यातील मऊपणा म्हणजे दुय्यमत्व नव्हे. ते तुमच्या प्रभावी व्यक्तीमत्वाचे एक लक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणवर्णनातील वैशिष्ट्ये वाचली की, त्यांनी जे विराट काम केले, त्यांनी डोंगराएवढी माणसे प्राणपणाने जपली त्यात त्यांच्या स्नेहार्द्र वाचेचा वाटा सर्वोच्च होता.*

         🌹 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌹
            🍁🍁🍁🍁🍁🍁
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 विचारवेध..........✍🏻
〰〰〰〰〰〰〰〰
स्वप्न तर सारेच पाहतात.
स्वप्न पाहणेही काही गैर नाही.परंतू स्वप्न सत्यात उतरावयाचे झाल्यास त्यासाठी परिश्रमही करणे तितकेच महत्वाचे आहे.
स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी शक्य झाल्यास त्याचे नियोजन करावे.अशक्य वाटत असेल तर स्वप्न म्हणूनच त्याला मागे टाकावे.
त्याबद्दल त्याचा जास्त विचारही करु नये.कारण
जास्त विचार केला तर आपल्या मनावर काही परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी.
जे आहे त्यात बदल होत असेल तर बदल करून जीवनात आनंद आणि समाधान मानावे.
विनाकारण स्वप्नांच्या जास्त मागे धावू नये.नाही तर आहे ते ही सुख गमावून बसल्याचा पश्चाताप होईल.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.

🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸🌷🌸
----------------------------------------------------
*वपुर्झा*

अत्यंत महागडी, न परवडणारी खर्‍या अर्थाने ज्याची हानी भरुन येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे ह्याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे "आयुष्य".
~ वपु काळे | प्लेझर बाँक्स

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
      
चोर ते चोर अन वर शिरजोर
एका गावात एक पिठाची गिरणी होती. गिरणीचा मालक थोडासा लुच्‍चा इसम होता. तो गि-हाईकाच्‍या दळणातील थोडेसे धान्‍य अथवा पीठ काढून घेत असे. त्‍याची ही चोरी अनेकांच्‍या लक्षात येत असे पण गावात दुसरी गिरणी नसल्‍याने लोक गप्‍प बसत असत. एकेदिवशी धान्‍याच्‍या टोपलीत गिरणीमालकाला एक उंदीर सापडला. त्‍या उंदराला पकडून तो माणूस त्‍याच्‍या मांजराकडे देणार इतक्‍यात तो उंदीर विनवणीच्‍या सुरात त्‍या दळणक-याला म्‍हणाला, अहो मालक, मी चोर नाही. तुमच्‍याकडे येणा-या धान्‍यातील चारदोन दाणे खाऊन मी माझी भूक भागवितो आहे. तेव्‍हा मला कृपया तुम्‍ही सोडून द्यावे अशी माझी तुम्‍हाला विनंती आहे. त्‍याचे हे बोलणे ऐकून तो इसम त्‍याला म्‍हणाला,''अरे उंदरा धान्‍याचे चारदोन दाणे का होईना पण ते तू चोरून खातोसच ना. मग ही चोरीच आहे त्‍याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे.उंदीर म्‍हणाला, प्रत्‍येक दळणातले चारदोन दाणे खाणारा मी जरी चोर असलो तरी मी खूपच छोटी चोरी करतो तुम्‍ही तर प्रत्‍येक दळण दळण्‍याचे पैसेही घेता आणि वरून त्‍या दळणातील थोडे धान्‍य आणि थोडे पीठ अशी तिहेरी चोरी करता मग तुम्‍ही तर खूप मोठे चोर आहात. अशा या चोरीबद्दल तुम्‍ही स्‍वत:ला काय शिक्षा करून घेणार आहात. उंदराच्‍या या बोलण्‍याने माणूस खूपच संतापला व म्‍हणाला, चोरी करून ते करून वरून परत मलाच चोर ठरवतोस. काहीही झाले तरी माणूस आहे आणि माणूस हा पृथ्‍वीवरचा सर्वश्रेष्‍ठ प्राणी आहे. तो काय करतो, कुठे चुकतो, कुठे बरोबर असतो हे ठरवण्‍याचा अधिकार प्रत्‍यक्ष परमेश्‍वरालाही नाही. तू लहान का होईना चोरी केलीस आणि आता तू शिक्षेला पात्र आहेस असे म्‍हणून त्‍याने त्‍या उंदराला मांजराच्‍या स्‍वाधीन केले.
*तात्‍पर्य*- जगात लहान चोरांना शिक्षा मिळते आणि मोठ्या चोरांना प्रतिष्‍ठा मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍�संकलन ✍ साई पाटील*
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
──┅━━═▣🔻▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments

  1. आदरणीय श्री ,नासा सर व कुणालभाऊ ,
    फ्रेश माॕर्निंग बुलेटिन अप्रतिम !
    आपले अभिनंदन व पुढिल कार्यास हार्दिक शुभेच्छा !

    ReplyDelete

Post a Comment