सकाळच्या सूर्यकिरणा सोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 25/02/2017 वार - शनिवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९८८- संपुर्ण भारतीय बनावटीच्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोट्टा या केंद्रावर यशस्वी चाचणी
⌛१५६८- सम्राट अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.
💥 मृत्यू :-
⌛भगवंत भक्त संत एकनाथानी पैठण येथे आजच्या दिवशी समाधी
⌛१८८६- गुजराथी कवी नर्मदाशंकर दवे यांचे निधन
⌛हुतात्मा किसन आहिर व नानकसिंग पुण्यतिथी
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ कोईम्बतूरमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते 112 फूट उंच भगवान शंकराच्या मुर्तीचं अनावरण
2⃣ दक्षिण कोकणातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर यात्रोत्सवास प्रारंभ.
3⃣ मणीपूरला बसला भूकंपाचा धक्का, 5.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप.
4⃣ गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या शासकीय वाहनाला अपघात, १ ठार, १ जखमी.
5⃣ राज्यातील २५ जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस पक्ष अनुकूल असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
6⃣ आयएसएसएफ वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय नेमबाज पूजा घाटकरने 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत जिंकलं कांस्यपदक
7⃣ पुणे कसोटीत दुस-या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा ऑस्ट्रेलिया 4 बाद 143, भारतावर आतापर्यंत 298 धावांची आघाडी.
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" नियमापेक्षा तत्त्वे ही अतिशय पवित्र असतात."
_ फ्रँकलिन रिलानो रूझवेल्ट
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*तत्वे*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 साई डिब्बेवाड, सहशिक्षक,
👤 योगेश राजेश पापनवार
👤 बालाजी आगोड
👤 प्रदीप वल्लेमवाड
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"पराभवाचं खापर "
पराभवाचं खापर
दुस-यावर फोडतात
अपयशाचं कारण
काहीतरी जोडतात
खापर फोडून दुस-यावर
बाजूला सरता येत नाही
अपयशामुळे दुस-याला
बदनाम करता येत नाही
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
उद्या रविवारी सर्व समाज वधू-वर *ऑनलाइन परिचय* मेळावा
त्यासाठी
सर्वमान्य वधू-वर मंडळ संचालक
नागेश काळे, चाकूर - 7249155587
यांच्याशी त्वरीत संपर्क करा.
----------------------------------------------------
*आजचा*
☀~☀ *॥ विचार धन ॥* ☀~☀
*'पावसाळा आला की कोकिळ मौन होते', कारण पावसाळा हा बेडकांचा असतो.' बेडकांच्या आरडाओरडीपुढे बिचा-या कोकिळेचे मधुर गायन कोण ऐकणार ? एक कवी म्हणतो, 'बाई कोकिळे, येथे समस्त बहिरे बसलेले आहेत. उगीच तू तुझे मधुर बोलणे का सुरू करतेस ? ज्यांना ऐकायला येत नाही, ते तुला तुझ्या काळ्या रंगावरून कावळाच समजतील. तेव्हा गप्प राहणे यातच शहाणपण आहे.*
*शहाण्याने अनुकूल, प्रतिकूल समय ओळखूनच वागावे. आपली उपेक्षा होत आहे, आपणांस कोणी ओळखत नाही असे समजून कुढत बसू नये. वसंत ऋतु आला म्हणजे कोकिळा कोण नि कावळा कोण हे जसे आपोआप कळते, तसेच जाणकार भेटला म्हणजे परिक्षा होते. गिधाड-गरूड, गाढव-घोडा, बगळा-राजहंस, यातील फरक वरवर कळत नसला तरी योग्य समयी खरे-खोटे, सोंग-ढोंग उघडे पडते.*
*"हंसाने आपली चाल सोडली नाही, कावळ्याची बढाई उघडी पडली. नुसती बढाई मारून लढाई जिंकता येत नसते. चढाई करतानाच स्वत:ची शक्ती, गुणवत्ता अजमावून पाहायची असते."*
🍂🍂 *॥ रामकृष्णहरी ॥* 🍂🍂
🌷🌷🌷🌷🌷🌷
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आजचा विचार *
"जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असत.... कारण मागितलेल स्वार्थ, अन दिलेलं प्रेम असतं"
नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.……
नातं ठेवा अगर ठेवू नका, विश्वास मात्र जरुर ठेवा.
कारण जिथं विश्वास असतो तिथं नातं आपोआप बनत
----------------------------------------------------
*वपुर्झा*
परमेश्वराने माणसाला दोन गोष्टी बहाल केल्या. दोन हात आणि एक मन. माणसाने बेदम कष्ट करावेत आणि उदंड प्रेम करावं. उदंड प्रेम करणारी माणसं कशाचीच गँरंटी मागत नाहीत. माणसाने हे प्रेम करायची शक्ती घालविली म्हणुन आता नियतीसुध्दा कसलीच गँरंटी देत नाही. संतांच उदंड प्रेम परमेश्वरावर असतं. म्हणुन संत कसलीच हमी मागत नाहीत. ते निर्भय असतात.
~ वपु काळे | रंग मनाचे
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*आजची बोधकथा*
एकदा एका माणसाला त्याच्या घोड्यासमवेत एक नदी पार करायची असते. परंतु त्याला नदीची खोली माहीत नसल्याने तो तिथेच काठावर विचार करत बसतो. मदतीसाठी आजुबाजुला पाहत असताना त्याला तेथे एक लहान मुलगा दिसतो. तेव्हा त्या माणसाने लहान मुलाला नदीच्या खोलीबद्दल विचारले.
मुलाने घोड्याकडे एकदा पाहीले आणि क्षणभर थांबुन तो विश्वासाने म्हणाला, " निश्चींतपणे जा, तुमचा घोडा नदी सहज पार करु शकेल".
मुलाचा सल्ला मानुन त्या माणसाने नदी पार करण्यास सुरुवात केली. परंतु नदीच्या मध्यावर पोहोचल्यावर त्याच्या लक्षात आले की नदी खुप खोल आहे. आणि तो जवळ जवळ बुडायलाच आला.
कसाबसा तो त्यातून सावरला आणि बाहेर येउन त्या मुलावर जोरात खेकसला. मुलगा पुरता घाबरला होता आणि घाबरत घाबरतच बोलला, "पण माझी बदके तर खुप लहान आहेत आणि ते दररोज नदी पार करतात. त्यांचे पाय तर तुमच्या घोड्यापेक्षा खुप लहान आहेत."
*उगाच कोणाचाही सल्ला ऐकण्याआधी त्यांना खरोखरच काही माहीती आहे का ते जाणुन घ्या....*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
─┅━━═▣🔻▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment