21/03/2017

✴ सकाळच्या पहिल्या सूर्यकिरणासोबत आपल्या मोबाईलवर येणारी पहिली पोस्ट

1⃣  🎤  *फ्रेश मॉर्निंग बुलेटीन* 🎤 1⃣ 
🕖 प्रसारण : सकाळी 06:50 ते 07:00

*🎤 वृत्त निवेदक - नासा येवतीकर 📢*
📱 9423625769
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
http://fmbuleteen.blogspot.com
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
📅 दि. 21/03/2017 वार - मंगळवार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
      📆 . . *दिनविशेष . . 📆*

           *जागतिक वनदिन*
               *पृथ्वी दिन*
⌛ १९९२ : भारताची ‘शंकूल’ ही दुसरी पाणबुडी नौदलात सामील झाली
⌛रात्र-दिवस समान असणारा दिवस आहे
💥 जन्म :-
⌛ १९१६ : बिस्मिल्ला खाँ, भारतीय सनईवादक.

*संकलक :- सौ. सुभद्रा सानप, बीड*
                 9403595764
----------------------------------------------------
*आजच्या ठळक बातम्या*
1⃣ रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती सुनील तटकरे तर उपाध्यक्ष पदासाठी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांची निवड निश्चित
2⃣  मणिपूरमध्ये भाजपाने बहुमत चाचणी जिंकली.
3⃣  योगी आदित्यनाथ समाजातील सर्व घटकांची काळजी घेतील आणि टीकाकारांना चुकीचे ठरवतील, ते एक यशस्वी मुख्यमंत्री होतील - व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री.
4⃣ इंदू मिल स्मारकाचा आराखडा तयार, काम २-३ महिन्यात सुरू होणार- सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले
5⃣ डॉ. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशन व इतर संबंधितांची १८.३७ कोटी संपत्ती पीएमएलए अंतर्गत जप्त; ईडीची कारवाई
6⃣ पुण्यापाठोपाठ नाशिकला स्वाइन फ्लूचे वाढते रुग्ण, दक्षता घेण्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मनपाला आदेश, नुकतीच घेतली प्रशासनाची बैठक
7⃣ भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा कसोटी सामना अनिर्णित  चेतेश्वर पुजारा ठरला मॅन ऑफ द मॅच.

*📷 वृत्त संकलक - कुणाल पवारे 📹*
📱 9960358300
----------------------------------------------------
*🌷 फ्रेश सुविचार 🌷*
जीवनातील काही पराभव हे विजयाहूनही अधिक श्रेष्ठ असतात.
 
*संकलक :- सुनील रेगुलवाड, उमरी*
                  8007084419
----------------------------------------------------
*आजचा मराठी शब्द*
             *पराभव*

*संकलक :- जगन्नाथ दिंडे, मुखेड*
                  8668453639
----------------------------------------------------
*🎂 आजचा वाढदिवस* 
👤 विनय चव्हाण, उमरखेड, यवतमाळ
👤 प्रकाश सालपे, यवतमाळ
👤 श्रीधर बिरादार, अचवला
👤 पेंडेला अनिल, चिंचालम, तेलंगना
👤 शिवा गुडेवार       
      
[ या बुलेटिनसाठी आपले किंवा आपल्या जवळच्या नातेवाईकांचे वाढदिवस शुभेच्छा वरील क्रमांकावर पाठवू शकता. ]
*संकलक :- नासा येवतीकर, धर्माबाद*
            9423625769
----------------------------------------------------
*आजची @@ गुगली @@*

   *" मना सारखं "*

कोण कोणाचा हात धरून जाईल
काहीच सांगता येत नाही
कोणाच्याच भरवशावर
आता थांबता येत नाही

कोणी  ही कोणा सोबत
कुठे ही हातात हात धरतो
कोणाचा विचार न करता
आपल्या मना सारख करतो

     शरद ठाकर
  सेलू जि परभणी
   8275336675
---------------------------------------------------
*🔔 🔔  जाहिरात  🔔 🔔*

बजेट - 2017 वर आधारित लेख

*अर्थसंकल्प यशस्वी भव:*

http://nasayeotikar.blogspot.com/2017/03/2017.html

वाचा आणि आपले अभिप्राय द्या
----------------------------------------------------
*आजचा*
••●★‼ *विचार धन* ‼★●••

*शांतता खूप बोलते. आधी कानांचा ताबा घेते, मग मनाचा. सर्व काही 'शांत' असते तेव्हा खूप काही 'आवाज' मूकपणे आपल्याभोवती फिरतात. शांततेत समुद्राची गाज हितगुज करते, माडामाडातून फोफावणारा वारा संवाद साधतो. शांततेत कधी आत्ममग्नतेची समाधी लागते तर कधी उत्तुंग विचारांच्या लाटांची भरती येते. दुपारच्या शांततेत घामाचे नितळ थेंब ओथंबलेले असतात तर संध्याकाळच्या कातरवेळच्या शांततेत एकाकीपणाची हुरहुर आठवणींचा कानोसा घेते. मध्यरात्रीच्या शांततेतून कधी असंख्य दुष्ट-सुष्ट विचारांची संगत पंगतीने बसते, तर कधी आयुष्याच्या उजळणीचे पाढे अंधारातून संततधारेसारखे प्रकटतात.*

*शांतता सर्वत्र व्यापून आहे, तरीही तिचा शोध घ्यावा लागतो. शहरातली दुर्मिळ शांतता एखाद्या खेड्यात मुबलक सापडेल. शहरात गर्दीचा आवाजच कधी कधी शांततेची हौस पुरवतो. शांततेची ओळखही कान विसरतात. गर्दीतला आवाज  सहज होता येते, मात्र शांततेत मूकपणे सहभागी व्हावं लागते. पण माणूस शांततेत सहभागी होण्याऐवजी तो ती भंग करण्यात धन्यता मानतो. एखाद्या शांत देवळात प्रथम घंटा वाजते. आपले अस्तित्व तो असे जाणवून देतो. क्वचित काही मंदिरात शांतता उदबत्तीच्या अस्तित्वात धीराने उभी असते. तिथे जिज्ञासू भक्तांचा मेळावा शांततेचा विलक्षण शोध घेत असतो. हीच शांतता काही चर्च व मशीदीतही सापडते, तेव्हा तिथे 'ईश्वरचा' अंश मुक्तपणे वावरत असतो.*

     ••●★‼ *रामकृष्णहरी* ‼★●••
          
    *--संजय नलावडे, चांदिवली, मुंबई*
----------------------------------------------------
*आज*
🎯 वि चा र वे ध......✍
〰〰〰〰〰〰〰

जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अंगी नम्रता असणे, मधुर बोलणे, सत्याचा मार्गावर चालणे
आळसाचा त्याग करणे व कठोर परिश्रम करण्याची तयारी असणे या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. जर ह्या गोष्टीपासून दूर झाले तर जीवनात यश मिळणे कठीन होईल.

- व्यंकटेश काटकर,नांदेड
  संवाद.9421839590/
  8087917063.

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
----------------------------------------------------
*वपुर्झा*

कोणताही विचार आकाशातून पडत नाही, त्याचं नात जीवनाशी असतं. स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे, प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्गारसुद्धा वेदवाक्यासारखा असतो.
~ वपु काळे | रंगपंचमी

*संकलन :- संजय माचेवार, वसमत*
----------------------------------------------------
*आजची बोधकथा*
   
   *❃ कोल्हा,लांडगा व घोडा ❃*
       
     *एका कोल्ह्याने शेतात* चरत असलेला घोडा पहिल्यानेच पाहिला. मग तो एका लांडग्याजवळ जाऊन त्या घोड्याचे वर्णन करून त्याला म्हणाला, 'लांडगोबा, हे भक्ष्य सुदैवाने आपल्यापुढे आलं आहे. आपण जाऊन तो प्राणी प्रत्यक्ष काय आहे ते पाहू.' नंतर ते दोघेही त्या घोड्याजवळ आले.
          घोड्याने एकदोन वेळा मान वर करून पाहिले पण असल्या संशयी चेहर्‍याने पाहणार्‍या प्राण्याशी आपण बोलावे असे त्यास वाटले नाही, म्हणून तो खाली बघत चरू लागला. मग कोल्हा आपणहून त्यास म्हणाला, 'सद्‌गृहस्था ! तुझे मित्र तुला कोणत्या नावानी ओळखतात, ते समजून घेण्याची या सेवकाची इच्छा आहे.' घोड्याचा स्वभाव थोडासा विनोदी होता. कोल्ह्याचा वरील प्रश्न ऐकून घोडा म्हणाला, 'गृहस्थहो, माझं नाव माझ्या मागल्या पायाच्या खुरांवर कोरलं आहे ते तुम्ही वाचून पहा म्हणजे झालं. या उत्तरामुळे कोल्ह्याला संशय आला व तो विचार करून म्हणाला, 'मी तुमचे नाव नक्की वाचले असते, पण काय करू घरच्या गरिबीमुळे मी काही शिकू शकलो नाही. त्यामुळे मी अक्षरशत्रू आहे. परंतु माझा हा मित्र फार मोठ्या घराण्यात जन्माला आला असून तो सुशिक्षित आहे. त्याला बर्‍याच विद्या अवगत आहेत. तेव्हा तुझ्या नावाची अक्षरे तो वाचून दाखविल.'
            ही आपली स्तुती ऐकून लांडगा खूष झाला व आपली विद्वत्ता लगेच प्रकट करावी म्हणून तो घोड्याच्या पायाजवळ गेला. घोड्यानेही पाय वर उचलून त्याला उत्तेजन दिले. लांडगा आपल्या पायाच्या टप्प्यात आलेला पाहताच घोड्याने त्याला जोरात लाथ मारली. त्या तडाख्याने लांडगा लडबडत दूर जाऊन पडला व त्याच्या नाकातोंडातून रक्त वाहू लागले. हे पाहून लबाड कोल्हा त्याला म्हणाला, 'लांडगे दादा या प्राण्याच्या नावाची चौकशी करण्याचे तुला आता काही प्रयोजन नाही. कारण तुझ्या तोंडावर ते नाव आता कायमचे उमटल्यासारखे आहे !'

         *_तात्पर्य_*
   *स्वतःच्या घमेंडखोरपणामुळे जो माणूस संकटात सापडतो, त्याने दुसर्‍याच्या सहानुभूतीची अपेक्षा करण्यात अर्थ नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
•●◎◑◎✹★✹✹★✹◎◑◎●•
*✍�संकलन ✍� साई पाटील*,
  *श्री कंप्युटर्स & मल्टीसर्व्हिसेस,*
                 धर्माबाद.
*9860937702, 9922702789*  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🙏 🙏 धन्यवाद 🙏 🙏 पुन्हा भेटू उद्या
फ्रेश मॉर्निंग बुलेटिनमध्ये तोपर्यंत नमस्कार 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

Comments