सकाळच्या सूर्यकिरणा सोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 24/02/2017 वार - शुक्रवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*🔔महाशिवरात्रीच्या हार्दीक शुभेच्छा🔔*
⌛मध्यवर्ती उत्पादन शुल्क दिन
💥 जन्म :-
⌛१४८३- बाबर यांचा जन्म
💥 मृत्यू :-
⌛१९३६- क्षयरोग निवारण दिन
⌛१९९८- मराठी चित्रपट अभिनेत्री ललिता पवार यांचे निधन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
*निवडणूक स्पेशल बातमीपत्र*
1⃣ मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या यशाबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले शिवसेनेचं अभिनंदन
2⃣ पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्र भाजपचं कौतुक, विश्वास दाखवल्याबद्दल जनतेचे मानले आभार
3⃣ मुंबईचा महापौर शिवसेनेचाच होणार उद्धव ठाकरे
4⃣ औरंगाबाद जिल्हा परिषद निकालात भाजप झाला मोठा पक्ष, 62 पैकी 23 जागांवर भाजपाने मारली बाजी, शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. काॅग्रेसला 14 जागाच मिळाल्या. युतीसाठी सेनेने पुढे यावे, भाजपाचे जिल्हा प्रमुख एकनाथ जाधव
5⃣ बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात भाजपाचा दारुण पराभव, त्याची जबाबदारी स्वीकारुन राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दर्शविली राजीनामा देण्याची तयारी, मात्र पंकजा मुंडेंचा राजीनामा मिळाला तरी तो स्वीकारणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट
6⃣ मुंबईच्या प्रभाग क्रमांक 220 मध्ये फेरमोजणीतही ‘सेम-सेम’ मतदान झालेल्या शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांचे भवितव्य ईश्वरचिठ्ठीद्वारे ठरवण्यात आले. या ईश्वरचिठ्ठीच्या प्रक्रियेत भाजपाला लॉटरी लागली असून भाजपाचे उमेदवार व माजी आमदार अतुल शहा यांचा झाला विजय
7⃣ पुण्यात भारत-ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा ऑस्ट्रेलिया 9 गडी बाद 256 धावा
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" दोन अपूर्ण माणसांना एकमेकांना पुर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती."
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*प्रीती*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 नरेश जे. वाघ, सहशिक्षक, वर्धा
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" हार जीत "*
राजकारण म्हटले
की हार जीत आहे
एक येणार दुसरे
पडणार ही रीत आहे
आता हेवे दावे विसरून
टिकवू आपले नाते
माणूसकीलाच शेवटी
कधीही किंमत रहाते
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675 ----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
🔺 *रचना मासिक* वर्ष पहिले
🔺 दोन अंक प्रकाशित झाले.
🔹रचनावादी व्हा, रचनावादी रहा, रचनावादी वागा...
🙏🏻 ज्ञान घ्या, ज्ञान द्या, ज्ञान पेरा...
💐 आपणही वर्गणीदार व्हा...
🌹
वार्षिक वर्गणी ₹ 250
किरकोळ अंक ₹ 25
पैसे जमा करण्या (RTGS) साठी खाते
संवेदना प्रकाशन, खापरखेडा
खाते क्र. 877220110000174
BANK OF INDIA
Khaparkheda Branch
IFSC BKID0008772
✍🏻 संपादक मंडळ रचना मासिक
8806560740
-----------------------------------------------------
*आजचा*
🌾 🌱 *॥ विचार धन ॥* 🌱 🌾
*जिथे काही उगवत नाही, झाडा झुडुपांशिवाय काही असत नाही, तिथे एरंडाचे झाडच वृक्ष मानले जाते. वास्तविक एरंड कधी पिंपळ, वड, औदुंबर अशा वृक्षांची बरोबरी करेल का ? तुकोबांनी म्हटले आहे, 'उंच वाढला एरंड, तरी का होई इक्षुदंड.' कितीही उंच वाढला तरी एरंड कधी उसाची बरोबरी करू शकणार नाही. एरंड हे एक अतिसामान्य झाड, त्याची पाने गाढवही खात नाही म्हणे.*
*परंतु अशा झाडालाही कधी कधी आपल्या एखाद दुस-या चकचकीत हिरव्या पानांचा गर्व होतो. क्षुद्र व्यक्तीलाही असा गर्व होतो, की आपण जणू महान आहोत.* *एरंडालाही आपण महावृक्ष असल्याचे वाटते. महावृक्ष केव्हाही थोरच. घनदाट शितल छाया, डेरेदार विस्तार, पशुपक्षी यांचे विसाव्याचे ठिकाण. ऋतुमानाप्रमाणे निरंतर येणारा बहर ही त्यांची श्रीमंती आणि वैभव. वृक्ष कुलातील हे ऋषीमुनी कुठे नि एरंड कुठे?*
*"जिथे काही उगवत नाही तिथे 'एरंड'लाच वृक्ष मानावे लागते हे दुर्दैव."*
🌴🌱 *॥ रामकृष्णहरी ॥*🌱🌴
🍂🍂🍂🍂🍂🍂
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 *विचारवेध..........✍🏻*
〰〰〰〰〰〰〰〰
मुळात निसर्गतः आपल्याला शारीरिक सौंदर्य जे काही लाभलेले आहे त्यात आपल्याला काही बदल करता येत नाही.कुणाला कसे तर कुणाला कसे शारीरिक सौदर्य दिले आहे.पण ज्यांना काही अप्रतिम,लावण्यरुपी सौंदर्य लाभले आहे त्याने त्याचा गर्वही करु नये आणि इतरांना लाभलेल्या सौंदर्याशी तुलनाही करु नये.त्याने इतरांना लाभलेल्या सौंदर्याची अवहेलनाही करु नये.ज्यांना जे काही कमी जास्त प्रमाणात सौंदर्य मिळाले आहे त्याच्याबद्दलही आपण नाराज होऊ नये.जे आहे ते आपण आनंदाने स्वीकारुन आपल्या जीवनात सुखी आणि समाधानी राहावे.इतरांची आपल्यासोबत तुलना करुन स्वतः आपले आपण अपमानीत न होता आपल्या सौंदर्यांचा आदर करावा. आपल्याला जे काही दिले त्यात विधात्याचे आभारच मानायला हवे हे कधीही विसरु नये.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.
🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸🍃🌸
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
एकदा एक कबुतराचा मोठा थवा आकाशात अन्नाच्या शोधासाठी उडत होता. ते एका घनदाट जंगलात गेले. एक कबुतर आपल्या बाकीच्या सहकाऱ्यांना बोलले ‘मित्रांनो, आपण खूप लांबच्या अंतरावरून येत आहोत. आपल्यातील सर्वच खूप थकलेले आहेत. तर, आपण थोडा वेळ येथे आराम करू या.’
पण मध्यम वयीन कबुतर बोलला ‘तू जे बोलत आहेस ते खरे आहे, पण आपण सर्व भूकेलो आहोत.’ आणि जर आपण उशीर केला तर आपल्याला अन्न मिळणार नाही. बाकीच्या कबुतरांचे पण तेच म्हणणे होते. सर्व कबुतर बरोबर उडायला लागले. त्यांनी बघितले की जमिनीवर धान्य पसरलेले होते.
ज्या कबुतराला आराम हवा होता तो बोलला ‘बघा! आपले धान्य! चला आपण ते वेचूया.’ सर्व कबुतर धान्य वेचण्यासाठी खाली उतरले. तिथे भरपूर प्रमाणात धान्य होते. सर्वात जास्त वयस्कर कबुतर बोलतो की ‘या, या लवकरात लवकर धान्य उचला व खा.’
जेव्हा सर्व कबुतर धान्य खात होते तेव्हा अचानक एक जाळी त्यांच्या अंगावर येऊन पडली. सर्व त्यामध्ये अडकले.
‘आता आपण काय करायचे?’ सर्व रडायला लागले. एक शिकारी झाडावर बसलेला होता त्याच्याकडे धनुष्य व बाण होते. त्यामुळे एक कबुतर बोलला ‘मित्रांनो, माझी एक युक्ती आहे आपण सर्व जण मिळून ताकद लावून एकाच वेळेस जाळीसह वरती उडू या व आपण सहजपणे यातून सुटू शकतो.’
सर्व कबुतरांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावून जाळीसह वरती उडायला लागले व ते खूप उंचावर उडले आणि त्यांची अवघड परिस्थितीतून सुटका झाली.
हे बघून तो शिकारी आश्चर्य चकित होऊन व स्तब्ध झाला.
एक कबुतर बोलला ‘आपण शिकाऱ्यापासून सुटलो आहोत, आता आपण आपल्या उंदिर मित्राकडे जाऊ तो आपल्याला मदत करेल.’
ते कबुतर पुन्हा आपली शक्ती एकत्र करून उडायला लागतात व डोंगराच्या पायथ्याजवळ जातात. तेथील बिळात राहणाऱ्या उंदराला ते मदतीसाठी बाहेर बोलवतात. उंदिर त्यांना मदत करायला तयार होतो, व काही मिनिटांतच तो आपल्या तीक्ष्ण दातांनी ती जाळी कुरतडून टाकतो व कबुतरांची जाळीतून मुक्तता करतो.
शेवटी कबुतर उंदराचे आभार मानून आपल्या घरी जातात.
*तात्पर्य - एकतेतच बळ असते. एकतेमुळे अवघडातल्या अवघड परिस्थितीमधून आपली सुटका होऊ शकते. "*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◑◎✹★✹🔅✹★✹◎◑●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
─┅━━═▣🔻▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment