19/03/2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 19/03/2017 वार - रविवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

⌛१८४२ : लोकहितवादी यांनी ‘शतपत्र’ या लेखनास प्रारंभ केला.
⌛१९६२ : पुणे येथील राजा केळकर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्यात आले.
⌛१९७२ : भारत-बांगलादेश यांच्यात मैत्री करार झाला.
💥 जन्म :-
⌛१९५४ : इंदू शहानी, भारतीय शिक्षणतज्ञ.
💥 मृत्यू :-
⌛१८८४ : केरोपंत छत्रे, गणिततज्ज्ञ.
⌛१७५४ : खंडेराव होळकर, मल्हारराव होळकरांचा एकुलता एक पुत्र व अहिल्यादेवीचे पती.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*

1⃣ अर्थसंकल्प विशेष - डिसेंबर 2018 पर्यंत 28 हजार ग्रामपंचायती डिजिटल करण्याचे लक्ष्य.
2⃣ उत्तर प्रदेशात आज 2.15 वाजता पार पडणार शपथविधी, योगी आदित्यनाथ मंत्रिमंडळ घेणार शपथ, या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा राहणार उपस्थित
3⃣  उत्तराखंडच्या मुख्यमंत्री म्हणूनभाजपाच्या त्रिवेंद्र सिंह यांनी घेतली शपथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा उपस्थित.
4⃣ शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी - सुधीर मुनगंटीवार.
5⃣ सर्व घटकांचा भ्रमनिराश करणारा दिशाहीन अर्थसंकल्प माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे  प्रतिपादन
6⃣ पाकिस्तानात बेपत्ता झालेले भारतीय मौलवी 20 मार्च रोजी परतणार मायदेशी
7⃣ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात तिस-या दिवसाचा खेळ संपला तेंव्हा भारताच्या सहा विकेट्स गमावत 360 धावा, पुजाराची एकाकी झुंज सुरु असून 130 धावांवर नाबाद.
💥अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या वडिलांचं निधन.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
" कठोर परिश्रमाला पर्यायच नाही ."
_______________ थॉमस अल्वा एडिसन

*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *परिश्रम*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 मंजुषा देशमुख, अमरावती
               
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

     *" हमी "*

पेरलं ते उगवेल का?
याची हमी नसते
गारपीट अवकाळी
याची कमी नसते

मतदार मतं देतांना
सांगा हमी कुठे घेतो
विश्वास ठेवूनच तो
प्रत्येकाला मत देतो

    शरद ठाकर
  सेलू जि परभणी
  8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

*अर्थसंकल्प - 2017*

http://fmbuletin.blogspot.com/2017/03/2017.html

ठळक बाबी येथे पहा
----------------------------------------------------
*आजचा*
🎀~🍁 *॥ विचार धन ॥* 🍁~🎀

*जर विहिरीमध्ये खारट पाणी असेल तर वरचे खारट पाणी काढून टाकले आणि जास्त खोल खणले, तर एखादे वेळी गोड्या पाण्याचा झरा लागण्याचा संभव असतो. मग त्या विहिरीचे पाणी गोड होईल.*

*तसेच ज्याला 'निंदा' आवडते त्याच्या अंत:करणामध्ये निंदेची घाण असणारच, निंदा करणे हिन पणाचे लक्षण आहे. जर आपण निंदा बंद केली, अभिमान टाकला आणि अंतर्मुख होऊन भगवंताचा शोध घेतला, तर त्याच्या प्रेमाचा झरा लागून आपले अंतःकरण त्या प्रेमाने भरून जाईल. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या अंत:करणाची परिक्षा होते. आपल्याकडे अशी म्हणच आहे की -*
*"जे आडात आहे तेच पोह-यात येणार."*
         
         ⛳ *॥ रामकृष्णहरी*  ॥ ⛳
            🌻🌻🌻🌻🌻🌻
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबुई*
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध...........✍*
〰〰〰〰〰〰〰〰

जीवनव्यवहारासाठी जसा सुखदुःखाचा,कामाचा आणि वेळेचा अनुभव पाठीशी असावा लागतो तसा आपल्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञानाचा अनुभव पाठीशी असावा लागतो.ते ज्ञान मिळविण्यासाठी मनाची तयारी असायला पाहिजे.
मनाच्या परिपक्वतेसाठी व माणूस म्हणून चांगले आणि संस्कारीत जीवन फुलवण्यासाठी ज्ञानाची कास धरायलाच हवी.ज्ञान हे जीवनाला योग्य दिशा देण्याचे आणि मानव कल्याणाच्या  प्रगतीकडे नेण्याचे काम करते.

- व्यंकटेश काटकर,नांदेड.

🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹📚🌹
----------------------------------------------------
      ╭════════════╮
        ▌     ☣ *आजची बोधकथा* ☣     ▌
      ╰════════════╯
          
                  मनाची शुद्धता
दोन तरुण साधु उंच डोंगरावर असणाऱ्या आपल्या मठाकडे निघाले होते. रस्त्यामध्ये एक ओढा होता. तो ओढा खूप पाण्याने भरलेला असून खोलही होता. त्या ओढ्याच्या काठी एक तरुण युवती बसलेली होती. त्या तरुणीलाही तो ओढा पार करून पलीकडील बाजूस असणाऱ्या गावात जायचे होते. पण ओढ्याला असणाऱ्या पाण्यामुळे ती तो ओढा पार करू शकत नव्हती. पावसाळ्याचे दिवस होते, पाउस पडत होता, ओढा जोराने खळखळत वाहत होता. तरुणीला तर ओढा पार करून पलीकडे जाणे गरजेचे होते. पाण्याला ओढ जास्त असल्याने ती एकट्याने पाण्यात उतरण्याचे धाडस करत नव्हती. दोन साधुंपैकी एका साधूने हे दृश्य पाहिले व त्याने त्या तरुणीला विश्वासपूर्वक दोन गोष्टी सांगितल्या व त्या तरुणीला आपल्या खांद्यावर बसवले आणि त्या तिघांनी मिळून तो ओढा पार केला. तरुणीने तो ओढा पार होताच साधूचे आभार मानले व ती आपल्या गावात निघून गेली. दोन्ही साधू आपल्या आश्रमाकडे निघाले. ज्या साधूने तरुणीला खांद्यावर घेतले होते त्याच्याशी दुसरा साधू बराच वेळ काहीच बोलला नाही. खूप वेळ घुश्यात चालल्यावर त्या साधूने दुसऱ्या साधूच्या मनातील चलबिचल ओळखली व तो त्याला म्हणाला,"मित्र! बरेच वेळ मी पाहतो आहे पण तुला काही तरी खुपते आहे.तेंव्हा विना संकोच तू मनातील गोष्ट मला सांग." तो दुसरा साधू म्हणाला,"हे मित्रा, आपल्या संप्रदायामध्ये स्त्री स्पर्श सुद्धा वर्ज्य आहे. तरी तू त्या स्त्रीला खांद्यावर बसवून ओढा पार केलास हे काही मला आवडले नाही. स्त्रीकडे बघणे, स्पर्श करणे हे महत्पाप तू केले आहेस. तेंव्हा तू माझ्या मनातून उतरला आहेस." त्यावर तो मदत करणारा साधू म्हणाला,"असं आहे तुझ्या नाराजीचे कारण! पण मित्रा, ती स्त्री जेंव्हा माझ्या खांद्यावरून उतरली तेंव्हाच मी तिला सोडले, मात्र तू अजूनही तिला मनात बाळगून आहेस. मी तिला मदत करण्याच्या दृष्टीने स्पर्श केला पण तू अजूनही मनातून तिला वारंवार स्पर्श करत आहेस. संन्यास याचा अर्थ कुणाचीही सेवा न करता अलिप्त राहणे असा न होता मनातील वासना आणि विकारांवर ताबा मिळवणे असा होतो. ज्यावेळी त्या स्त्रीला मी उचलून खांद्यावर घेतले तेंव्हाही माझ्या मनात फक्त सेवेची भावना होती मग ती स्त्री आहे का पुरुष याचा मी विचार केला नाही. मनातून सुद्धा विकार जर संपविता आले तरच साधुपण आले असे समजता येईल आणि मग त्यासाठी संन्यास घेण्याचीही आवश्यकता नाही. गृहस्थ राहूनही जर विकारांवर नियंत्रण करता आले तर त्या व्यक्तीला साधुपण मिळेल."

                        *तात्पर्य*
मनातून चांगले आचरण असल्यास बाहेरील आचरण हे चांगलेच होते. मनात पाप ठेवून चांगले बनता येत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments