01 एप्रिल 2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 01/04/2017 वार - शनिवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

         *एप्रिल फूल्स दिवस*

⌛ १८८२ : पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.
⌛१९३३ : भारतीय विमानदलाची स्थापना.
⌛१९३५ : भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.
⌛१९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.
⌛२००४ : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
💥 जन्म :-
⌛१५७८ : रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे.
⌛१९२० : पंडित रविशंकर यांचा जन्म
⌛१९४१ : भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.
⌛१८८९ : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
💥 मृत्यू :-
⌛ एस.एम.जोशी.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ राष्ट्रीय महामार्गांवर दारु विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाकडून बंदी कायम.
2⃣ जियो प्राईम मेंबरशीपची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवली, आता 15 एप्रिलपर्यंत मुदत.
3⃣  नांदेड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे निलंबित, पदाचा दुरुपयोगासह अनेक ठपक्यावरून निलंबन, केंद्रेची आजच होती सेवानिवृत्ती
4⃣  जीएसटी विधेयकावर 5 एप्रिलला राज्यसभेत होणार चर्चा.
5⃣  नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि जिल्ह्यातील १३ ही पंचायत समिती सभापतींना मुदतवाढ, जिल्हा परिषद सदस्यांचा २० मार्चला आणि पंचायत समितीची १३ मार्चला मुदत संपली, निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ
6⃣ विराट कोहलीच्या खांद्याची दुखापत बरी न झाल्यास त्याच्या अनुपस्थितीत द. आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व करेल
7⃣ इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पीव्ही सिंधूने सायना नेहवालवर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

आळस  हा अशा चोर पावलांनी
येतो कि गरिबी त्याला सहजच गाठते

*संकलक :- वैजनाथ जाधव, वसमत*
                   7756968704
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *आळस*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 

👤 प्रकाश नांगरे, सहशिक्षक
👤 गजानन पाटील, हिंगोली
👤 गिरीश पांपटवार, धर्माबाद
👤 पवन सुत्रावे
👤 हरिहर पाठक
👤 रवि कोटूरवार, धर्माबाद
👤 सतिश गर्दसवार, धर्माबाद
👤 अनिल पाटील
👤 दिगांबर जगदंबे
👤 साईनाथ कंदेवाड, करखेली
👤 अजय पेटेकर
👤 शुभम मुतकुलवाड
👤 कुणाल दिलीपराव सोनकांबळे
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

   *" ध्यानी धरा "*

उठ सुट कशाचेही
उगीच काॅपी पेस्ट आहे
आपला अन् वाचणाराचा
वेळ उगीच वेस्ट आहे

आवश्यक तेवढे
महत्त्वाचे फाॅर्वर्ड करा
व्हाटसप लेखकांनो
एवढे नक्की ध्यानी धरा

   शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*
नमस्कार मित्रांनो ,
.
   नागोराव येवतीकर यांचे apps डाउनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकला क्लिक करा....

http://app.appsgeyser.com/Na.%20Sa.

यासोबतच पुढिल लिंकला क्लिक करुन ही डाउनलोड करु शकतात .....

 http://www.appsgeyser.com/2213717

एकदा करून बघा . . . . .
----------------------------------------------------
*आजचा*

••●☆ ‼ *विचार धन* ‼ ☆●••

*भक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन समाजप्रबोधन करीत संतानी इतिहास घडविला. सात-आठशे वर्ष उलटून गेली, तरी त्यांचे स्मरण सर्वदूर होते. भक्तीला ज्ञानाची जोड देऊन जे कर्म त्यांनी उभे केले त्याला 'नमस्कार' म्हणूनच हे स्मरण केले जाते. भक्ती प्रकट करण्यासाठी मनामध्ये आसावा लागणारा भाव संताच्या प्रत्येक रचनेत आपल्याला दिसतो. म्हणूनच फकिरीतून उभे राहिलेले त्यांचे संतत्व शतकानुशके, पिढ्यानपिढ्या अढळ राहिले आहे. भवसिंधू पार करण्यासाठी संतानी घालून दिलेली भक्तीची पायवाट हा एक मानवी जीवनासाठी मार्गदर्शक असणारा भाव आहे.*

*प्रेम, ज्ञान, सुमार्ग, मनोरंजन, दया, क्षमा, शांती आणि आनंद हे सगळे रस्ते संतानी आखिल मानव जातीसाठी मोकळे करून दिल्यामुळेच माणसात देवत्व शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक नव्या पिढीत काही लोकांनी केला. त्यामुळे अगणित जणांचे आयुष्य सुखकर झाल्याच्या गोष्टी आपण ऐकू वाचू शकतो. जीवन आनंदी असणे आणि कोरडे असणे यातला भाव एकदा कळला की, सुलभता, सोपेपणा वाट्याला येते. दु:ख तर प्रत्येकाच्या आयुष्यात असते. त्यापासून कुणाचीही सुटका नाही. पण त्या दु:खाला योग्य तो उतार मिळावा आणि प्राप्त परिस्थितीत परमानंदाने व्यापून जाणे यासाठी संताचा भक्ती-विचार आपल्याला पावलोपावली मदत करीत राहतो.*

   •••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●•••
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
         9167937040
----------------------------------------------------
*आज*
*मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा आवडीनं जवळ येतं, आपण तर माणूस आहोत*,
*त्यामुळं आयुष्य हे एकदाच आहे "मी"पणा नको,  तर सर्वांशी प्रेमाने रहा...*
*लोखंड वितळले की, औजार बनते*,
*सोने वितळले की,दागिने बनतात* ,
*माती नरम झाली की शेती बनते*,
*पीठ नरम झाले की पोळी बनते*,
*अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की लोकांच्या हृदयात त्याची  जागा बनते*"
----------------------------------------------------
*वपुर्झा*

सुरुवात कशी झाली यावरच बऱ्याच घटनांचा
शेवट अवलंबून असतो.

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                  9975704211
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
  
     *❃ स्वार व त्याचा घोडा ❃*
     
   *एक स्वार आपल्या घोड्याला खरारा* करून त्याच्यावर खोगीर घालत असता घोड्याच्या एका पायाच्या नालाचा एक खिळा सुटून पडला आहे असे त्याला दिसले. पण तेथे दुसरा खिळा बसविण्याचे काम त्याने मागे टाकले. काही वेळाने लढाईवर जाण्याचे इशारे देण्याचे शिंग वाजू लागताच तो स्वार आपल्या घोड्यावर बसून लढाईच्या जागेकडे निघाला. त्या फौजेच्या सेनापतीने हुकूम सोडला की, 'सर्वांनी आपले घोडे भरधाव सोडून शत्रूंवर तुटून पडावे व त्यांचा पाठलाग करावा.' हुकमाप्रमाणे तो स्वार आपला घोडा उडवीत चालला असता खिळा पडल्यामुळे सैल झालेला घोड्याचा नाल गळून पडला व त्यामुळे घोडा लंगडत लंगडत चालू लागला. लंगडताना एका दगडावर त्याचा पाय आपटल्यामुळे स्वार घोड्यावरून खाली पडला व तो शत्रूच्या हाती सापडताच शत्रूने लगेचच त्याला मारले.

       *_तात्पर्य_*
    *जेव्हाचं काम तेव्हा न करता ते आळसाने पुढे ढकलणे ही सवय वाईट व घातक आहे*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments