✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 17/03/2017 वार - शुक्रवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛ १९४४ : भारतीय नौदल अभियांत्रिकी संस्था आय. एन. एस. शिवाजीची लोणावळा येथे स्थापना.
💥 जन्म :-
⌛ १९२० : बांगला देशाचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबर रहमान.
💥 मृत्यू :-
⌛ १८८२ : ‘मराठी भाषेचे शिवाजी’ ही पदवी मिळवणारे विष्णूशास्त्री चिपळूणकर.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी)घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2016चा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर, नाशिक जिल्ह्यातील भूषण अशोक अहिरे राज्यात प्रथम तर महिला मधून सातारा जिल्ह्यातील पूनम संभाजी पाटील प्रथम क्रमांक
2⃣ गोव्यात मनोहर पर्रीकरांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव, बहुमत सिद्ध
3⃣ ईव्हीएम मशीन बरोबर छेडछाड झाल्याच्या आरोपात अजिबात तथ्य नाहीत - निवडणूक आयोग.
4⃣ लातूरमध्ये पुन्हा गारांसह जोरदार अवकाळी पाऊस, यापूर्वीच्या पावसात वाचलेली पीकंही जाण्याची शक्यता.
5⃣ राज्यात विभागनिहाय नीटसाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढणार- सूत्रांची माहिती
6⃣ मराठवाड्यात 300 गावाना गारपिटीचा तडाखा
7⃣ रांची येथे सुरु असलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिस-या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने केल्या चार बाद 299 धावा
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" आपल्याला आवडते ते करणे म्हणजे स्वातंत्र्य नसून आपण जे काही केलं पाहिजे याचा हक्क असणे म्हणजे स्वातंत्र्य होय."
__________ पोप जाॅन पाॅल दुसरा
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*दर्शक*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤 बाबू गुरुपवार, देगलुर
👤 तरनुम समीर शेख, चिंचाळा उमरी
👤 अमोल रक्षाळे, उदगीर
👤 साईनाथ व्ही. कासराळीकर
(executive maintenance Pune)
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" कोंडी "*
सर्वांकडूनच आता
कायम कोंडी आहे
कर्ज माफी व्हावी
प्रत्येकाच्या तोंडी आहे
प्रत्येकाला वाटते
होईल कर्ज माफ
जाईल शेतक-याच्या
डोक्याचा ताप
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
आज पुण्यनगरीमध्ये प्रकाशित झालेला लेख
*पैश्याची हाव अन......*
*धुळीत मिसळले नाव*
http://epunyanagari.com/epapermain.aspx?eddate=3/17/2017%2012:00:00%20AM&queryed=42&a=11&b=45914#
लेख वाचा वरील पुण्यनगरीच्या लिंक वर
----------------------------------------------------
*आजचा*
••●★‼ *विचार धन* ‼★●••
*आपले एक बरे आहे, आपण परदेशात 'भारतीय असतो, भारतात महाराष्ट्रीयन असतो, महाराष्ट्रात मुंबईकर, पुणेकर, ठाणेकर असतो. त्यातही पुन्हा गिरगावकर, दादरकर, पार्लेकर किंवा चांदिवलीकर असतो. परंतु आपला देश कुणीही अभिमान बाळगावा, असा आहे. परदेशाचे आकर्षण विविध कारणांनी असते, पण स्वदेशाचे आकर्षण निर्माण होणे यासाठी आवश्यक असते ती देशभक्ती. पराकोटीच्या वैविध्यामुळे, परकीय आक्रमणामुळे किंवा निसर्गाच्या कृपेमुळे म्हणा, भारतभुमीत जन्म घेतलेल्या बालकाला आजन्म पुरेल, अशी देशभक्तीची रसद परमेश्वर देतो.*
*आदिमानवाचे रूपांतर चांगल्या आचारांतील स्वच्छ, सुस्वभावी, वैचारिक बुद्धिमत्तेची कास धरणारा, नितीमत्ता पाळणारा प्रगतीशील मानव निर्माण करणे यासाठी धर्माची निर्मिती असते. भारतभूमीत अनादी कालापासून ईश्वराने सर्व अवतार घेऊन मानवाच्या जन्मसिद्ध अधिकारांची निर्मिती करून त्याला घडवण्याचा प्रयत्न केला. हे फक्त भारतात घडलेले दिसते. ह्या भूमीला ईश्वरी शक्तीचे सतत सानिध्य लाभलेले असल्याने तिला 'देवभूमी किंवा तपोभूमी' म्हटले जाते. इथले 'अध्यात्म' परदेशी नागरिकांना आत्मचिंतन शिकविते. जिज्ञासू परदेशी नागरिक दिव्यत्वाची अनुभूती फक्त भारतातच घेऊ शकतात, ते केवळ इथल्या आपल्या पूर्वजांनी, साधुसंतानी निर्माण केलेल्या 'ईश्वरी शक्ती'मुळे.*
••● ‼ *रामकृष्णहरी* ‼ ●••
⭐⭐⭐⭐⭐⭐
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध...........✍*
〰〰〰〰〰〰〰〰
तुमच्या हस-या चेह-यावरचा आनंद
एखाद्याच्या जीवनात
असलेले नैराश्य किंवा दुःख काही काळापुरते कमी होऊ शकते.
तुमच्यामुळे त्यांना त्यांच्या जीवनात दुःखाला विसरुन जाऊन सुखी व आनंदी राहायची प्रेरणा मिळते तर मग आपण सदैव हसतमुखाने राहून दुःखालाही दूर करु शकतो हे आपल्या चेह-यावरच्या हसण्यानेच शिकवले.तेव्हा नेहमी हसतमुखाने राहून तुमच्या जीवनासारखे इतरांचेही जीवन हसरे ठेवायला मदत करा.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
----------------------------------------------------
*वपुर्झा*
स्वास्थ्यापेक्षा आपत्तीच माणसाला अंतर्मुख बनवते, क्रियाशील करते.
~ वपु काळे | इन्टिमेट
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*वाघा प्रमाणे स्वतःला ओळखा*
स्वामी विवेकानंद आपल्या भाषणामध्ये नेहमी सांगत असलेली ही गोष्ट. एकदा एका जंगला मध्ये एक वाघच पिल्लू वाघिणी पासून हरवले आणि मेंढ्यांच्या कळपात जावून मिसळले. हळू हळू ते पिल्लू त्या कळपातच वाढू लागले आणि तिथेच मोठे झाले. ते पिलू मेंढ्या प्रमाणेच गवत खायचे, बे बे करायचे, आणि भीती वाटली कि पळून जायचे. त्याच्या सुदैवाने एक दिवस त्याची दुसऱ्या वाघाशी भेट झाली तेव्हा त्याला कळले की तो एक शक्तिशाली वाघ आहे. आणि सर्व त्याला भितात मग मीच का असा आहे, तेव्हा पासून त्याचे बे बे करणे, गवत खाणे, भीतीने पळून जाणे बंद झाले.
*तात्पर्य* - स्वतःला ओळखा, प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रचंड शक्ती आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment