10/03/2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 10/03/2017 वार - शुक्रवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛ १९९८ : भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याला लिनारेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धीबळ स्पर्धेत विजेतेपद
⌛१९७७ : सूर्यमालेतील युरेनस ग्रहाला शनीसारखी कडी असल्याचा शोध लागला.
💥 जन्म :-
⌛१९२९ : कविवर्य मंगेश पाडगावकर
💥 मृत्यू :-
⌛ १८९७ : सावित्रीबाई फुले
⌛ १९९९ : विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ 'कुसुमाग्रज' – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार 

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣  गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी नुकतीच संपली. आता सर्वांच्या नजरा लागल्या येत्या शनिवारी 11 मार्चला जाहीर होणा‍ऱ्या निकालाकडे
2⃣ गरज पडल्यास मायावतींशी आघाडी करू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादवांचे बीबीसीकडे वक्तव्य
3⃣ श्रीलंकेच्या ताब्यातील 85 भारतीय मच्छीमारांची सुटका होणार, आम्ही यासंबंधी पुढील आदेशाची वाट पाहत आहोत - परराष्ट्र मंत्रालय.
4⃣ दहा रूपयांची नवी नोट लवकरच येणार चलनात
5⃣ तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मतदारसंघात 12 एप्रिलला पोटनिवडणूक होणार तर 17 एप्रिलला लागणार निकाल
6⃣ पाकिस्तानचा कसोटी कर्णधार मिसबाहने हाँगकाँग  ब्लिट्झ-20 स्पर्धेत हाँगकाँग आयलँडकडून खेळताना सलग सहा चेंडूवर सहा षटकार ठोकले. मात्र एका षटकात नव्हे
7⃣ डीआरएस वाद प्रकरणात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथविरोधात कारवाई न केल्याने भारताचे माजी कर्णधार लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (ICC) सडकून केली टीका

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*

*"आपण दररोज रोपांना पाणी देतो, पण फळआणि फुले फक्त त्या त्या ऋतूमानाप्रमाणेच येतात"*
*"म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे, प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार..!"*

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *ऋतुमान*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 शिवराज सावंत, सहशिक्षक, सिंधुदुर्ग
👤 वीरभद्र मिरेवाड, सहशिक्षक तथा साहित्यिक
👤 तुळशिराम सिरमलवर, सहशिक्षक, धर्माबाद
👤 साईनाथ शिरपुरे, भाजपा सोशल मिडीया नांदेड जिल्हाध्यक्ष
👤 माधव आप्पा पडोळे, येवती
👤 संतुकराव अंदेलवाड, केंद्रप्रमुख,बाळापुर
👤 शिवाजी जाधव, स्तंभलेखक
👤 टी. अशोक साईनाथ, येळवी
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

      "नशा "

सत्तेच्या माजाने
उर्मट भाषा आहे
वाटेल ते बोलायला
सत्तेची नशा आहे

विचार न करता नशेत
काही तरीच बोलतात
भानावर आल्यावर मग
चांगले पाय हालतात

    शरद ठाकर
सेलू जि परभणी
  8275336675
----------------------------------------------------
*आजचा*
🛡 *~~~॥ विचार धन ॥~~~* 🛡

       *"मन करा रे प्रसन्न !*
        *सर्वसिद्धीचे कारण !!"*

*या संतरचनेत नैराश्य घालविण्याची मात्रा सापडते. त्यामुळे बाह्य घटनांकडे लक्ष न देता आपल्या आंतरिक सुखाकडे जास्त दिले पाहिजे. गोळ्या-औषधांसारखे बाहयोपचार शरीर बरे करते. पण मनाचे बरे होणे हे शरीराच्या प्रगतीसाठी आत्यावश्यक असते, म्हणून  मन प्रसन्न ठेवणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे. त्याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की, आशा आणि निराशा या मनातच वस्ती करून असतात.*

*निराशेच्या जोराने आशा बाहेर येऊ शकत नाही. याप्रमाणेच प्रसन्नता ही मनातच असते, तिला आपण खेचून बाहेर आणले पाहिजे. अगणित लोक देवळात, यात्रेत देव शोधतात, तो आपल्या मनातच असतो. किंबहुना मनाच्या मंदिरातच त्याची स्थापना करायची असते, हे आपण विसरतो. मग परमेश्वर रागावतो अशा भंपक संकल्पनांना ऊत येतो. परंतु तो रागवत नाही तर आपल्याला आपली पावले योग्य दिशेने टाकण्यासाठी दिग्दर्शन करतो.*

         🌷 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌷
           💐💐💐💐💐💐
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
           *9167937040*
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध.........✍🏻*
###############

संकटे ही माणसांच्या जीवनात सशाच्या गतीने येतात नि कासवाच्या मंद गतीने हळुहळू जातात.पण त्यामधला जो काळ दुःखाचा आणि वेदना सहन करण्याचा आहे त्याला शांत आणि धैर्याने,हिंमतीने तोंड देऊन विजय मिळवतो तोच जीवनात यशस्वी होतो.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद..9421839590.

🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*

ज्योतीवर सगळे भाळतात पण जळणाऱ्या तेलाची कुणाला आठवण होत नाही? संगीताच्या भाषेत बोलायचे झाले तर, तारांचे कंप सगळ्यांना दिसतात. खुंटयावर पडलेला ताण कुणीच पाहत नाही. मी ज्योत पण पाहिली आहे. ज्योतीच्या धगीन तापणारी समई पण पाहिली आहे...
~ वपु काळे | मोडेन पण वाकणार नाही

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
                   9975704211
----------------------------------------------------
     ╭════════════╮
       ▌      ☣ *आजची बोधकथा* ☣    ▌
     ╰════════════╯
             *खरे दुःख*
एक सोनार होता. त्याच्या दुकानासमोरच एका लोहाराचे दुकान होते. सोनार जेव्हा काम करत असे तेंव्हा सोनाराच्या दुकानातून हळू आवाज होत असे पण जेंव्हा लोहार काम करत असे तेंव्हा मात्र लोखंडाचे काम होत असल्याने मोठा आवाज होत असे. तो आवाज मोठा कर्णकर्कश असे. एके दिवशी सोनाराच्या दुकानातील एक सोन्याचा कण कसा कोण जाणे पण लोहाराच्या दुकानात जावून पडला. त्या सोन्याच्या कणाची भेट एका लोखंडाच्या कणाशी झाली. खूप दिवसांची ओळख असल्यासारखे ते एकमेकांशी बोलू लागले. सोन्याच्या कणाने लोखंडाच्या कणाला म्हंटले,"दादा, आपले दुःख तर खरे एकसमान आहे. दोघानाही आगीत तापवले जाते आणि हातोड्याने ठोकले जाते. मी तर बाबा चुपचाप हे सहन करतो, पण तुझे काय?" लोखंडाचा कण सोन्याच्या कणाकडे पाहून दुःखी स्वरात म्हणाला,"अरे ! तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे. दोघानाही तापवणारी आग एकच आहे आणि ठोकणारा हातोडाहि एकाच धातूचा आहे. पण खरे दुःख याचे आहे कि तुला ठोकणारा हातोडा हा तुझा कोणीच लागत नाही पण मला ठोकणारा लोखंडाचा हातोडा हा नात्याने माझा भाऊच लागतो. दुसऱ्याने दिलेल्या दुःखापेक्षा स्वकीयांनी दिलेला त्रास हा अगदी हृदयात वार करून जातो."
                         *तात्पर्य*
आपल्या माणसांकडून होणारा त्रास हा कायमच दुःखदायक वाटतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments