✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 13/03/2017 वार - सोमवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
*रंगपंचमी*
⌛१९६३ : अर्जुन पुरस्काराची सुरुवात
⌛१९२८ : कुमारी नॅन्सी मिलरचा हिंदू धर्मात प्रवेश झाला
⌛१८५४ : नागपूर रियासतीची समाप्ती झाली
⌛१९९७ : कोलकात्यातील मिशनरीज् ऑफ चॅरिटीने मदर तेरेसांची वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड केली
💥 मृत्यू :-
⌛१८०० : नानासाहेब फडणवीस, पेशवे दरबारातील एक मंत्री.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ मुंबईत पहिले तरंगते हॉटेल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद््घाटन
2⃣ शिर्डी संस्थानला ४ कोटी रुपये दंडाची नोटीस
3⃣ येत्या पाच वर्षांत ‘नवा भारत’ घडवू ! पंतप्रधान नरेंद्र मोदी
4⃣ सैलानी यात्रेत लाखो नारळांची जगावेगळी होळी !
5⃣ राज्यात हुडहुडी... नाशिकचा पारा १0.४
6⃣ पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून अमरिंदर सिंग यांचा शपथविधी गुरुवारी
7⃣ टीम इंडियात फेर बदल होणार ? अनिल कुंबळे संचालक तर राहुल द्रविड प्रशिक्षकपद देण्याची शिफारस करण्यात आली.
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*स्थानिक बातमी -*
कुंडलवाडी शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी हरिष देशपांडे तर सचिवपदी फ्रेश मॉर्निंग बुलेटिनचे वृत्त संकलक कुणाल पवारे यांची बिनविरोध निवड
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत आणि लढण्याची धमक असते,,,*
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*हिम्मत*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 वैजयंती मद्दलवार
👤 शेख रुस्तम, सहशिक्षक
👤 भगवान कांबळे
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
"रंग "
खरचं किती निरागस
सारे रंग असतात
जातीत वाटण्यास त्यांना
मतलबी दंग असतात
जातीत वाटलेले रंग
आता एक झाले पाहिजे
आता आपणचं त्यांना
जातमुक्त केले पाहिजे
*रंगोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा*
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
---------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
नासा येवतीकर, स्तंभलेखक लिखित
*" प्रामाणिक वसंता "* लघूकथा वाचा प्रतिलिपीच्या खालील लिंकवर
http://marathi.pratilipi.com/na-sa-yevtikar/pramanik-vasanta
कथा आवडल्यास star द्यायला विसरु नका
----------------------------------------------------
*आजचा*
🔱~💧 *॥ विचार धन ॥*💧~🔱
*'आनंद' आणि 'दिर्घायुष्य' यातले नाते शोधले पाहिजे. अलिकडे दिवाळी येते आणि जाते. समाजातील एका वर्गाला तर या सणाचे आकर्षणच वाटेनासे झाले आहे. कारण आम्ही राजे झालो आहोत आणि राजाला रोजच दिवाळी असते. वर्षभर पंचपक्वान्, ऋतुनुसार तेलं, क्रीम्स, अभ्यंग रोजचेच, कपडेच काय पण फर्निचरही वर्षाला नवीन, फटाकेही नेहमीचेच मग 'दिवाळी आनंद' वेगळा काय असतो ?*
*'आनंद' हा दिर्घायुष्यासाठी प्रथम क्रमांकावर. वाणसामानाच्या सटरफटर गोष्टींसारखी दिर्घायुष्यासाठीच्या गोष्टींची यादी करून ती फडकवणारे पुष्कळ. पण अचानक त्यांचीच विकेट पडते. जगणे हीच शिकवणी असताना, आपण त्रास न करून घेणे ही दिर्घायुष्याची दुसरी पायरी. इतरांना त्यांच्या त-हेने जगू देणे एवढेच आपल्या हाती असल्याने त्यात आनंद मानता यायला हवा. इतरांना शिकवत बसण्यात अर्थ नसतो, त्यासाठी आपला जन्म असतो का ?*
🌹 *॥ रामकृष्णहरी ॥* 🌹
🍁🍁🍁🍁🍁🍁
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*❃ करढोक व मासे ❃*
*करढोक नावाचा एक पक्षी* नदीकाठी राहून व पाण्यात बुड्या मारून मासे धरून खातो. या जातीचा एक पक्षी म्हातारा झाल्याने त्याला पाण्यातले मासे दिसेनासे झाले.
त्यामुळे काहीतरी ढोंग करून आपला चरितार्थ चालवण्याचा त्याने विचार केला, 'तो ज्या कालव्याजवळ बसला होता, त्यातला एक मासा पाण्याच्या पृष्ठभागावर आला असता, तो म्हातारा करढोक त्याला म्हणाला, 'अरे, तुला तुझ्या स्वतःच्या नि तुझ्या भाऊबंदांच्या जिवाबद्दल जर थोडी-बहुत काळजी वाटत असती तर कालव्याचा मालक एकदोन दिवसात कालव्यातलं सगळं पाणी बाहेर सोडणार आहे, याकरता तुम्ही आपले जीव वाचविण्यासाठी काहीतरी उपाय करा.' हे ऐकून तो मासा पाण्याच्या तळाशी गेला आणि सगळ्या माशांची सभा भरवून तो करढोकाचा निरोप त्याने सांगितला.
तो ऐकताच आपल्यावर येणार्या संकटाची सूचना देणार्या त्या करढोकाचे आभार मानण्याचा व या संकटातून मुक्त होण्यासाठी उपाय सुचविण्याविषयी त्याला विनंती करण्याचा ठराव त्यांनी केला व तो त्या करढोकास कळविण्याचे काम त्या निरोप घेऊन येणार्या माशावर सोपविले.
त्याप्रमाणे त्याने करढोकास जाऊन आपला ठराव त्याला कळविला. तो ऐकताच करढोक त्याला म्हणाला, 'या संकटातून वाचण्याचा एकच मार्ग आहे. तुम्ही सर्वांनी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं म्हणजे मी तुम्हाला माझ्या घराशेजारच्या तलावात नेऊन पोहचवीन. ती गोष्ट माशांनी कबूल केली. मग करढोकाने त्यांना एका उथळ पाण्याच्या तलावात नेऊन सोडले व थोड्याच दिवसात त्या सर्वांना गट्ट केले.
*तात्पर्य*
*शत्रूच्या गोड शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या जाळ्यात सापडणे हा मूर्खपणा होय*.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment