फ्रेश मॉर्निंग बुलेटिन दिनांक27 फेब्रुवारी 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 27/02/2017 वार - सोमवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

*मराठी राजभाषा दिवस*

💥 जन्म :- 
⌛१९१२ : मराठीतील ज्येष्ठ कवी व नाटककार वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्म, हा दिवस “मराठी भाषा दिवस” म्हणून साजरा केला जातो.
💥 मृत्यू :- 
⌛चंद्रशेखर आझाद यांनी अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडता झाडता स्वत:वरच गोळी झाडाली व मृत्यूला कवटाळले.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣  ‘इस्त्रो’च्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटतो, 'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींचं वक्तव्य.
2⃣ परराष्ट्र सचिव एस. जयशंकर २८ फेब्रुवारीपासून अमेरिकच्या दौऱ्यावर
3⃣ राष्ट्रवादी काँग्रेससोबत सर्व ठिकाणी आघाडी करणार, शरद पवारांची नांदेडमध्ये माहिती
4⃣ पेपर फुटल्यानं सैन्य भरतीची परीक्षा रद्द सैन्य भरती परीक्षा 1 महिन्यानंतर होणार संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची माहिती
5⃣ मुंबईतील 6 मार्चचा मराठा मोर्चा परीक्षांमुळे पुढे ढकलला औरंगाबादमधल्या समन्वय समितीच्या बैठकीत निर्णय
6⃣ अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या मॅरेथॉनमध्ये मोनिका अथरे प्रथम
7⃣ आर्थिक कमजोरीमुळे दोन वर्षांपासून शरीरसौष्ठवपासून दूर राहिलेल्या डोंबिवलीच्या अतुल आंब्रेने केवळ ५ महिन्यांमध्ये कठोर परिश्रम करून पीळदार शरीर कमावले आणि थेट प्रतिष्ठेच्या ‘मुंबई श्री’ किताबावर केला कब्जा

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
"चमत्कार निसर्गाच्या विरूध्द नसतात ,पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात."     
- *सेंट आॅगस्टाइन*              

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *चमत्कार*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 राजेश गंगाधर सब्बनवार, कुंडलवाडी

*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
                  9423625769
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

     "कोंडी "

कधी कधी माणसाची
दोन्हीकडून कोंडी असते
विरोधाची भाषा तर
नेहमीच तोंडी असते

विचारपुर्वक फोडावी
लागते सदा कोंडी
नाहीतर लोक बसलेतच
द्यायला तोफेच्या तोंडी

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*जीवन गौरव शैक्षणिक मासिक*
☄☄☄☄☄☄☄☄☄☄☄

*✅🎯 मासिक जीवन गौरवसाठी वार्षिक वर्गणी /जाहिरात शुल्क किंवा देणगी पाठविण्यासाठी  देशभरातील कुठल्याही बँक आँफ महाराष्ट्राच्या शाखेत पुढील खाते क्रमांकात जीवन गौरव* *च्या नावाने रक्कम जमा करता येते*.

*वार्षिक  सभासदत्व :      250/- रू*
*द्विवार्षिक सभासदत्व :   500/-रू*
*आजीव सभासदत्व   :   3000/-रू*
*संस्थेसाठी              :    4000/-रू*

*✅ महाराष्ट्र बँक खाते क्रमांक  :*
*60238696645*
*शाखा: गारखेडा, औरंगाबाद .*
*IFSC code : MAHB0001770*
*MICR code : 431014019.*

*✅ संपादक मंडळ*
*मासिक जीवन गौरव*
मुख्यसंपादक           कार्य-संपादक
*रामदास वाघमारे*   *संदीप तुपे*

अधिक माहितीसाठी येथे संपर्क करा

*✍  जीमेल:-*👉 jeevangaurav76@gmail.com

*☎  8888125610*
*☎ 9403751806*

*ध्यास शैक्षणिक व सामाजिक* *परिवर्तनाचा जीवन गौरव......!*
----------------------------------------------------

*आजचा*
☀ 🔅 *॥ विचार धन ॥* 🔅 ☀

*उंच हिमालयात, डोंगरद-यांमधील उंचावरच्या शेकडो पाय-या चढून गेल्यावर तिथे असणा-या मंदिरात देव आहे म्हणतात. पण तिकडे गेल्यावरही एक छान प्रसन्न अशी मुर्तीच दिसते. त्या एकाकी शांत मंदिरात तो एकाकी देव, मिणमिणत्या दिव्याच्या साथीने एखाद दुस-या बेलपत्राने अथवा जास्वंदीच्या फुलावर समाधान पावून तटस्थ उभा असतो. मात्र त्या मंदिरात घोंघावणा-या वा-यात, त्यावर सकाळी पडणा-या कोवळ्या ऊन्हाच्या किरणांत, मधूनच एखाद्या वाटसरूकडून वाजणा-या घंटीच्या आवाजात मात्र तो नक्की असतो.*

*असा एकाकी पडलेला देव कधीमधी वर्षातून येणा-या उत्सवाला, त्या गर्दीला, त्यातल्या गोंगाटाला मात्र कावलेला असतो. असे चार भक्त एक दिवस येऊन गेल्याच्या आनंदापेक्षा त्याला तो घोंघावणारा वारा आणि कोवळ्या उन्हाची तिरीप किंवा पावसाळ्यातली रिपरिप अधिक प्यारी असते.*
*"त्याला नको असतं राजकारण, नको असते ट्रस्ट, त्यातील हेवेदावे, नको असतात अहंकाराची युद्ध."*

        🔔 *॥ रामकृष्णहरी ॥* 🔔
           🍀🍀🍀🍀🍀🍀
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध...........✍🏻*
〰〰〰〰〰〰〰〰

या जगात घड्याळाकडे पाहून काम करणारे लोक पुष्कळ आहेत.फक्त त्यांना वेळ घालवायचा असतो.
मग ते काम कसेही का होईना असा एवढाच विचार त्यांच्या डोळ्यासमोर असतो.असा विचार करणा-या माणसांच्या कामात चांगला दर्जा कसा येईल..? अशी माणसे वेळ कसा घालवावा आणि कसेतरी काम करुन मोकळे व्हावे हाच विचार करतात.अशा माणसाकडून चांगल्या
दर्जाची कामे होतील अशी अपेक्षाही करणे चूकीचे आहे.उलट जी माणसे हाती घेतलेल्या कामात पूर्ण लक्ष घालून काम चांगले आणि उत्कृष्टरित्या पार पाडतात.ते कधीच घड्याळाकडे लक्ष देत नाहीत.त्यांचे सारे लक्ष कामातच गुंतलेले असते.
त्यांनी हाती घेतलेल्या कामातच त्यांची एकाग्रता असते.माणसाने कोणत्याही हाती घेतलेल्या कामात जीव ओतून काम
केले तर त्यात त्यांना चांगल्याप्रकारे यश मिळते.
ज्याने घड्याळाकडे पाहून काम करत राहिले तर ते काम निकृष्ट तर होईलच आणि त्या कामातला दर्जाही निकृष्टच राहणार यात शंकाच नाही.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.

🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻
----------------------------------------------------
*वपुर्झा*

कुणाचा तरी हात शोधण्याच्या धडपडीतच अपेक्षाभंगाचे झटके बसतात. हे झटके खरे तर दीपस्तंभ व्हायला हवेत. कुणी कुणाचा नाही. ’आपद्दीपो भव’ ह्याची दिशा दीपस्तंभाने दाखवायला हवी. पण तसं घडत नाही. आपण नवे आधार शोधत राहतो आणि नव्या ओळखीतून जुनेच फटके खात राहतो...!!!
~ वपु काळे | वपु ८५

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
-----------------------------------------------
*🌷🌷🌷आजची बोधकथा🌷🌷🌷*

      *🌺पुण्यायी कर्माची*🌺

एका जंगलामध्ये एक म्हतारी आणि तिची नात राहत होती .
आणि त्याच जंगलामध्ये चार दरोडेखोर लुटमार करण्यासाठी येत असंत .
एके दिवशी लुटमार करता करता संध्याकाळ झाली आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची सुरुवात झाली .
ते चार दरोडेखोर जंगलामध्ये आश्रयासाठी सैरभैर पळु लागले .
अचानक त्यांना म्हातारी तारीची झोपडी दिसली .आणि ते म्हतारीच्या झोपडीकडे गेले. म्हतारीने त्यांना रात्री साठी आश्रय दिला.
म्हातारीने जेवण बनवले सर्वजन जेवायला बसले आणि जेवता जेवता पाप पुण्याचा विषय निघाला.
प्रत्येकजण आपल्या परीने विषय मांडत होता. शेवटी म्हातारीने पैज लावली .बाहेर विजा पडत आहेत प्रत्येकाने त्या समोरच्या झाडाला शिवुन पुन्हा झोपडीमध्ये यायचे  ज्याच्या अंगावर विज पडेल तो पापी आणि जो सुखरुप पुन्हा झोपडीत येईल तो पुण्यवान.
प्रथम पहीला दरोडेखोर गेला झाडाला शिवुन सुखरुप झोपडीत आला.
असे दुसरा गेला ,तिसरा गेला, चौथा गेला. आणि सर्वजण सुखरुप झोपडीत आले.
आता पाळी आली म्हतारी आणि तिच्या नातीवर म्हतारीला मनामध्ये प्रश्न पडला की हे चारही दरोडेखोर पुण्यवान निघाले आपण नक्कीच पापी आहोत विज आपल्याच अंगावर पडणार असा विचार करत असताना तिने नातीला कडेवर घेतले आणी झोपडीच्या बाहेर पाऊल टाकले त्याचक्षणी विजेचा कडकडाट होऊन विज त्या झोपडीवर पडली आणि क्षणार्धात ते चारही दरोडेखोर जागीच भस्मसात झाले.
*तात्पर्यः एका पुण्यवान माणसाच्या आश्रयामूळे आजही चार पापी माणसं जगु शकतात  पण त्याने साथ सोडली तर ते चारही भस्मसात होऊ शकतात.*
*-----------------------------------*
*📝 शब्दांकन/संकलन*
*✒श्रीमती प्रमिलाताई सेनकुडे (शिंदे)*
जि.प.प्रा.शा.वाटेगाव
ता.हदगाव, जि. नांदेड
http://www.pramilasenkude.blogspot.in
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments