✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट
1⃣ 🎤 *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00
*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 20/03/2017 वार - सोमवार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📆 . . *दिनविशेष . . 📆*
⌛१६०२ : डच ईस्ट ईंडिया कंपनीची स्थापना
⌛१७३९ : नादिरशहाने दिल्ली लुटली. मयूरासनासहित नवरत्ने लुटून इराणला पाठविली.
⌛१९१६ : अल्बर्ट आइनस्टाइनने सापेक्षतावादाचा सिद्धांत प्रसिद्ध केला.
⌛१९२७ : डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह.
💥 जन्म :-
⌛१९२० : वसंत कानेटकर, नाटककार.
💥 मृत्यू :-
⌛१३५१ : लहरी सुलतान मुहम्मद बिन तुघलक.
⌛१९५६ : कवी बाळ सीताराम मर्ढेकर.
*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ योगी आदित्यनाथ यांनी यूपीच्या मुख्यमंत्रिपदाची घेतली शपथ, तर केशव प्रसाद मौर्य यांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
2⃣ भारतातील सर्वात मोठा बोगदा जम्मू-काश्मीरमध्ये आकाराला येत आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या बोगद्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्याची शक्यता
3⃣ पेंग्विन पाहण्यासाठी मुंबईकरांची मोठी गर्दी, 31 मार्चपर्यंत पेंग्विन मोफत पाहण्याची संधी
4⃣ शेतकऱ्याविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि शेतकरीविरोधी कायद्यांचा निषेध करण्यासाठी किसानपुत्र आंदोलनाकडून काल राज्यभर पुकारण्यात आले अन्नत्याग आंदोलन
5⃣ विविध पक्षीमित्र संघटनांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील चौदा तालुक्यात २४० ठिकाणी केलेल्या पक्षीगणना मोहिमेत ११५ पेक्षा अधीक प्रजातीचे एकूण ६६४४९ पक्षी आढळून आले
6⃣ दिल्लीतील हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या तीन मोबाईलवर चोरट्यांनी मारला डल्ला
7⃣ रांची कसोटीत भारताचा पहिला डाव 9 बाद 603 धावांवर घोषित, ऑस्ट्रेलियाचे 23 धावांवर 2 बाद, कांगारू 129 धावांनी पिछाडीवर, जडेजानं घेतले दोन बळी
*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
💞💞💞💞💞💞💞
*माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने, कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर एखादे वेळेस साथ देणार नाही , पण माणुसकी प्रेमळ स्वभाव आणि आत्मविश्वास कधीही तुम्हाला एकटे पडू देणार नाही...*
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
*स्वभाव*
*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस*
👤कु.आराध्या निलेश येरमे
रा.उदगीर जि. लातूर
👤 वैभव विरेश कुंटेवाड, मुखेड
👤 मनोहर किशनराव राखेवार, नांदेड
👤 नागेश चिंतावार, सहशिक्षक, बिलोली
👤 योगेश राजापूरकर, सहशिक्षक, धर्माबाद
👤 रामदयाल राऊत, सहाशिक्षक, धर्माबाद
👤 गणेश गुरुपवार
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*
*" योगी "*
राजकीय माणसं ही
हल्ली योगी आहेत
माणसं म्हटलं की ती
नक्की भोगी आहेत
खरा योगी राजकारणात
कधीच शिरत नाही
योगी माणूस कशाचच
राजकारण करत नाही
शरद ठाकर
सेलू जि परभणी
8275336675
----------------------------------------------------
*🔔 🔔 जाहिरात 🔔 🔔*
नासा येवतीकर लिखित
*कथा :- नावाची लक्ष्मी*
http://nasayeotikar.blogspot.com/2017/03/blog-post_42.html
कथा वाचून आपले मत पोस्ट करायला विसरु नका
----------------------------------------------------
*आजचा*
••●★‼ *विचार धन* ‼★●••
*जीवनाचे अध्यात्म समजून घेताना रोज जगण्यातील प्रत्येक घटनेचा ऊहापोह चिंतनाच्या पातळीवर करणे आवश्यक असते. तेव्हांच दैनंदिन जीवनप्रवाहात अध्यात्म उतरू शकते. योग्यायोग्यतेचा निवाडा करून सुयोग्य मार्गावरून चालणे आणि आपल्यांसह इतरांनाही त्या मार्गावरून घेऊन जाणे जमायला हवे. याची सुरूवात आपल्यापासून करून मग ते इतरांना शिकविले, तर ते आचरणशील होते. अलीकडे लग्न व इतर उत्सवादी कार्यक्रमात अन्न टाकू नये, असे सांगितले जाते. जेवताना अन्न टाकायचे नसतेच, तो सुसंस्कृत जगण्याचा अविभाज्य भाग आहे; पण तरीही भराभर वाढून घेणे आणि नुसतीच चव चाखून ते टाकणे, असा*
*त-हेवाईकपणा वाढतो आहे.*
*आपले तत्वज्ञान तर अन्न प्राशनाविषयी खूप खोलवर जावून बोलते. अन्नाची निंदा करू नये आणि ते टाकू नये, असे साक्षात् उपनिषदांनी नोंदवून ठेवले आहे. त्याचे पालन होत नाही. बाहेरील मोठा कार्यक्रम तर जाऊ द्या: पण घरातही खूप अन्न वाया जाते. त्याचा विचार व्हावा. रोज हजारो भुकेल्यांचे पोट भरेल एवढे अन्न राज्यात वाया जात असेल. ते जर आपण वाचवले, तर 'अन्नदान श्रेष्ठदान' सारखी अध्यात्मिक कृती घडेल. Money saved is money earned याचा अर्थ पैसा वाचविणे हे पैसा मिळविण्यासारखेच असते. तसेच अन्नाचा काटकसरीने वापर करणे हे अन्न निर्माण करण्यासारखेच आहे.*
••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••
🔥🔥🔥🔥🔥🔥
*--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
*🎯 विचारवेध............✍*
〰〰〰〰〰〰〰〰
कितीही संकट मोठे असले तरी त्या संकटाला न घाबरता धैर्याने व शांतचित्ताने विचार करुन योग्य मार्ग काढून मात करतो तोच खरा जीवनामध्ये यशस्वी होतो.
ज्यांचे जीवनच संकटमय आणि संघर्षमय आहे आणि त्यांनी अशा खडतर प्रवासातून मार्ग काढून यशस्वी झाले आहेत त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेऊन जीवन जगण्याचा संकल्प केला तर आपलेही हतबल झालेले मन धैर्यशील व संयमीवृत्तीने बनून चांगले जीवन जगण्याची उमेदही निर्माण होईल.
- व्यंकटेश काटकर,नांदेड.
संवाद.9421839590/
8087917063.
🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
*❃ आठवण उपदेशाची ❃*
एकदा काही पाखरे एका घुबडाला म्हणाली, 'तू आपलं घर पडक्या भिंती किंवा जुन्या झाडाच्या ढोलीत का बांधतोस? त्यापेक्षा हिरव्यागार झाडांवर बांधलंस तर किती चांगलं होईल !'
त्यावर घुबड म्हणाले, 'अरे वेड्यांनो, पक्षी धरण्याकरता झाडांवर चिकटा लावतात. तेव्हा अशा झाडावर राहाण्यापेक्षा एखाद्या सुरक्षित जागी राहाणं हे अधिक योग्य नाही का ? आता इथे सुख कमी आहे ही गोष्ट खरी, पण इथे भीती नाही.'
पण त्या घुबडाचे म्हणणे त्या पाखरांना रुचले नाही. ती बाहेर एका झाडावर उड्या मारत राहिली. थोड्या दिवसांनी एका पारध्याने तेथील झाडावर जागोजागी चिकटा लावला. त्यात ती पाखरे सापडली. पारध्याने त्यांना धरले तेव्हा त्यांना घुबडाच्या उपदेशाची आठवण झाली. आपण त्याचे ऐकले नाही याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.
*_तात्पर्य_*
कोणी चांगले सांगितले तर त्यांचे ऐकून विचार करून कृती करावी. नाहीतर नंतर पश्चात्ताप होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍संकलन ✍ साई पाटील*,
*श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
धर्माबाद.
*9860937702, 9922702789*
──┅━━═▣▣═━━┅──
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
Comments
Post a Comment