✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 18/03/2017 वार - शनिवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१९६९ : ‘कॉसमॉस’ हे मानवविरहित अवकाशयान रशियाने याच दिवशी अवकाशात सोडले
⌛१९६५ : अंतराळवीर अलेक्सी तिओनोवा हा अंतराळात चालला.⌛१९१९ : रौलेट अॅक्ट पास झाला
💥जन्म :-
⌛१५९४ : स्वराज्य संस्थापक शहाजीराजे भोसले.
⌛१९२२ : महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरुंगवास.
💥मृत्यू :-
⌛१८७१ : इंग्लिश गणितज्ज्ञ ऑगस्टस द मॉर्गन.
⌛२००१ : विश्वनाथ नागेशकर, भारतीय,गोवेकर चित्रकार.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ राज्याचा अर्थसंकल्प आज दोन्ही सभागृहात दुपारी २ वाजता सादर होईल. वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विधानसभेत तर वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
2⃣ उत्तरप्रदेशमध्ये शपथविधी सोहळयाची वेळ बदलली, रविवारी 19 मार्चला दुपारी 2.15 वाजता होणार शपथविधी.
3⃣ सत्ता संभाळताच पंजाब सरकारने 19 आयएएस अधिकारी आणि पीसीएस अधिक-यांच्या काढले बदलीचे आदेश
4⃣ धर्म, जात आणि राजकारणाच्या नावाखाली माणूस माणसाच्या विरोधात गेला तर, प्रगती साध्य करणे अशक्य आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
5⃣ यवतमाळ जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीने दहा हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान, कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज. हजारो घरांची पडझड.
6⃣ रांची येथील कसोटी सामन्यात दुस-या दिवसअखेर भारताच्या 1 बाद 120 धावा, ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात सर्वबाद 451.
7⃣ बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याच्यानंतर आता सायना नेहवाल गेल्या आठवड्यात छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या कुटुंबीयांना करणार आर्थिक मदत
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
*तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही, अशी भीती कधीच बाळगु नका..........*
*कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते...*
*संकलन :- साईनाथ शिरपुरे, धर्माबाद*
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*उडणाऱ्या*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤राजेश राठोड, सहशिक्षक यवतमाळ
👤 व्यंकट पंढरीनाथ भंडारे, येवती
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" विज्ञाननिष्ठा "*
तामिळचा अर्थसंकल्प
अम्मा चरणी वाहिला आहे
विज्ञाननिष्ठ माणसांनी
हा प्रकार पाहिला आहे
अशा आंधळ्या श्रध्देतून
लोक काय शिकतील
भविष्यात विज्ञाननिष्ठ
सांगा कुठून टिकतील
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
*आम्ही देतो आरोग्य विमा*
( दवाखान्याचा 80 लाखापर्यंतचा खर्च )
*एक कोटीपर्यंतचा जीवन विमा*
दुकान , घर , कार, दुचाकी वाहने इत्यादींचा विमा काढण्याची व्यवस्था आहे ........
*संपर्क करा :- मोहन फडेवार*
SBI General Insurance
9421869703
----------------------------------------------------
*आजचा*
🌸 🌼 *॥ विचार धन ॥* 🌼 🌸
*नव्या युगात 'बुफे डीनर' असते. मुळात लागेल तेवढेच घेण्यासाठी बुफेची व्यवस्था असते; मात्र माणसं भराभर वाढून घेतात, ते खपणारे नसतेच; मग टाकून देतात. पंगतीतही वाढपे पुन्हा येतील की नाही, या भावनेने दोन ऐवजी चार पु-या घेतल्या जातात आणि मग अन्न वाया जाते. असे होऊ नये म्हणून स्वत:च पुढाकार घेणे श्रेयस्कर आहे. आपल्या रूढीप्रमाणे 'अन्नसंस्कार' केला जातो. सोळा संस्कारांपैकी हा एक महत्वाचा संस्कार आहे; पण अलिकडच्या काळात या संस्काराचे आपण संस्कृतीत झालेले परिवर्तन मोडीत काढले असून एक विकृती म्हणून ही आपली अन्न संस्काराची परंपरा पुढे येत आहे. असे होणे प्रासंगिक घातकपणाचेच नव्हे, तर नव्या पिढीला बिघडविणारे आहे.*
*आपण नव्यांच्या ओंजळीत जी संस्कार शिदोरी देतो तीच घेऊन ते पुढे जात असतात. त्यांच्या मन-बुद्धीचा विकासदेखील त्यावरच होत असतो आणि आपणच जर बेफिकीरीने जगत-वागत राहिलो, तर त्यांच्यावर तरी संस्कार होणार कसा.? त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात घेऊन वागले पाहिजे. जेवन झाल्यानंतर 'अन्नदाता सुखी भव' असे म्हणण्याची एक रीत आहे. त्यातून अन्न देणारा आणि घेणारा दोघांचेही संस्कार दिसून येतात. जिभेला असलेले वळण जेव्हा मनाला लागते आणि त्याबरहुकूम मेंदू काम करतो तेव्हाच विवेकी आचरण घडत असते. यास्तव अन्नप्रतिष्ठा जपणे ही कुण्या एकट्याची नव्हे, तर राष्ट्रातील प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे.*
••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••
☘☘☘☘☘☘
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध.........✍*
〰〰〰〰〰〰〰〰
आजच्या प्रसारमाध्यमांनी मनातल्या भावनांना
बंदीस्त करुन टाकले आहे. मनातले विचार प्रकट करण्यासाठी संधीच उपलब्ध करून देत नसल्यामुळे प्रत्येकाच्या विचारांची देवाणघेवाण होत नाही.त्यामुळे चांगल्याही विचारांना मनातून बाहेर येण्यासाठी बांध घातला आहे.त्यामुळे सुखी कोण आणि दुःखी कोण हे शोधने अवघड होऊन बसले आहे.या सा-यांतून सुटका करायची असेल तर या प्रसारमाध्यमापासून थोडे दूर राहून प्रचलीत प्रसारमाध्यमाबद्दलचा मोह थोडा दूर ठेवला पाहिजे. त्याऐवजी थोडा संवाद,
चर्चा,एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण करुन आपुलकीचे,प्रेमाचे, स्नेहाचे संबंध जोडण्यासाठी प्रयत्नशील असायला हवे. तरच प्रत्येकाला एकमेकांबद्दलची मनातली असणारी ओढ पूर्वीसारखी कायमची राहील.माणूस माणसाला विचारायला लागेल आणि जीवनव्यवहार सुरळीत चालायला लागतील.हाच माणुसकीचा धर्म जीवंत राहील अन्यथा माणसापासून माणूस दूर जावून माणसातल्या माणसामधली दडून बसलेली विकृती जन्मास येऊन सर्वत्र नैराश्याचे वातावरण निर्माण होईल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590.
🍃🍂🍃🌹🍃🍂🍃🌹🍃🍂🍃
----------------------------------------------------
*वपुर्झा*
स्पर्शसुख म्हणजे प्रेम नक्कीच नाही. तो प्रितीचा मुळ रंग नाहे. तो नुसता अभिलाषेचा तवंग! एक सवंग लालसा! जाता येता भेटत राहते, जाणवते. स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते. रस्त्याने चालताना लादली जाते. बुकिंग क्लार्कने तिकीट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाण्याने पुड्या देताना तेच, ऑफिसरने फाईल देताना तेच. हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुध्दा सुटाबुटात चिकटुन जाते. वर पुन्हा ‘सॉरी’च गुलाबपाणी शिंपडायच आणि एक औशट हास्य. सगळीकडेच ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलिकडचा पुरूषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं काही ओकतच नाहीत. स्त्री देहावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुटं चढलेली असतील पुटं! भारतीय युध्द समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथामधून उतरायला सांगितलं. अर्जुनाला नवल वाटलं. तरी कृष्णाचं ऐकुन तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच, अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णाने सांगितलं, ‘कौरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता. अगोदर मी जर उतरलो असतो, तर हा रथ तुझ्यासकट जळून गेला असता.’ आयुष्यभर स्त्रीदेहाचं संरक्षण असाच कुणी अज्ञात कृष्ण करीता असला पाहिजे. नाहीतर पुरूषांच्या नजरांनी तो देह चितेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता.
~ वपु काळे | वपुर्झा
*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*❃ आत्मपरीक्षण ❃*
"एक तरुण मुलगा पब्लिक फोन ठेवलेल्या दुकानात येतो.
तरुण (अदबीने) : दुकानदार काका, मी एक फोन करू का ?
तरुणाचे आदबशीर वागणे पाहून दुकानदार खुश होतो. तो तरुण फोन नंबर फिरवून रिसिव्हर कानाला लावतो. (डायलवाला जुन्या काळाचा फोन असल्याने पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीचा आवाज इकडे इतरांना देखील अस्पष्ट ऐकू यायचा !! तसे ते बोलणे दुकानदार हळूच ऐकू लागला)
तरुण : बाईसाहेब, तुमच्या बागेच्या सफाईचे काम मला द्याल का ? मी माळीकाम खूप छान करतो.
महिला : (तिकडून बोलतेय) नको. मी एक महिन्यापूर्वीच एकाला ठेवले आहे.
तरुण : बाई, प्लिज, मला फार गरज आहे हो, आणि तुम्ही त्याला जितका पगार देता त्याच्या निम्म्या पगारात काम करायला मी तयार आहे !!
महिला : पण माझ्याकडे जो आहे, त्याच्या कामावर मी समाधानी आहे. मग त्याला का काढून टाकू ?
तरुण : बाई, बाग कामासोबतच मी तुमच्या घरातले सफाईचे काम फ्री करेन. प्लिज मला कामावर घ्या न !!
महिला : तरीही नको बाबा !! दुसरीकडे काम पहा !! माझ्याकडे नाही !!
यावर हसत हसत फोन ठेवून निघाला. दुकानदाराने त्याला थांबवले. आणि विचारले की, "तू प्रयत्न केलास पण नोकरी मिळाली नाही न ? मला तुझा स्वभाव आवडला. कष्ट करण्याची तयारी आवडली. वाटल्यास तू माझ्या दुकानात नोकरी करू शकतोस"
यावर पुन्हा हसून तो तरुण म्हणाला, "मला नोकरी नकोय. नक्की नकोय."
दुकानदार : मग आत्ता तर त्या फोनवर इतक्या विनवण्या करत होतास न ?
तरुण : मी खरेतर त्या बाईंना काम मागत नव्हतो तर स्वतःचे काम तपासत होतो. मीच त्या बाईंच्या बागेचे काम करतो. मी करत असलेले काम माझ्या मालकाला आवडतेय की नाही ? हे चेक करत होतो"
असे म्हणून तो तरुण निघतो, दुकानदार त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे चकित होऊन पाहत राहतो.
*तात्पर्य:*
अधूनमधन आपण स्वतःच स्वतःचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. "जो स्वतःला तटस्थपणे पाहून परीक्षण करू शकतो, तो नक्कीच इतरांपेक्षा पुढे जातो."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment