सकाळच्या सूर्यकिरणा सोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 23/02/2017 वार - गुरुवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१८८७- रिव्हेरा येथे या दिवशी भुकंप
💥 जन्म :-
⌛१५६४- जगप्रसिध्द नाटककार शेक्सपिअरचा जन्म
💥मृत्यू :-
⌛१८७६- आधुनिक काळातील एक महान संत गाडगे महाराज स्मृतिदिन
⌛ १९५८- मौलाना अबुल कलाम आझाद यांचे निधन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाने सौरमंडळाच्या बाहेरील ब्रह्मांडाशी संबंधित रहस्यांचा उलगडा करण्याचे दिले संकेत
2⃣ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदार याद्यांमधील गोंधळाची निवडणूक आयोगाने घेतली दखल. सोमवारी होणार राज्यातील सर्व उप जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची मुंबईत बैठक
3⃣ सांगली येथील राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा *'जनसेवा पुरस्कार'* यंदा महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांना जाहीर
4⃣ सौरऊर्जेची क्षमता २० हजार मेगावॅटवरून ४० हजार मेगावॅट करण्याच्या प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी
5⃣ *शुर्होझिले लिझिएत्सु* यांनी नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ.
6⃣ सोफियात सुरू असलेल्या ६८ व्या आमंत्रित बॉक्सिंग स्पर्धेत भारतीयांना सुरुवातीला मिळाले संमिश्र यश, एक बॉक्सर विजयी तर दोन जण झाले पराभूत
7⃣ 2020 मध्ये टोकियो येथे होणा-या ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंच्या तयारीसाठी आणि इतर सुविधांच्या तयारीसाठी 3 कोटी रूपये मंजूर, मुख्यमंत्री फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडेंनी दिली मंजूरी.
*विशेष बातमी - राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती च्या निवडणुकाचे आज लागणार निकाल, मुंबई महापालिकेच्या निकालाकडे लागले सर्वांचे लक्ष*
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" जी उंची मोठी माणसे गाठतात.... ती काही एका झेपेत मिळालेली नसते.... जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात... तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गाठलेली असते."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*स्वराज्य*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 निलेश सितावार, धर्माबाद
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"चित्र "
आज सारं चित्र
अगदी स्पष्ट असेल
कोणी काय केलंय
सारं काही दिसेल
ठिक ठिकाणच्या चर्चेला
मिळेल पुर्णविराम
उमेदवारापेक्षा यांनाच
वाटेल मग आराम
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔🔔 जाहिरात 🔔🔔*
जर आपण किंवा आपले मित्र/नातेवाईकांमध्ये कोणी BE/ME/MCA/BCA/Bcs/Mcs केलेलं असेल आणि जॉब च्या शोधात असेल तर त्यांना आता लगेच प्ले स्टोर वर जाऊन CampusKing नावाचे अँप्लिकेशन इन्स्टॉल करायला सांगून त्यात आपली माहिती भरायला सांगा. या आप्लिकेशन मध्ये रोज नवीन नवीन जॉब अपडेट केले जातात ते रोज बघून एकदम फ्री मध्ये इंटरव्हयू देऊ शकता आणि जॉब मिळवू शकता.
आता मराठी इंजिनीअर बेकार रहाणार नाहीत.
https://play.google.com/store/apps/details?id=com.campusking
आत्ताच डाउनलोड करा
----------------------------------------------------
*आजचा*
••●●★‼ *विचार धन* ‼★●●••
*महाभारतातला सर्वोत्कृष्ट निर्णय म्हणजे अर्जुनाने श्रीकृष्णाला आपल्या पक्षात घेणे. श्रीकृष्णाला भेटायला अर्जुन आणि दुर्योधन गेले असता, झोपलेल्या भगवंताला पाहून,'मी एवढा मोठा सम्राट , याच्या पायाशी का बसू ? असा अहंकार निर्माण झालेला दुर्योधन उशाशी बसला, आणि उशीरा आलेला अर्जुन पायाशी. श्रीकृष्णासारखा बलाढ्य राजा, धूर्त राजकारणी, विद्वान मित्र आणि अपराजित योद्धा आपल्या बाजूने असावा, असे कोणाला वाटणार नाही?*
*जागे होताच समोर बसलेल्या अर्जुनाला त्यांनी प्रथम मागणी विचारली. उशाशी बसलेला दुर्योधन 'मी प्रथम आलोय, आधी माझे ऐका' असे म्हणताच,'पण मी अर्जुनाला आधी पाहिलयं म्हणून त्यानेच पहिल्यांदा मागावे.मी आणि माझे सैन्य यातील एक गोष्ट आपणांस मिळेल, शिवाय मी प्रत्यक्ष युद्ध करणार नाही, मी फक्त सारथ्य करीन. तरीसुद्धा अर्जुनाने भगवंताला मागितले व दुर्योधनाने दहा हजार अक्षौहिनी सैन्य मिळाल्याचा आनंद ऊपभोगला खरा. पण त्यामुळे 'शक्ती' दुर्योधनाकडे आणि 'युक्ती' अर्जुनाकडे गेली. 'शक्ती'पेक्षा 'युक्ती' श्रेष्ठ ठरली. अर्जुनाचा 'भक्ती'पूर्ण निर्णय विजयी ठरला. शांत, धीरगंभीरपणे घेतलेले निर्णय इतिहास निर्माण करू शकतात.*
⛳ *॥ रामकृष्णहरी ॥* ⛳
⚜⚜⚜⚜⚜⚜
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 *विचारवेध..........✍🏻*
〰〰〰〰〰〰〰〰
मुळात निसर्गतः आपल्याला शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸
----------------------------------------------------
*वपुर्झा*
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
" एका जंगलात एक हरीण रहात होते. त्या हरणाला सोनेरी शिंगे होती त्यमुळे त्या हरणाला शिंगाचा खूप गर्व होता. पण तो कधीही आनंदी नसे. कारण त्याला वाटे की, आपले पाय खूप काटकुळे व विद्रूप आहेत. जेव्हा तो शिंगाकडे पाही तेव्हा तो खूप खूष असे. पण जेव्हा त्याचे आपल्या पायाकडे लक्ष जाई तेव्हा त्याला त्याचा खूप राग येत असे.
एक दिवस हरिण जंगलातील एका झऱ्यावर पाणी पीत होते. पाणी पिता पिता त्याला पाण्यात त्याची सोनेरी शिंगे दिसली. सुंदर सोनेरी शिंगे पाहून त्याला खूप आनंद झाला. तेवढ्यात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला आणि मागे वळून पाहतो तर समोरच त्याला एक शिकारी दिसला. शिकारी त्याच्यावर निशाणा साधत होता. शिकाऱ्याला पाहून हरिण घाबरले आणि जोरजोरात पाळायला लागले.
शिकारी त्याचा पाठलाग करू लागला. हरणाचे पाय त्याला उत्तम साथ देत होते. त्या पायांमुळे तो इतका जोरात पळत होता. परंतु पळता पळता हरणाची शिंगे एका झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. हरिण खूप प्रयत्न करतो पण शिंगे काही निघत नव्हती. शेवटी शिकारी आला आणि हरणाला पकडून घेऊन गेला.
हरणाला रडायला येते आणि ती स्वत: शीच पुटपुटतो,अरे माझी सुंदर शिंगेच माझ्यासाठी आज संकट बनली. त्यांच्यामुळे शिकाऱ्याने आज मला पकडले
*तात्पर्य- फक्त सौंदर्यच सर्व काही नसते.कुठल्याही गोष्टीचे गुण-दोष पण पारखले पाहिजेत."*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
─┅━━═▣▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment