सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 26/02/2017 वार - रविवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९२७- ख्रिस्ती धर्मातील गोवेकरांनी हिंदूधर्मात प्रवेश करणाच्या मोहिमेचा प्रारंभ केला
⌛१९७६- मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांनी मिळाला
💥 मृत्यू :-
⌛१९६६- थोर स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांचे निधन
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून शुक्रवारी रत्नागिरीमध्ये सर्वात जास्त ३९.९ अंश सेल्सिअस तापमानाची झाली नोंद
2⃣ अमरनाथ यात्रेसाठी 1 मार्चपासून होणार नोंदणीला सुरुवात.
3⃣ भाजपा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसशी हातमिळवणी करणार नाही, ज्याला त्यांच्यासोबत जायचं आहे ते जाऊ शकतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
4⃣ मुंबई वॉर्ड क्रमांक 220 मधील शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर ईश्वरचिठ्ठीच्या निर्णया विरोधात कोर्टात जाणार, अतुल शहा आणि सुरेंद्र बागलकर यांच्या मतांमध्ये टाय झाल्याने ईश्वरचिठ्ठीने विजेता ठरवण्यात आला.
5⃣ खा, प्या व मजा करा असा संदेश देणाऱ्या किंग मोमोची चार दिवसांची राजवट काल पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीने गोव्यात सुरू झाली.
6⃣ ऑस्ट्रेलिया संघाकडून भारताचं वस्त्रहरण, फक्त 107 धावांवर केलं ऑल आऊट, ऑस्ट्रेलियाचा 333 धावांनी विजय.
7⃣ डिव्हिलिअर्स एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत 9000 धावा पुर्ण करणार फलंदाज ठरला आहे. हा नवा विक्रम आपल्या नावे करताना डिव्हिलिअर्सने सौरभ गांगुली, सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एस धोनी यांना मागे टाकलं आहे.
*विशेष बातमी* :- इयत्ता पाचवी आणि आठवी वर्गासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षा परिषदेकडून शिष्यवृत्ती परिक्षेचे आयोजन
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
कुणी तुमच्यासाठी रूपये खर्च करतील तर कुणी वेळ खर्च करतील. वेळ खर्च करणाऱ्या व्यक्तीला नेहमी जास्त महत्त्व आणि सन्मान द्यावा. कारण, तो तुमच्यासाठी जीवनाचे ते क्षण खर्च करतोय जे त्याला कधीच परत मिळणार नाहीत.
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*खर्च*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 शैलेश फडसे, माचनुर
👤 घनश्याम बोरहाडे, साहित्यिक
👤 प्रदीप तळणीकर,पत्रकार, दै.सकाळ
👤 विलासराज भद्रे, साहित्यिक, नांदेड
👤 निलेश जोंधळे
👤 योगेश दरबस्तवार
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"दोस्ताना "
राजकारणात कोणी
शत्रू किंवा मित्र नसतो
जो जास्त वाकतो तो
मैत्रीला पात्र असतो
राजकारणात वाकणारांचा
जरा जास्त असतो टक्का
जेवढे जास्त वाकेल
तेवढा दोस्ताना पक्का
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
👮 *पोलीस महाभरती* 👮
📍 *महाराष्ट्र पोलीस भरती 2017 24 फेब्रुवारी 2017 पासून सूरु झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मार्च 2017 आहे.* 📍
📌 *पात्रता :* 12 वी पास
📌 *वय :* 18 ते 43 वर्ष
📌 *वेतन :* 5200-20200
📌 *परीक्षा फी :* खुला-350, मागास वर्गीय-250
👇🏼 *जाहिरात डाउनलोड करा* 👇🏼
*http://jobdalan.blogspot.in/2017/02/maharashtra-police-bharti-2017.html?m=1*
📌➖📌➖📌➖📌➖📌
----------------------------------------------------
*आजचा*
♻ *~~~॥ विचार धन ॥~~~* ♻
*विज्ञानाचा शोध लागला, अंधारवाटा उजळल्या. बंदुकीचा शोध लागला, संरक्षणाचे साधन उपलब्ध झाले. रेडिओच्या शोधाने दूरपर्यंत संपर्क होऊ लागला. टेलिफोनच्या शोधाने हजारो मैलांपर्यत संवाद सुरू झाले. 'ज्ञान' हा मनुष्याचा डोळा आहे. ती त्याची दृष्टी आहे. तिने त्याला वाटेतील खाचखळगे दिसतात, काटेकुटे दिसतात. ते टाळून पुढे कसे जायचे हे त्याला समजते.*
*पुढे शोध लागले, विज्ञानाने विलक्षण प्रगती केली. मग माणूस पुढील वाटचाल विज्ञानाच्या वेगवान वारूवर स्वार होऊन करू लागला. हा विज्ञानाचा वारू चौखुर उधळतोय, हे खरे आहे. पण या वारूला आत्मज्ञानाचा लगाम नसेल तर तो तसा उधळणारच. म्हणून....*
*'विज्ञानाच्या घोड्याला आत्मज्ञानाचा लगाम घातला पाहिजे, तरच मनुष्य जीवनाची वाटचाल सुखकर होईल."*
♻ *॥ रामकृष्णहरी ॥* ♻
🍁🍁🍁🍁🍁🍁
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
"एका गावात एक धनगर होता. त्याला दीपक नावाचा मुलगा होता. दीपक रोज आपल्या मेंढया घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे. त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत.
एकदा तो असाच मेंढ्यांना घेऊन चरायला गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले. पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, 'लांडगा आला रे आला.'
लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, 'कुठे आला लांडगा'.
तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला, 'कशी गंमत केली.'
शेतकरी संतापले. पण काय करणार, तसेच निघून गेले.
दीपकला मात्र यात गंमत वाटली. दुसर्या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकर्यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा दीपक कसे फसवले म्हणून हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले.
तिसर्या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला. दीपक जोरजोरात ओरडू लागला 'लांडगा आला रे आला.' पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय, असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. लांडग्याने एक एक करत सर्व मेंढ्या खाल्ल्या. दीपक आपला झाडावर बसून रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली. पण आता फार उशीर झाला होता.
*तात्पर्य : थट्टा उडविणे केव्हाही वाईटच."*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
─┅━━═▣@▣═━━┅─
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment